Sunday, January 29, 2023

वपु काळे

 संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधनं ही वयानुरूप आणि काळानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही.


पण संसार टिकतो तो कसा ? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होत, तेव्हा घर उभं राहतं


✒️ वपु काळे | वपुर्झा

रतनजी टाटा


 *“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."*


जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला ,  ती आठवण सांगाल का"?


रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."


पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.


मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.


त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.


चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.


पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”


मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.


मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."


वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?


*कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

Saturday, January 28, 2023

सामाजिक नीतिमत्ता

 पहिल्या बायकोला मुलं होत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी दुसरी बायको केलेली आणि दोघी सोबत राहत असलेली उदाहरणं पाहिली,

काही ठिकाणी तर पहिल्या बायकोच्या बहिणी सोबत सुद्धा नवा संसार थाटलेला पाहिल आहे.

आणि हो आपला समाज हे सगळं मोठ्या मनाने स्वीकारतो..

बरेचदा तर बायकोशी पटत नाही म्हणून सुद्धा दुसरी करतात. म्हणजे बघा स्त्री ला काय किंमत उरली यावरून ???

याच्या उलट जर हेच कारनामे एखाद्या स्त्री ने केले, दोन-दोन नवरे एकाच घरात ???

हाच समाज तोंडात शेण घालेल ना??

स्त्री म्हणजे नेमकं काय आहे ?खेळणं असत का???

आनी असल्या पुरुषांना मात्र समाज मानाने जगायला देतो???


तेव्हा कुठे जाते सामाजिक नीतिमत्ता ??

Friday, January 27, 2023

काय चाललंय

 

काय चाललंय या जगात काहीच कळत नाही...

माणसाचं माणुसकीशी गणित कधीच का जुळत नाही...

आजकाल रक्ताच नातं कधीच आपलं का वाटतं नाही..

जे जवळ असतं त्याचं मोलचं कोणाला नसतं,

अवाक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचं मात्र भलतच वेड पप्रत्येकाला असतं...

लांबच्या गोष्टीकडे बघताना जवळच्या गोष्टीकडे कधी लक्षच नसतं,

उद्याच्या चिंतेत आज हरवून बसतो याचं कोणाला भानच नसतं,

सगळं जवळ असूनही माणसाला समाधान मात्र कधीच नसतं...

हे सगळं असं का होतं माहित नाही...

काय चाललंय....या जगात काहीच कळत नाही..


✍️वसुधा इंगळे

विस्मरण

 मॅक्डोल्ड्स मध्ये गेलो🥰 छान फोटो आणि व्हिडिओ काढले, नवरोबा चक्क पाच दिवसानी भेटले होते.... आनंद अगदी ओसंडून वाहत वैगेरे होता, आणि खान्यातच इतके मंत्रमुग्ध झालो की एक ऑर्डर खाऊन झाली🤣, दुसरी ऑर्डर केली अहोनी....


खा बाबा एकदाच खा....परत सोमवार पासून मी गायब असेल तुझे लाड तरी करून घेऊ अस म्हणत. दुसरी ऑर्डर केली🥰🤣


इकडे तिकडे बघून झालं, कॉमेंट पास करून झाल्या, हसून झालं, गप्पा झाल्या, थोडी (थोडीच करते) माझी पाच दिवसाची बडबड होती,ती करून झाली, काही गोष्टी सांगायच्या होत्या, काही विचारायच्या होत्या. त्या पण झाल्या...... 


दुसरी ऑर्डर पण खाऊन झाली, आता गर्दी वाढायला लागली, म्हटलं जाऊ या आता घरी....घरी निघालो.


 चक्क चार दिवसानी आठवल की आपण कार्ड तर तिकडेच विसरून आलो आहोत, आणि चार दिवसांनी ते घेऊन आलो🤣🤣🤣


✍️वसुधा इंगळे

Wednesday, January 25, 2023

संभाषण कौशल्य Communication tips

  संभाषण कौशल्य  (Communication Tips) 


Office Communication Rule.


कामाच्या ठिकाणी होणार्या संभाषणात कुणाशीही आपल्या पर्सनल गोष्टी कधीच शेयर करू नयेत.

Its not a sign of professionalism.


कारण एक म्हणजे, जर त्या पर्सनल गोष्टी स्वतःला "बिचारा मी/ बिचारी मी" अशाप्रकारे portray करणार्या असतील तर we come across as a "Powerless Sympathy Seeking Person" 

व दुसरं म्हणजे असं करून आपण अजाणतेपणी स्वतःचा control इतरांना देत असतो.


For example - 


"माझ्या घराचा EMI अमुक आहे. त्यामुळे मला हा जाॅब करण्याशिवाय गत्यंतर नाही." 

अस जर तुम्ही तुमच्या colleagueला सांगितलंत तर तो तुम्हाला नक्की सहानुभूती ऑफर करेल. पण त्याच्याकडून हिच गोष्ट जर तुमच्या बाॅसला कळली तर या गोष्टीचा फायदा तुमचा बाॅस तुम्हाला control करण्यासाठी करून घेऊ शकतो.


किंवा "माझं व माझ्या नवर्याचं पटत नाही." अस एखाद्या स्त्री ने सांगितलं तर इतर ऑफीस मधील तिच्या मैत्रिणीकडून तिला सहानुभूती सहज मिळू शकते. त्या मैत्रीणीकडून ती गोष्ट पसरत गेली तर इतर सर्व कर्मचारी वर्गाकडूनही तिला सहनुभूती मिळेल. 

