Showing posts with label समाजकार्य. Show all posts
Showing posts with label समाजकार्य. Show all posts

Monday, January 5, 2026

सावित्रीबाई फुले : शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवणारी महान स्त्री

 सावित्रीबाई फुले : शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवणारी महान स्त्री


भारतीय समाजात स्त्री शिक्षणाची सुरुवात करणे हे अतिशय कठीण काम होते. अशा काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला शस्त्र मानून समाजपरिवर्तनाचा मार्ग निवडला. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसुधारक होत्या.



सावित्रीबाई फुलेंचे बालपण व शिक्षण

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्या काळात मुलींना शिकवणे तर दूरच, पण शिकणेही गुन्हा मानले जायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले आणि स्वतः शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले.


भारतातील पहिली महिला शिक्षिका

१८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. समाजाकडून अपमान, टीका आणि विरोध सहन करूनही त्यांनी शिक्षणकार्य सोडले नाही.


स्त्री शिक्षणासाठी संघर्ष

रस्त्यातून जाताना लोक त्यांच्यावर शेण, दगड फेकत. तरीही त्यांनी शिक्षणाचा दीप विझू दिला नाही. सावित्रीबाईंनी विधवा स्त्रियांसाठी आश्रम, बालहत्या प्रतिबंधासाठी कार्य, आणि अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या.

लेखन व विचार

सावित्रीबाई फुले या उत्तम कवयित्री होत्या. त्यांच्या कवितांमधून स्त्री स्वातंत्र्य, समानता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. त्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली.


निष्कर्ष

सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला मार्ग आजही प्रेरणादायी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. त्यांचे कार्य प्रत्येक पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहे.

सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला शिक्षणाचे खरे महत्त्व शिकवतात.



✍🏻वसुधा इंगळे 

Thursday, January 1, 2026

सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले – संयुक्त कार्य

 सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले – संयुक्त कार्य प्रश्नमंजुषा 


प्रस्तावना

आजच्या प्रश्नमंजुषेत आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकत्रितपणे समाजसुधारणेसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारतीय समाजात शिक्षण व समानतेची नवी दिशा मिळाली. आज त्याचे कार्य आजच्या नवीन पिढीला माहित असायला हवे, त्याचा त्याग, परिश्रम, आणि जिद्द ह्या सगळ्या गोष्टी या प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून आपण माहितबकरून घेऊ.

🟢 प्रश्नमंजुषा : सावित्रीबाई व ज्योतिबा फुले





1️⃣ सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विवाह कधी झाले?

उत्तर: इ.स. 1840


2️⃣ दोघांनी मिळून समाजसुधारणेचे प्रमुख कार्य कोणत्या क्षेत्रात केले?

उत्तर: शिक्षण आणि सामाजिक सुधारणा


3️⃣ मुलींची पहिली शाळा सुरू करताना ज्योतिबा फुले यांची भूमिका काय होती?

उत्तर: शाळेची स्थापना व मार्गदर्शन

👉 माहिती: सावित्रीबाई त्या शाळेतील शिक्षिका होत्या.


4️⃣ सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजघटकासाठी विशेष कार्य केले?

उत्तर: स्त्रिया आणि दलित समाज


5️⃣ दोघांनी मिळून कोणत्या चुकीच्या प्रथांविरोधात लढा दिला?

उत्तर: जातिभेद, स्त्रीदमन, अंधश्रद्धा


6️⃣ समाजातील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी कोणते साधन प्रभावीपणे वापरले?

उत्तर: शिक्षण

👉 माहिती: शिक्षण हाच समाजपरिवर्तनाचा मार्ग आहे, असा त्यांचा विश्वास होता.


7️⃣ विधवा महिलांसाठी सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी काय कार्य केले?

उत्तर: त्यांना आधार व संरक्षण देण्याचे कार्य


8️⃣ दोघांच्या संयुक्त कार्यामुळे समाजात कोणता बदल दिसून आला?

उत्तर: शिक्षणाबाबत जागरूकता वाढली


9️⃣ सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही कशासाठी प्रेरणादायी आहे?

उत्तर: समानता व सामाजिक न्यायासाठी


🔟 “शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे” हा विचार कोणी प्रत्यक्ष कृतीत आणला?

उत्तर: सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले

निष्कर्ष

सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे संयुक्त कार्य हे केवळ इतिहासातील घटना नसून आजच्या समाजासाठीही मार्गदर्शक आहे. शिक्षण, समानता आणि मानवतेचे मूल्य त्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवले.


✍🏻वसुधा इंगळे.

Wednesday, February 1, 2023

मच्छिन्द्र टिंगरे

वेश्या नावाची आई......

पोरानं आईला विष पाजलं, अन आईनं पोराला अमृत.....


बारामतीतं घडलेली  सत्य घटना.... संबंधिताच्या परवानगीने शेअर करतं आहे.... याबद्दल कोणाला माहिती असल्यास कोणी.. नावं, गावं, किंवा ओळख निर्माण होईल अशी कमेंट करू नये...


