Showing posts with label कर्तव्य. Show all posts
Showing posts with label कर्तव्य. Show all posts

Tuesday, May 2, 2023

सोबत

सोबत..



आपल्या आयुष्यात खुप चांगली माणसं असतात,त्यापैकी कित्येक माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.पण त्यांच प्रेम आपल्याला समजायला खुप वेळ जातो आणि समजलं तरी आपण ते गृहीत धरतो.

यामध्ये प्रामुख्याने आपल्या घरातील माणसं,जवळचे मित्र असतात. आपले आई वडील, आज्जी आजोबा आणि घरातील इतरं सगळे. म्हणजे आपली माणसं जी आपल्यावर प्रेम करतात. ती शब्दात सांगत नाहीत त्यांच आपल्या वर किती प्रेम आहे ते आपल्यासाठी काय करतात पण ते प्रेम,काळजी त्यांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्यासोबतच्या अनुभवातून समजत जातं आणि हे तेव्हा जास्त प्रकर्षानं समजतं आणि जाणवतं जेव्हा ती माणसं आपल्याजवळ नसतात. त्यावेळी त्यांची खरी उणीव भासत असते. त्यांच्या आठवणी दाटून येतात आणि वाटतं आपण त्या माणसांसाठी खूप काही करायला हवं होतं. पण ते राहुन गेल्याची खंत कायम मनात सल बनून राहते.

जी माणस आयुष्यात असण्यानं जितका फरक पडतो, त्यापेक्षा त्या माणसांच्या नसण्यानं फरक पडतो.

मग आता जी माणसं आपल्याजवळ आहेत, ज्याचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे.

त्यांच्याशिवायच आयुष्याची आपण कल्पना नाही करु शकत. अशा माणसांसाठी आपण काय करू शकतो??

मला वाटतं आपण या माणसांना प्रेम देऊ शकतो. त्यांच्या प्रेमाचा आदर करु शकतो. त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो जे त्यांना आनंद देऊन जाईल.

ती माणसं आपल्याजवळ नसताना त्यांच्या आठवणीत खंत व्यक्त करण्यापेक्षा, ते आपल्याजवळ आहेत तोवर त्यांना निस्सीम प्रेम,आनंद आणि आदर दिला तर आपल्यातील प्रेम शब्दात व्यक्त करावं लागणार नाही, आणि खंतही राहणार नाही.


आयुष्य खूप सुंदर आहे तितकंच ते खूप छोटं आहे. ते जगताना आपण इतकं व्यस्त होतो की खरं जगणंच विसरून जातो. ज्या माणसांसाठी सगळं काही करतो.त्यांच्यासोबतचे सुंदर क्षण मिळवायचं मात्र विसरतो.


त्यामुळे जेव्हा ते आपल्यासोबत आहेत, तेव्हा त्यांच्यासोबतच जगणं भरभरून जगायला हवं


✍️ वसुधा इंगळे.

Saturday, February 25, 2023

बायकांची बुद्धिमत्ता

बायकांची बुद्धिमत्ता


बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी - भाजी - वरण - भात - कोशिंबीर - चटणी - उसळ वगैरे वगैरे, तसेच लाडू - चिवडे - मिठाया - पक्वान्न वगैरे वगैरे बनत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं? गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी - जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 

- पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

- एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

- ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

- प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

- दूध तापत असताना, कुकर मध्ये डाळ शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा गदागदा हलवून येणे हा (मला अस उठवाव लागत काम करत असताना ) वेळेचा हिशोब कसा करायचा?

- मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

- पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?

- उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

- वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे.

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, प्रसंगी पूर्ण अशिक्षित असुन स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकाच्या  हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?

 निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. 

किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.🌿🌾


✍️वसुधा इंगळे

Wednesday, February 8, 2023

प्रेम

 प्रेम



प्रेमाचे दिवस साजरे करून काही होत नाही , आपला जोडीदार शेवटच्या श्वासापर्यंत सोबत जपता यावा बस इतकचं .🥰❤️ सोबत वाटचाल करत आयुष्याची सांजवेळ यावी.नाते जुळले मनाशी मनाचे ,उगाच नाही जन्मलो आम्ही .फेरे आमचे गत जनमाचे, बळ मिळाले तेव्हा आम्हा संकटाशी झुंजण्याचे ,वचन दिले एकमेका जीवनभर साथ देण्याचे....कुठल प्रॉमिस,कुठला डे,कधी जाणंवलच नाही काय असत मिस यू,लव्ह यू,शेवटचा श्वासअसेपर्यंत तू माझा मी तुझी होऊ काठी आधाराची.जगू असे की मरणाला ही आव्हान देवूनी पुन्हा परतण्याची आस घेवूनी......झाली आता सांजवेळ तुझ्या माझ्या संसाराची,घेवून हात हाती चल जावू पैलथडी.......

Wednesday, February 1, 2023

बाप

बाप

दोन पाऊलं चालल्यावरही थकणारे पाय जेव्हा वडिलांसाठी काही खास खरेदी करायला दोन तासही चालायला तयार असतात तेव्हा कळतं.. "बाप" माणूस नजरेतून आणि शब्दांतून नाही.. तर मनातून सुरू होऊन रक्तापर्यंत भिनलेला असतो..!

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...