परंतू यामधे खोटी सहनुभूती दाखवून अती सलगी साधू पहाणार्या संधीसाधू पुरूषांचाही समावेश होऊ शकतो. 

व समजा त्या खोट्या सहानुभूतीला ती स्त्री बळी पडलीच तर मात्र तिचे आधीच बिघडलेले नातेसंबंध अधिक बिघडू शकतात.


(Please note काही पर्सनल गोष्टी तुम्हाला एखाद्या विशिष्ट हेतूने शेयर कराव्याश्या वाटल्या तर तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. )

✍️ डॉ मैथिली सावंत

Monday, January 23, 2023

पोस्टमन

 पोस्टमन




एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एकेदिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन"

आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"

दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचेच"

आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"

पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"

पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"

घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून दहा हजार रुपये कर्ज हवे आहे"

साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?

पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."

साहेब:- अरे! पण तुझा मुलगा धडधाकट आहे मग जयपुर फुट कोणासाठी??

पोस्टमन:- साहेब जे माझ्या धडधाकट मुलाला उमगले नाही ते एका परक्या अपंग मुलीस उमगले आणि माझे अनवाणी पायाचे दुःख कमी झाले. तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून मला कर्ज हवे आहे

सगळेच निशब्द झाले. 

सारेच गहीवरले!

Sunday, January 22, 2023

घड्याळ

 *घड्याळ ......🕰*



        जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि

 *घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले.*

        घड्याळ्यात तास काटा, मिनीट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनीट काटा म्हणजे आई,व सेकंद काटा मुलं असल्याचे जाणवले.

          या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही.

       *परिवारात वडील म्हणजे तास काटा*,  याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात.

पण ते घरातल्या कोणालाच लक्षात नसते. 

ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.


वडिलांचे म्हत्तव लक्षात येत नाही.

        *आई म्हणजे मिनीट  काटा असते.*

 प्रत्येक मिनीटाला (अगदी सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, *थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो,*

 व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

        *आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं.*

 ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

        जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटूंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे *आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्या शिवाय घराला पुर्णत्व येत नाही.*


        *पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पुर्ण झाले तरी* या साठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच

 *आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे.*

 एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,  तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला

 *तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ ऊडेल*

Saturday, January 21, 2023

वडील ( बाप)

वडील


*वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही...

*म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल..

*कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.

*वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका....

*वडिलांचा आदर करा..

*त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील..

*वडिलांचा सन्मान करा,यातच तुमचे भले होणार...

*वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल..

*वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला....

*वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात..

*वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका....

*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही ...

*आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही..

*पण बाप तो बापच असतो..

*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे...

*पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.

*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल..

*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते...

*तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही...

*बाप असो वा वडील...

*तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच  कमी पडत नाही...

*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो...

*हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही..

*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे,धगधगता अग्नी आहे..पण मावळला की सर्वत्र अंधार आहे..

*म्हणूनच म्हणतो,, बाप बाप असतो...

*आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही...

*मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही...

*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही...

*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही..

*आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघा ...

*आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही .*🌹🌿🌾🌾🌾🌾

स्त्री

स्त्री



स्त्री ही विलोभनीय तितकीच विलक्षण गुढ असते. तिच्यामध्ये नकळत एक अबोली दडलेली असते. रुसण्याचा हक्क जोवर ती अबाधित ठेवते. तेव्हा ती खऱ्या अर्थाने तुमची असते .

पण नकळत मौनामध्ये संवादांच्या उत्कट बिंदूंच्या शब्दांच्या पलीकडे जेव्हा  ती  स्थिरावते . तेव्हा ती नकळत तिच्या अंतरमना ची दाहकता असू शकते.

 अशा अबोलीला पुन्हा मोगऱ्याच्या सुगंधात लय लूट करून नव्याने फुलून दरवळून येणे जमेलच हे सांगणे तितकेसे कठीण....


       

Tuesday, January 17, 2023

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे


आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं.  



 वेळ थोडाच आहे 

आता सावरायला हवं ,

काहीतरी निसटून चाललं आहे

ते थांबायलाच हवं 

पुढे तर खूप आलो 

आता थोडं मागे वळून पहायला हवं 

आपलं काही चुकत तर नाही ना?

 हे आता बघायला  हवं

 मी ,माझं न करता "आपले" पण जपायला हवं

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं.


✍️ वसुधा इंगळे

Thursday, January 12, 2023

मित्र

मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.

कुणी ‘whatsapp’ वर तर कुणी ‘Facebook वर जमतात.

प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.


कारण सगळे विषय ‘Chat’ वरच संपलेले असतात.

मग ‘Chat’ वर भेटूच याचं ‘Promise’ होतं.

आणि संभाषणातून ‘Sign out’ केलं जातं.


‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं.

घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.


‘Available' आणि ‘Busy’ मध्ये

प्रत्येकाचा ‘Status’ घुटमळत राहतो.

आपणहून ‘Add’ केलेल्या मित्रापासून

लपण्याकरिता ‘Invisible’चा आडोसा घेतला जातो. ताप आल्याचं आजकाल आईच्या

आधी ‘Facebook’ला कळतं.

औषधापेक्षा ‘Take care’च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं. 


मनातलं सगळं Facebook वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी?

नात्यांना धरून ठेवायला

‘Net’ ची जाळीच का असावी?


कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.

‘Chat’ला गप्पांनी आणि ‘Smile’  ला

हास्यांनी ‘Replace’ करावं.


शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.


चला तर पूर्वीचे दिवस

पुन्हा अनुभवूया.

मैत्रीला ‘Technology'

पासून जपून ठेवूया.


✍️वसुधा इंगळे

चेटला रामय्या

 एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अत्यंत साध्या माणसाची कहाणी..  


नसानसात निसर्ग प्रेम,अत्यंत साधा माणूस ..या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात..  अत्यंत साधा माणूस. सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. 


फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे  रामय्याने खंमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली.रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसांत मोठे वृक्षही होतील.कोण कोणत्या प्रकारचे आहेत हे वृक्ष? रामय्यांनी लावलेल्या झाडांत असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. 


बेल , पिंपळ, कदंब, कडूनिंब, चंदन, रक्त चंदन असे मोठे मोठे वृक्ष रामय्याने लावलेत. त्याचे गाव सगळीकडे हिरवे गार झाले आहे, तेही त्याच्या एकट्याच्या ध्यासातून. सरकारी जमिनीत रक्तचंदनाची झाडे लावून ती मोठी झाल्यावर सरकारतर्फेच लिलावाच्या पद्धतीने विका. म्हणजे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. ही रामय्यांची सूचना सरकारने मान्य देखील केली.


रामय्याची आपल्या कामावर निष्ठा आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फळ आता सगळीकडून त्यांना मिळायला लागले आहे. लोक आता त्यांच्या कामाची वाहवा करायला लागले आहेत. त्यांना आपोआपच नावलौकिक मिळायला लागला आहे.  काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांसोबत त्यांना २०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे.


प्रसिद्धीची आस नसलेल्या, धनाची लालसा नसलेल्या, पण निसर्गाची समृद्धी सतत वाढत राहो या उत्कट इच्छेने काम करणाऱ्या या अवलीयाला शतशः प्रणाम..!  

✍️वसुधा इंगळे

आयुष्य आनंदाने जगू या.

 *आयुष्य आनंदाने जगू या.....।*


*ज्याच्या जवळ सर्व असतं त्याला त्याची किंमत कळत नसते, हेच खरं , आयुष्यातील प्रत्येक  सीन वन टेक, परत तो सीन नाही  म्हणुन  तर जीवन जगतांना Must Be positive , Must Be happy & satisfied...!!!


*कुणी एक विधवा साश्रूनयनांनी सांगत होती ... , "नेहमी भांडायचे मी...  माहेरी जाईन... घटस्फोट देईन.... इतक्या थरापर्यंत आमची भांडण जायची, पण आता काय ....!!!!


*नाती, माणसं... जिवंत असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्यांची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं...!


*म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा....! पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी समोर राहील उभा... भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.


*एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही..?


*अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...!! आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.


*जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.


*अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दाखवला गेला असता तर ...?


*आपण काय चुकतो ते न पाहता दुसऱ्याला दोष देणारे कधीच समाधानी असू शकत नाहीत. अपेक्षा वास्तव व योग्य असल्या तर एकमेकांच्या विचाराने पूर्ण करता येतात. जीवन समाधानाने जगणे हे पैशापेक्षाही महत्वाचे असावे.


*सुंदर जीवन आपल्याच मनाने व वागण्याने जगता आले पाहिजे. शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक घेतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?

*आयुष्य खुप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. तसेच दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. एकमेकांना प्रेम द्या, अडचणीत मदत करा, संकटसमयी धीर घ्या, आधार द्या.


*हीच विचारसरणी अंगी बानवूया,*

*चला आनंदाने जगू या...।*


✍️वसुधा इंगळे

राजमाता जिजाऊ


राजमाता जिजाऊ
        


ज्यांनी घडविला,

महाराष्ट्राचा भाग्यविधाता,

धन्य त्या थोर,

जिजाऊ राजमाता !

आज १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस, प्रथम या थोर जिजाऊ आईसाहेबांना माझा मानाचा मुजरा ! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणा-या जिजाऊ आदर्श राजमाता होत्या.

जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयात त्यांचा विवाह शूर, पराक्रमी वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.

राजमाता जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा अनमोल खजिना होता. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तत्व या तीन गुणांचा सुरेख संगम त्याच्यांत झालेला होता. त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते.

हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. लहानपणी शिवबांना रामायण तसेच महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या, शिक्षणाबरोबरच त्यांनी शिवबांना तलवार बाजी व युद्धकौशल्यही स्वतः शिकवले.

शिवरायांचे व्यक्तिमत्त्व आदर्श घडवले. राजमाता जिजाऊ, ह्या शिवरायांच्या आदयगुरू होत्या. त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी जिजाऊंनी खंबीर मार्गदर्शन केले.

शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा कैद व सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांचा सामना करण्याची प्रेरणा त्यांनी शिवाजी राजेंना दिली.

जिजाऊ गोरगरीब, सामान्य जनतेच्या माऊली आणि सावली होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना रयतेचा तसेच स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून तयार केले. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक पाहून जिजाऊ माऊली खुश झाल्या.

यानंतर १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी पाचाड या गावी आपले जीवन- कार्य संपवले व स्वर्गाची वाट धरली. राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहान रोपट्याचा वटवृक्ष झाला. अशा या थोर राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम !

धन्यवाद !