गेल्या महिन्याभरापासून माझ्याकडे एक मॅटर चालु होतं काल त्याचा आनंददायी शेवट झाला.... साधारण एकमहिन्यापूर्वी एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या... त्यांनी मला सांगितले साहेब पोरगं मला सोडून गेलंय मला बोलतं नाही मी एकटी राहते ... मी सगळी घटना समजून घेतली... त्या मावशीने मला जी हकीकत सांगितली ती ऐकून शहारे आले.....त्यांनी सांगितले मला एकचं मुलगा आहे.... माझ्या नवऱ्याचा मुलगा दोन वर्षाचा अपघाती मृत्यू झाला... मी सासरीच राहत होते.. काही काळ गेल्यानंतर मी एकटी असल्याचा फायदा घेत घरातल्या सहित काही पुरुषांची वाईट नजर माझ्यावर पडत होती... मी जर आयुष्यात कोणाला तरी स्थान दिल असतं तर, माझ्या मुलाच्या अन माझ्या प्रेमात अंतर पडलं असतं... माझ्या मुलाला मला काहीतरी घडवून दाखवायचं आहे...... असं चंग बांधून घरं सोडलं अन बारामतीतं रहायला आले..... काही दिवस माहेरच्या लोकांनी साथ दिली परंतू नंतर त्यांच्या अडचणीमुळे ते फारशी मदत करू शकले नाहीत....मुलाचं शिक्षण झालं ग्रॅज्युशन झाल्यावर.. त्याला एम. पी. एस.सी.चा अभ्यास करायचा होता.... मला काही लोकांनी सांगितले त्याला पुण्याला ठेवला तर चांगला अभ्यास होईल... मी काही ओळखीच्या लोकांकडून उसणवारी चे पैसे घेऊन त्याला पाठवलं....


त्या काळात त्याची परीक्षा झाली तो पास झाला... तो लिपिक म्हणून नोकरीला लागला... पण दरम्यान च्या काळात मी बारामतीत एकटी राहत होते... मुलाला माझ्याबद्दल कोणीतरी चुकीचं सांगितले.... आईला एकांत भेटावां म्हणून तुला तिने पुण्याला पाठवलं होतं असा गैरसमज त्याच्या मनात कोणीतरी भरवला.... त्याने माझ्याशी वाद घालायला सुरवात केली.... माझे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असा समज त्याच्या मनात घरं करून बसला होता.... आमचा वाद विकोपाला गेला.... मला तो तू वेश्या आहॆस असं ही म्हटला...एक दिवशी त्याने विषाची बाटली आणून आत्महत्या कर असे सांगितले......मला त्याने विष प्यायला भाग पाडलं.... पण काही लोकांनी दवाखान्यात घेऊन गेले..... तेथे पोलीस माझे जबाब घ्यायला आले.... मी खरं सांगितले असतं तर त्याचं करियर उधवस्त झालं असतं म्हणून मी पोलिसांना मीच आजरपणाला कंटाळले होती म्हणून मी विष घेतलं असं सांगितले..... आता तो नोकरीं करतोय.... लग्न ही झालयं...मला त्याच्याकडे जायचंय काही करुन त्याला समजून सांगा असं मला विनंती केली......

मी त्यांचा नंबर घेतला.... फोन केला.. मी मच्छिन्द्र टिंगरे बोलतोय.. मला तुम्हाला भेटायचं आहे... कधी भेट होईल.. तो म्हणाला सर मी तुम्हाला ओळखतो... काय कामं होत... मी त्याला म्हटलं भेटल्यावर बोलू म्हटलं... नवरा बायको दोघे या असं म्हटलं..... गेल्या आठवड्यात दोघेजण माझ्याकडे आले.. आम्ही माझ्या ऑफिस ला बसलो.... योगायोगाने त्याची पत्नी पण मला ओळखत होती.... ती मला म्हटली सर तुम्ही आमच्या शाळेत आला होता.. पर्यावरण विषयावर तुमच व्याख्यान होतं..... ती ओळखिची निघाल्यावर माझं कामं सोपं झालं...

मी तिला बाजूला घेतलं तिला म्हटलं हा जर स्वतःच्या आईवर संशय घेतोय तरी उद्या तुझं काय चुकलं तरकाय होईल..... काही तासाच्या चर्चेनंतर मुलाला स्वतःची चूक कळाली....मला काही वेळा त्याला धमकी पण द्यावी लागली... तो आईला घेऊन जायला तयार झाला तेथूनच आई त्यांच्याबरोबर मुलाकडे चालली होती..... सगळेजण बाहेर पडले आई घाई गडबडीत माघारी आली पर्स मधून पाचशेच्या काही नोटा बाहेर काढल्या अन म्हणाली सर तुमची फी घ्या.... मी हसून म्हणालो आयुष्यात खूप कामं केलीत... आज आयुष्यातील सगळ्यात चांगल कामं हातून घडलंय फी नको पण पुण्याला आल्यावर तुमच्याकडे नक्की जेवायला येईल... डोळ्याच्या कडा पानावलेली आई.... मुलाबरोबर निघून गेली... खूप समाधान वाटलं...मी एका प्रॉब्लेम सॉल केला या पेक्षा हे आई नावाचं रसायन काय असतं हे कोडं या जन्मात तरी सुटणार नाही....


मच्छिन्द्र टिंगरे बारामती...9527547547


टीप : अनेक जन माझा लेख व्हायरल करतात परंतू नावं नंबर काढल्यामुळे.. मी जर अजून कोणाला मदत करू शकलो तर त्या लोकांना माझा संपर्क होतं नाही कृपया.. शेअर करताना... जसाच्या तसा करा...

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...