Showing posts with label माणुसकी. Show all posts
Showing posts with label माणुसकी. Show all posts

Wednesday, April 26, 2023

निस्वार्थी प्रेम

निस्वार्थी प्रेम



बघ ना एकदा डोळ्यात माझ्या..

दिसतील भरलेल्या आठवणी तुझ्या..


दिसेल माझ्या नजरेत तुझेच रूप..

प्रेम आहे तुझ्यावर खूप म्हणजे खूप..


मनाच्या ओढिने तुझ्या जवळ आले..

निखळ भावनेने एकरूप झाले..


मान्य आहे थोडा हट्ट करते मी..

प्रेमाचा हा धागा घट्ट केला मी..


इतक्या दिवसाच्या ओढीने 

तुला जवळ घेतलं..

एकरूप होऊन तुझ्याशी 

जणू स्वर्ग सुखच भेटलं..


बघ पुन्हा एकदा माझं हृदय हलवुन..

बघ सार अंतरंग आतून बाहेरून झुलवून..

बघ तुला कुठे त्यात वासना दिसते का?

मग तुला कळेल, खऱ्या प्रेमाला मर्यादा असते का..


अजूनही माझं जीव तुझ्यासाठीच झुरावा..

मग का रे अबोला आणि कसला दुरावा..?


सारी नाती, सारे बंध

सगळ्या पल्याड जाऊन बघ..

होऊन धुंद-बेधुंद,

ह्या क्षणात एकदा वाहून बघ..


माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर..

आयुष्यभर ते असच राहील..

तुझं आहे का रे मझ्यावर?

की एका हट्टामुळे ते विरून जाईल?


पूर्ण झालोय आपण त्या क्षणाला

मनाने आणि तनाने ही..

याची ग्वाही दिलीय हृदयाने,

आणि शरीराच्या प्रत्येक कणानेही..


विचारातून बाहेर येऊन बघ..

पुन्हा तुझ्या मिठीत घेऊन बघ..

माझा प्रेमाचा ओलावा

तुझ्या हृदयात भिडवून बघ..


आता नाही रे शक्य..

तुझ्याशिवाय माझं जगणं

केवळ अशक्य..


काही वावग नाही केलं आपण,

आरश्यात स्वतःकडे बघून घे..

सोडून दे सगळे विचार,

ह्या क्षणात मनमुराद जागून घे..


प्रेम करणं कधीच

गुन्हा ठरत नाही..

पण खरं प्रेम पुन्हा

पुन्हा मिळत नाही..


प्रेमात आणि युद्धात

सगळं सगळं माफ असत..

शुद्ध भावनेनं एकरूप

होण्यात काहीच पाप नसत ..


✍️वसुधा इंगळे.


पूर्ण केलेली माझी पहिली कविता;

(चार वर्षा पूर्वी सहज काही ओळी लिहून ठेवून दिलेल्या चारोळ्या होत्या.  नंतर जवळ जवळ मागच्या वर्षा पर्यंत तरी ह्या चारोळ्याच होत्या. नंतर हळू हळू त्यात काही आठवणी आणि क्षणाची चारोळ्या च्या मध्यमातून भर पडत गेली. अजून 2-4 चारोळ्या लिहिल्या. त्या नंतर जसा मूड होईल किंवा काही आठवलं तर ते मनातले विचार कागदावर उमटले जाऊ लागले, आणि ह्या चारोळ्या ची कविता होत गेली, जी मी काल पूर्णत्वास नेली.)

Saturday, March 4, 2023

संवेदनशीलता

 संवेदनशीलता


इमोशनल असणं हे आपल्यातील माणूसपण जिवंत असण्याचं लक्षण असतं.. माणूस खोट बोलू शकतो पण त्याचे अश्रू खोटं बोलतं नाही.. एखाद्याच्या वेदना जाणून घेण्यासाठी तुमचं माणूस असणं गरजेचं असतं बस्स. माणुसकी संपत वगैरे नसते, संपते ती माणसातील संवेदना.माणूस हा माणूसच असतो But जेव्हा संवेदना संपते तेव्हा त्याला काही फरक पडतं नाही. तो समोरच्याला खाली पडताना बघून सुद्धा थांबत नाही. माणसाने संवेदनशील असणं फार गरजेचं आहे आज. संवेदनशील असू तेव्हाच इतरांच्या वेदना खरंच आपल्याला जाणवतील आणि आपण खंबीरपणे काही बाबतीत तरी त्यांच्या पाठीशी उभे राहू शकू."जैसे को तैसा" वगैरे हा फॉर्म्युला मला अजिबात आवडतं नाही....

✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...