जय जिजाऊ, जय शिवराय,
जय महाराष्ट  

✍️वसुधा इंगळे

वेदनांमध्ये शांतता ठेवा!

 तुमच्या वेदनांमध्ये शांतता ठेवा

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खूप छळते. चिडचिड, रडरड मागे लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणूस खचून जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काही जण आयुष्य संपवून टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरंतर हीच वेळ असते उठायची, यासोबत दोन हात करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची, कष्ट करायची, हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्येक गोष्टींचा त्याग करायची!

एक अशी वेळ, ज्या ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता तुझा सूड घेण्याइतकी तुझी पात्रता लायकी नाही, असं म्हणून त्यांना सोडून द्यायचं. 

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा. त्यामुळे सूडबुद्धीने स्वतःचं अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेवूच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते असं निर्माण करा की, तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल असे समजा. काही लोकांना वाईट गोष्टी करण्यासाठी अथवा लोक वाईट बोलण्याकरताच बनवले आहे. तसेच, आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठीच बनवलेले आहे म्हणून आनंदात राहा.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, January 11, 2023

प्रेमातलं वेड

 प्रेमातलं वेड...!


जेव्हा निःस्वार्थ मनानं कुणाला तरी स्वीकारलं जातं अन जीवापाड त्याला जपण्याची ओढ लागते ते म्हणजे निस्सीम प्रेम.


 प्रेम हा शब्द आजही कायम आहे पण काळाच्या ओघात त्याचा अर्थ मात्र बदलत गेला.

प्रेम ही मुळात एक नितळ अन निरागस भावना आहे.

मानवी भावभावनांतील सर्वोच्च व सर्वोत्तम भावना म्हणजे प्रेम. प्रेम समजून घ्यायचं असेल, प्रेम जगायचं असेल, प्रेम अनुभवायचं असेल, प्रेम करायचं असेल तर या सगळ्यांसाठी एकच गोष्ट लागते ते म्हणजे उदार मन.

प्रेमात संयम बाळगावा लागतो. न बोलता खूप काही समजून घ्यावं लागतं. खूप काही मोकळ्या मनानं सोडावं लागतं. खूप काही मोठ्या मनानं स्वीकारावं लागतं. तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं प्रेम पूर्णत्वाला येतं. प्रेम ही नुसती एक भावना नसून अनेक भावभावनांचे उगम स्थान आहे. प्रेमात आदर, मान-सन्मान, जिव्हाळा, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, विश्वास हे सगळं असतं. नुसतं सौंदर्यावर भाळून प्रेम कधीचं होतं नसतं हेही तितकच खरं आहे.

उगाच डोळ्याला भावलेल्या सौंदर्याला प्रेम म्हणून गालबोट लावण्यात काही अर्थ नाहीये.


प्रेमाला अनेक दूषणे मिळाली अन अनेक भूषणे पण मिळाली. प्रेम हे सदासर्वकाळ चांगल असतं. कुणीतरी आपल्याला स्वीकारलं नाही म्हणून प्रेमाला वाईट म्हणणं मुळातच चुकीचं आहे कारण निवडलेली व्यक्ती चुकीची असू शकते पण प्रेम चुकीचं वा वाईट कधीच नसतं. एखाद्याला दोष देणं हे कधीचं प्रेम होवू शकत नाही.

प्रेम ही भावना खूप व्यापक आहे. प्रेम हे स्वातंत्र्य बहाल करतं त्याला बंधन नसतात. व्यक्तीची निवड चुकीची असू शकते किंवा समोरच्याची भावना वेगळी असू शकते अन इथंच प्रेमावर वाईट असण्याची मोहर लावली जाते.

जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमासाठी कुणालातरी दोष देतो वाईट म्हणतो तेव्हा त्यानं स्वतः विचार करण्याची गरज असते. समोरच्या व्यक्तीच्या भावना वेगळ्या असतील वा त्याची आवड वेगळी असेल तर आपण त्याचा अट्टाहास धरून आपला स्वतःच्या आनंद गमावून बसतो अन त्या व्यक्तीला दोष देण्यात धन्यता मानतो. जेव्हा प्रेम दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे केलं जातं तेव्हा ते प्रेम निस्सीम प्रेम होत जातं. प्रेम जरी एकतर्फी जडलं असेल ते मनात ठेवावं त्यासाठी कुणालाही आपल्याला स्वीकारण्यास भाग पाडू नये तेव्हा त्या एकतर्फी प्रेमाला अर्थ आहे. एकतर्फी प्रेम यात एकतर्फी शब्दात सगळं काही आलं. ते म्हणजे विमानतळावर बसून जहाजाची वाट पाहण्यासारखं आहे.

प्रेम असं काही ठरवून होतं नसतं किंवा एक नजरेत वा एका दिवसात सुद्धा होतं नसतं. प्रेम ही एक भावना आहे ती दिवसागणिक वाढत जाते. प्रेमाची सुरूवात बहुदा ही सहवासातून होतं असते. जेव्हा सहवास वाढतो तेव्हा विचारांची देवाण घेवाण होते. चर्चा घडून येते, भावना व्यक्त केल्या जातात. सहवासातून खऱ्या अर्थानं प्रेम ही भावना हळू हळू पूर्णत्वाला येत असते. 

संयम हा प्रेमात खूप महत्त्वाचा घटक ठरतो. 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' असं करून जमतं नाही. कधी कधी काही व्यक्ती व्यक्त होण्यासाठी वेळ घेतात. सगळ्यांत महत्त्वाचं आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे त्या व्यक्तीच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. त्या व्यक्तीचे विचार काय आहेत त्याच्या मनात काय आहे हे थोडं फार तरी डोकावून पाहिलं पाहिजे. जर आपलं प्रेम आहे तर ते समोरच्या व्यक्तीला जाणवतं आहे का ? जाणवत असेल तर त्याची काय प्रतिक्रिया आहे ? या गोष्टी आपण आपल्या पडताळून पाहिल्या पाहिजे. निव्वळ आपण आपल्या भावविश्वात गुंताण्यापेक्षा समोरून प्रतिसाद काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर उगाचच आपण फक्त आपल्या भावना किती घट्ट आहे किती प्रामाणिक आहे हे समोरच्याला सांगत बसण्यात काही अर्थ नाहीये. प्रेम आहे म्हटल्यावर थोडा संयम हवा अन थोडी वाट पाहण्याची तयारी पण हवीच. नुसतं आपल्या एकट्याला वाटतं आहे म्हणून सगळं आपल्याच मनासारखं घडावं ही अपेक्षा ठेवणं सुध्दा चुकीचं आहे. आपण आपल्या भावना मनात ठेवायच्या अन योग्य वेळ आली की त्या व्यक्त करायच्या. जर काही सकारात्मक वाटलं तर त्या वाटेवर चालणं ठीक आहे. नाहीतर गोष्ट जिथं आहे तिथंच सोडलेली कधीही बरी. नाहीतर उगाचच रोज नव्यानं तोच कित्ता गिरवत बसण्यात काही अर्थ नाही.

समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल प्रेम भावना नाही. तो आपल्या स्वीकारायला तयार नाही. तर आपण त्या गोष्टीचं दुःख मानायच नाही. ज्याला आपल्या प्रेमाच्या भावना कळू शकल्या नाहीत त्याला आपल्या दुःखी होण्याने किती फरक पडेल कुणास ठाऊक. आपल्या प्रेमासाठी कुणाला तरी भाग पाडणं अन त्यानं आपल्याला स्वीकारावं हा अट्टाहास धरणं सुध्दा चुकीचं आहे. कारण मनाविरुद्ध जावून जगाच्या पाठीवर कुणीच आनंदी राहू शकलेलं नाही. आपण आपल्या स्वतःमध्ये आनंद शोधला पाहिजे. आपल्याला कुणीतरी आवडलं यापेक्षा आपण कुणालातरी आवडलं पाहिजे असं वर्तन ठेवून आपण आपली वाट चालली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे ते मनमुराद जगले पाहिजे. आपणच आपल्या आवडीने त्यात इंद्रधनुप्रमाणे रंग भरले पाहिजे. आपले बहरलेले रंग पाहून जे फुलपाखरू स्थिरावेल त्याला जपलं पाहिजे. त्याला बंधनाची मर्यादा न ठेवता मनसोक्त फिरू दिलं पाहिजे. सरतेशेवटी इतकचं म्हणावंस वाटतं.

"येणाऱ्याला मनाच घर अन जाणाऱ्याला मनाच दार नेहमी उघडं ठेवावं"


 ✍️वसुधा इंगळे

#वेड #प्रेम #निस्सीमप्रेम

Tuesday, January 10, 2023

सुखी राहण्याचा मार्ग


 *त्रासाच ओझ; सुखी राहण्याचा मार्ग*

🧘‍♂️ तथागत गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे.


● एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीस आली. भगवान बुद्धांच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले. 


● ही मनःशांती सातत्याने अनुभवता यावी, म्हणून त्या व्यक्तीने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला, 'भगवान, आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो. 


● आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी, कायम सुखी कसं बरं राहता येईल? कृपया मार्गदर्शन करा.'


● भगवान किंचित हसले. ते म्हणाले, 'यावर उपाय तुला आज नाही, उद्या देतो. उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे, तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर ये!'


● त्या व्यक्तीला वाटले, उचित जागी, उचित वेळी भगवान आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत. त्याने होकार दिला आणि तो आनंदाने परतला.


● दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी भगवान फेरफटका मारायला निघाले. तेव्हा ती व्यक्ती वेळेआधीच हजर झाली आणि भगवान बुद्धांबरोबर चालू लागली. 


● भगवान बुद्ध शांतपणे चालत होते. व्यक्तीच्या मनात चलबिचल सुरू होती. भगवान तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती. 


● तेव्हा भगवान बुद्धांनी वाटेत पडलेला एक जड दगड उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हाती दिला. त्यानेही तो निमूटपणे हातात घेतला. दोघे चालत राहिले. 


● ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले. तरीही भगवान काहीच बोलेना. त्याची चिडचिड होऊ लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखू लागला. त्याच संयम संपला. 


● तो म्हणाला, 'भगवान, हे ओझं आणखीन उचलवत नाही. हा दगड आता खाली ठेवून देऊ का?'


● भगवान बुद्ध हसून म्हणाले, 'अरे, तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो. तुला त्या दगडाचं ओझं होत होतं, तर कधीच टाकून द्यायचंस नाही का? माझ्या सांगण्याची काय वाट बघत बसलास?'


● 'पण भगवान, तुमच्या आज्ञेशिवाय मी खाली कसा ठेवणार होतो?' असे म्हणत तो मनुष्य हतबल झाला.


● बुद्ध म्हणाले, 'अरे पण यामुळे वेदना तर तुलाच सहन कराव्या लागल्या ना? हेच तुझ्या प्रश्नाच उत्तर आहे. आपण आयुष्यभर अनेक विषयांचं ओझं अकारण वाहत राहतो. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. 


● आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते. त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसता, हे ओझं लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात कर. मग बघ, आयुष्यभर सुखी होशील आणि आनंदीही!'


🙏 *तात्पर्य* : एखाद्याच्या बोलण्याचा, वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो, मनाला लावून घेतो, परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, त्याला ते माहीत पण नसत. मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा? कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा? त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल.

✍️वसुधा इंगळे

डॉ.नानासाहेब थोरात


 इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. 


या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. 

ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती. 

जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 


संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोन कॉल मुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. 

प्रश्न हा नाही कि त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटर बरोबर बोलता कसे आले तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असते हे कसे समजले? 

ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?

या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात.....!!!  

  

ब्रिटनमध्ये मुलं तीन वर्षाचे झाले कि त्याला शाळेत प्रवेश मिळतो, आई वडील दोन्ही नोकरीलाअसतील तर सहा तास रोज मुलं शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात ना ABCD शिकवतात ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. 

आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते. 


फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही तर आपलय रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, इलेकट्रीशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 

असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते, त्या बालमनांना त्या दिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आई वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 

आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 

पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून अधिक अधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले. 


यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेक्यानिकपासून ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टर पर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 

आम्ही कुठेय....? 

हा प्रश्न आम्हाला पडतो का? 


मुलांवर ओझे अपेक्षांचे 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा चर्चा करत राहिलोय 

पण या बालमानच्या मनावरील ओझ्याचे काय? 

फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाटाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? 

याला पालकपण जबाबदार नाहीत का? 


माझ्या मुलाला शाळेत गेले कि आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत, मुलाना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत, 

याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे, असा सगळा अट्टाहास का? 


ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहरीत पोहले पाहिजे रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या वयात इतरांचे मुलं मुलांसारखे स्टेजवर नाचवत, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंग मध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताचा इंग्लिशच्या कलासला पण जबरदस्तीने बसवतोय. 

आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळया जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा उद्या चित्रकलेचा परवा कॉम्पुटरचा असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत. 

त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही. 

सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 

मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाटाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय. 

आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? 

हे दोनच विषय आयुष्यात सर्वकाही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याचा मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 


स्पर्धांची गरज आहे का? 

मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?


गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? 

तो आई वडिलांबरोबर आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 

वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? 

ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 


माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात मुलं इतर शाळेच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 

याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 

शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 

एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोंकाना विचारून खात्री करून घेतायत की खरेच आज गृहपाठ नाही ना. 

आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? 


खरेच  या बालमानांना एव्हढ्याश्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 


माझे मुलं सर्वच विषयात सर्वच खेळता सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा या कोवळ्या बालमानांना जीवघेणी स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ..     


डॉ. नानासाहेब थोरात 

वरिष्ठ शास्त्रज्ञ

मेडिकल सायन्स डिव्हिजन 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

Saturday, January 7, 2023

वेळेचा सदुपयोग


 काही वर्षांपूर्वी मोबाईल येण्याआधी ट्रेनमधे, बसमधे पुस्तक वाचनात रमलेली मंडळी हमखास दिसायची... त्यातून "कुठलं पुस्तक आहे, कसं आहे " अशा संवादातून माणसांची ओळख व्हायची. छान वाटायचं..तेव्हा निवांत वेळेचा सदुपयोग किंवा रिलॅक्स होण्याची बहुतांश लोकांची व्याख्या म्हणजे "शांतपणे आराम खुर्चीत बसून आवडत्या पुस्तकाचे वाचन" अशी होती....

तेव्हा माणसं विचारांची सखोल आणि सकारात्मक स्पंदने पुस्तकातून अनुभवायची, त्यामुळे विचारांच संगोपनही  छान व्हायला आपोआप मदत व्हायची...

पण "आज" वर काही भाष्य न करता त्या दिवसांच्या आठवणींची साठवण त्या दिवसांची गोडी दर्शविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे..की नाही??


✍️वसुधा इंगळे

डोंबाऱ्याचा खेळ

 मी पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळ – 



लहानपणापासून मला डोंबारी, माकडवाला, अस्वलवाला यांचे खेळ पाहण्याची विलक्षण आवड आहे. आपण तिकिटे काढून सर्कशीला जातो, प्राणिसंग्रहालयाला भेट देतो. पण डोंबाऱ्याचा खेळ पाहायला काही आपल्याला तिकीट काढावे लागत नाही


आज पनवेल स्टेशन ला उतरुन बाहेर आले सकाळ ची वेळ, डोंबाऱ्याच्या ढोलक्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मी मोबाईल मधून डोकं काढून आवाजाच्या दिशेने नजर टाकली. डोंबाऱ्याचे कुटुंब पनवेल स्टेशन च्या बाहेर मोकळ्या जागी आले होते. त्यातील बाप्या आपले ढोलके जोरजोराने वाजवत होता. आपला खेळ पाहण्यासाठी त्याला स्वत:च्या भोवती प्रेक्षकांची गर्दी हवी असते. आपल्या ढोलक्याच्या आवाजातून तो प्रेक्षकांना सांगत होता, “या, या, आमचा खेळ पाहायला या!”


पुरेशी गर्दी जमल्यावर डोंबाऱ्याने आपल्या खेळाला सुरवात केली. डोंबारी हा त्या खेळातील जणू कॅप्टनच होता. त्याचबरोबर तो खेळाचा निवेदकही होता. आपल्या मुलाबाळांनी सुरू केलेल्या खेळाचे तो रसभरीत वर्णन करत होता. जणू धावते समालोचनच! त्याचबरोबर तो प्रेक्षकांना टाळ्या वाजवून कसरत करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास आवाहनही करत होता.


डोंबाऱ्याच्या मुलांनी कोलांट्या उड्या मारून व वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून लोकांना रिझवले. नंतर त्या डोंबाऱ्याने काही चित्तथरारक खेळ करून दाखवले. त्याच्या मुलीने हातातल्या काठीने तोल सावरत उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालून दाखवले. त्याने आपल्या लहान बाळाला काठीवर बांधून ती काठी दातांवर पेलली.


डोंबाऱ्याच्या बायकोने आपल्या केसांना एक प्रचंड धोंडा बांधून तो वर उचलला. नंतर डोंबाऱ्याने कमालच केली. त्याने एका बुक्क्यात मोठा-थोरला दगड फोडला. तेव्हा लोकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट केला. .


ते सारे पाहून माझ्या मनात आले की, ऑलिंपिकमधील खेळांडूच्या वाट्याला येणाऱ्या कौतुकाचा काही अंशसुद्धा या अभागी कसरतपटूंच्या वाट्याला येणार नाही का?


✍️वसुधा इंगळे

Friday, January 6, 2023

नात म्हणजे नक्की काय?


 नातं म्हणजे नक्की काय ?


 खरतरं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू दे,ते सहज असावे . नात्यातील सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या कदाचित आपल्याकडून ही हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …

अशी हि सहजता जपणारी नाती निभावताना मिळणारं समाधान हे नक्कीच जास्त मोलाचं असतं . आपण चुकलो ,धडपडलो तरी आपल्याला सावरणारं ,आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते . आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्वाचं असतं . नातं नेहमी निःस्वार्थी असावं. निखळ असावं . दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव, श्रीमंतीचा बडेजाव, उपकारांची भाषा यांना थारा नसावा . कारण जेव्हा त्या नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी कळत -नकळत घडतात तेव्हा ते नातं, नातं न राहता ओझं वाटू लागतं . या ओझ्याखाली समोरची व्यक्ती मात्र दबून जाते . नात्यांच्या या भिंतीला पहिली भेग ही इथेच जाते . अजून पुढे जाऊन निर्माण होणार्या समज - गैरसमज,तुलना ,इर्षा यामुळे ही भेग वाढत जाऊन नात्यांची हि भिंत दुभंगते . जोपर्यंत आपल्याला आपली चूक कळून येते तोपर्यंत फार मोठं नुकसान झालेलं असतं. मग आश्वासनं ,वचन ,माफी यांचं कितीही प्लास्टर केलं तरी ही नात्यांची भिंत काही पूर्वीप्रमाणे राहत नाही .

एकदा का नात्यातला एकसंधपणा लयास गेला कि त्या नात्याचा पूर्वीचा बाज कधीच परत येत नाही . नात्यातला हा दुभंग टाळण्याकरिता नात्यांना कायम प्रेम आणि विश्वास यांच्या भक्कम धाग्यात दोन्ही व्यक्तींनी समानपणे बांधून ठेवणे आवश्यक असते . कारण नातं हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने ,सहजतेने सांभाळावं लागतं. दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम,विश्वास,आपुलकी असणं हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी 'रक्त 'पेक्षा 'मन 'जुळणं जास्त महत्वाच ठरतं . अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात . लादलं जातं ते नातं नसतंच मुळी . ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी,स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो .

आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …नाती आणि आयुष्यही ……………. !!!!!


आज नाती विभक्त होत आहेत, एकत्र कुटुंब पद्धती चे प्रमाण कमी होत आहे.


✍️ वसुधा इंगळे

Wednesday, January 4, 2023

शेतकरी ब्रँड


          

 सोनारा सोबत दोस्ती करा, तो सोन फुकट देणार नाही. 

सिंधी मारवाडी सोबत दोस्ती करा, कोणतीही वस्तू दुकानातली फुकट देणार नाही. 

सुतारा सोबत दोस्ती करा, कोणतीही लाकडी वस्तू फुकट देणार नाही. 

लोहारा सोबत दोस्ती करा,पण लोखंडी वस्तू फुकट देणार नाही.

जगातल्या कोणत्याही व्यावसायिका सोबत दोस्ती करा, काहीच फुकट मिळणार नाही. 


पण शेतकऱ्यांसोबत दोस्ती करा, ओंजळ भर शेंगा... हरभरा.. ऊस अंबाडीची भाजी आणि खूप काही फुकट घेऊन जा.

 शेतकरी राजा पैसे मागणार नाही.. ही उदारता फक्त शेतकऱ्या जवळच आहे.


✍️वसुधा इंगळे

Tuesday, January 3, 2023

सावित्रीबाई फुले


 🌸सावित्रीमाई🌸

          "जी माणसे इतिहास घडवतात ती  माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाहीत ." आणि "जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे इतिहास कधीच घडवु शकत नाहीत"....


         🌸 सावित्रीमाईंचा जन्म झाला तो काळ म्हणजे पावणे दोनशे वर्षापुर्वीचा काळ! त्यावेळी समाजाची रचना विषमतेवर आधारीत होती. स्रीयांची स्थिती दुय्यम होती. स्त्री शिक्षणापासुन वंचित होती. शिक्षण हे फक्त पांढरपेशा समाजापुरतेच मर्यादित होते. अस्प्रुश्यता , हुंडा पध्दती , जरठ कुमार विवाह , सतीची चाल अशा अनेक अनिष्ट प्रथेखाली स्री भरडली जात होती . सतीची चाल  म्हणजे काय?....तर पत्नीने पतीच्या जळत्या चित्तेमध्ये स्वत:ला झोकुन देणे.... कल्पना करा ऐकुणच अंगावर काटे येतात....अशी दयनीय अवस्था स्रियांची होती....कधी तुमच्या वाचनात आले का? एखाद्या पतीने पत्नीच्या चित्तेवर स्वत:ला झोकुन दिले...नाही ना परंतु स्रियांना हे अग्नीदिव्यातुन स्वखुशीने नव्हे तर जबरदस्तीने जावे लागे. अशी ह्रदय हेलावणारी स्रीची परीस्थिती होती. फक्त चुल आणि मुल . रांधा-वाढा-उष्टी काढा ऐवढ्यापुरतेच तिचे क्षेत्र मर्यादित होते. म्हणुन ती अबला ,  दुर्बल झाली होती .

म्हणुन म्हणावसं वाटतं....🌸


🌸स्री जन्मा तुझी कहाणी।

ह्रदयी अम्रुत नयनी पाणी।..😢

अशी परिस्थिती पाहुन मन हेलावुन जाते. पण विरोध कोणी करायचा? समाजाचा रोष कोणी ओढुन घ्यायचा? अशा या परिस्थितीचे आव्हान क्रांतिबा जोतिबा फुले यांनी स्विकारले....👍💐💐


         याच काळात तेजोमय ज्ञानज्योती सावित्रीमाईंचा जन्म पुणे जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या गावी वडील खंडोजी नेवासे (पाटील) आई सत्यवती यांच्या पोटी १ जानेवारी १८३१ साली  १९ व्या शतकात स्रियांच्या सामाजिक आणि शैक्षाणिक विकासासाठी भारताच्या  भुमीत या तेजस्वीनीचा जन्म झाला....🌸


        वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी इ.स.१८४०या साली सावित्रीमाईंचा विवाह महात्मा ज्योतीबा फुले यांच्या बरोबर झाला. लग्नाच्या आधी सावित्रीमाई अशिक्षित होत्या पण शिक्षणाची  विलक्षण आवड होती . सावित्रीमाई हुशार आणि कर्तुत्वान होत्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्व जाणले होते . म्हणुन शेतीची कामे करून विश्रांतीच्या वेळेस त्यांनी सावित्रीमाईंना शिक्षणाचे धडे दिले...🌸


१जानेवारी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढुन आत्याचाराच्या दुष्ट चक्रातुन स्रीयांना व अस्प्रुश्याना बाहेर  काढुन शिक्षणाचे दरवाजे खुले केले...🌸


        🌸घोड्याला शिकवण्यासाठी चांगल्या घोडेस्वाराचे गरज असते , हत्तीला शिकविण्यासाठी चांगल्या माऊताची गरज असते तसेच मुलींना शिकविण्यासाठी चांगल्या स्री शिक्षकाची गरज असते....आणि म्हणुनच महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना शिकविले व भारताची पहिली शिक्षिका म्हणुन बहुमान दिला. व नतंर त्या पहिल्या प्राध्यापिका झाल्या....👍🌸


        महात्मा जोतिबा फुलेंनी स्रीशिक्षणाचा विढा उचलला होता . त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत होतेन. सावित्रीमाई त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्यापाठीशी सावलीसारख्या उभ्या होत्या...👍🌸


         परंतु सावित्रीमाईंना सनातनी लोक धर्म बुडवी ,सटवी , अवदसा असे शब्द वापरून अपमानीत करायचे. वाटेत उभे राहुन दगड , चिखल शेणाचा मारा करायचे अशाप्रकारे सावित्रीमाईंना कर्मट सनातन्यानी खुप त्रास दिला. परंतु त्या डगमगल्या नाही . आपले कार्य प्रामाणिकपणे चालुच ठेवले....👍💐💐कारण महात्मा फुलेंना माहित होते...


        🌸पुस्तकाने मस्तक सुधारत असतं ।

आणि जे मस्तक सुधारलेलं असतं।

ते कोणापुढेही नतमस्तक होत नसतं ।🌸


        स्रीयांनी शिकावे म्हणुन त्या तळमळीने कार्य करीत होत्या ..

अशा या सावित्रीमाईवर काळाने झडप घातली . प्लेगच्या रोग्यांची सेवा करता करता स्व:ताच प्लेगच्या भीषण रोगास बळी पडल्या आणि १० मार्च १८९७ साली अनंतात विलीन झाल्या..😭

   🌸सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आकाशात झेपण्याचे बळ आहे ।

स्री शिक्षणाणासाठी तु केलेल्या कार्याचेच हे फळ आहे ।


🌸जिच्यामुळे महिला आज समाजात सन्मानाने उभी हाई ।

ती ज्ञानज्योती , महिला विधाती सावित्रीमाई , सावित्रीमाई....👍

  

       🌸सावित्रीमाईंच्या १९2 व्या जयंती निमित्ताने विनम्र  अभिवादन🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👏👏👏👏👏

  

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...