Showing posts with label पक्षी. Show all posts
Showing posts with label पक्षी. Show all posts

Sunday, August 24, 2025

आपलं त्रिकूट

 आपलं त्रिकूट


पहाटेचा गारवा अजून अंगावर होता. अचानक माझे डोळे उघडले आणि मी बाल्कनीत जाऊन उभी राहिले. हवेतला तो शुद्ध सुगंध, पहाटे ची शांतता, आणि समोर आकाशात इंद्रधनुष्य, पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांच्या फांद्यांवर चमकणारं कोवळं ऊन – मन अगदी प्रसन्न झालं.



"टीटू, बघ हा कावळा…" मी माझ्या पोटाला हलकेच हात लावून म्हणाले.

इतक्यात समोरच्या बाल्कनीत एक कबूतर फडफडत आलं. शेजारच्या झाडावर खारूताई खेळत होती. आणि दूरवरून कोकिळेचा गोड आवाज कानावर आला.

“हा बघ, किती सुंदर पक्षी आहे, सगळे तुला भेटायला आलेत,” मी टीटूला अस सांगत होते.


कुंडीतल्या गुलाबाच्या झाडाला लालचुटुक फुलं आली होती. मी तेही बाळाला दाखवलं. इतक्यात अहो म्हणजे, "पतीराज" बाल्कनीत आले आणि हसत म्हणाले, दोघ सकाळी सकाळी काय करत आहेत बाल्कनीत,आणि त्यांनी सुध्दा बाळाला आवाज दिला.

“गुड मॉर्निंग, टीटू!” आणि आम्ही सगळे कोवळं ऊन अंगावर घेत घरात आलो.




नाश्त्याची वेळ झाली. रोजच्याप्रमाणे "अहो"म्हणाले,

“टीटू, चल नाश्ता करायला. मम्माने इडली केली आहे, तुला आवडेल ना?”

आम्ही दोघं बसलो. नाश्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे पोटावर हात ठेवून मी बाळाशी गप्पा मारायला लागले.

“कालची सर्कस आवडली का तुला? पुन्हा जाऊया का बघायला?” अजून अशा बऱ्याच गप्पा झाल्या.


बोलता बोलता घरातली कामवाल्या ताई आल्या. तिने आपलं नेहमीचं काम केलं – भांडी, साफसफाई – आणि निघून गेली. मी पुस्तक वाचायला घेतलं, पण मन लागत नव्हतं. अहो म्हणाले,

“काय झालं? सकाळपासून शांत आहेस. काही त्रास होतोय का? डॉक्टरकडे जायचं का?”

मी हसून टाळलं, “नाही वो, सगळं ठीक आहे.”


तेवढ्यात शेजारचा लहान मुलगा "श्री" धावत आला.

“अँटी, तुम्ही बनवलेली इडली मस्त होती!” मी "थँक्यू" म्हणायला आलो. असं म्हणत गप्पा मारून तो निघून गेला.



पण माझं मन मात्र बेचैन होतं. अहो नि पुन्हा विचारलं काय झालं. कोणी काही बोलल का. आणि चटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हळू आवाजात म्हणाले,

“सकाळपासून टीटूची काहीच हालचाल होत नाहीये. किती बोलते आहे मी, किती प्रेमाने हाक मारते आहे, तरीही तो शांत आहे.”


अहो माझा हात धरून म्हणाले,

“चल, मी बोलतो त्याच्याशी.”

ते पोटावर हात ठेवून हसत म्हणाले,

“अरे टीटू, काय झालं? मम्मा किती बोलतेय तुला, आणि तू उत्तरच देत नाहीस! सर्कस आवडली नाही का? की आपण दुसरीकडे फिरायला जाऊ? चल ना रे, आमच्याशी बोल.” तू आत मध्ये ठीक आहेस ना, इडली आवडली नाही का तुला.


खूप वेळ गप्पा मारल्या नंतरही पोट शांत होतं. मी रडत म्हणाले,

“आपण बाळाबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. कुणाला काहीच माहिती नाही द्यायची बाळाची".


इतक्यात अचानक पोटात हलकासा स्पर्श जाणवला – जणू टीटूने होकार दिला. माझे डोळेच पाणावले.

अहो हसत म्हणाले,

“बघ, टीटू ऐकतोय! म्हणतोय की मम्मा-डॅडी, माझ्याबद्दल कुणाला काही सांगू नका. आपलं त्रिकूट आहे ना? मग आपले गुपित ही फक्त आपल्यातच राहू द्या.”


आम्ही दोघंही एकमेकांकडे बघून हसलो. त्या क्षणी असं वाटलं – माझ्या मनात रंगीत कारंजं उडालं. एवढ्या लहानशा हालचालीत ही किती प्रेम दडलेलं असतं!


"श्री" घरी आला की टीटू नेहमी हलके हलके हालचाल करत असतो. जणू त्याला श्रीच्या गप्पा आवडायच्या.

तो मला म्हणायचा “अँटी, तुम्ही जसं वेगवेगळं खायला बनवता तसं मम्मी नाही बनवत, मम्मी सारखी खिचडीत बनवते. खूप निरागस होता. श्री माझ्या "टीटू" चा पहिला "मित्र".


पण आम्ही मात्र निश्चय केला होता – बाळाचं गुपित फक्त आमचं. बाळाची मस्ती, हालचाल, बाळाचं रात्री जाग राहणं, याबद्दल आम्ही कुणाशीही बोलत नाही.

कारण ते आमचं छोटंसं गुपित होतं… आमचं आणि आमच्या टीटूचं.


 *हा प्रसंग मम्मा डॅडी आणि पोटातल्या बाळाच्या गोड नात्याचा आहे* – एक अदृश्य बंध ज्यात प्रेम आहे, काळजी आहे आणि एक खास गुपित ही आहे.



✍🏻वसुधा इंगळे.

Monday, February 13, 2023

योगदान फाऊंडेशन

योगदान फाऊंडेशन





शेतकरी आणि पक्षी यांचे जवळपास जवळचे नाते  शेतामध्ये कीड नियंत्रण राखण्यासाठी निसर्ग मार्फत पक्ष्यांची मोठी मदत मिळते.

भारतीय उपखंडात जवळपास तीस हजार प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारची वनस्पती जिवंत राहणार नाही अनेक कीटक (अळ्या) दिवसातून दोन वेळा त्यांच्या वजना इतकेच अन्नग्रहण करतात. कोवळी पाने खाणाऱ्या आळ्या 24 तासात त्यांच्या वजनाच्या 200 पट अन्न खातात. टोळ ज्याप्रमाणे त्यांच्या खाण्याच्या असाधारण पणासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ते मुबलक प्रजोत्पादनासाठी   प्रसिद्ध आहे त्यांचा गट कधीकधी इतका मोठा असतो की तो काही तासातच एका बहादार झाडांचे रूपांतर निरूपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो. मादी टोळी जमिनीमध्ये एका  कोषात साधारणपणे शंभर अंडी घालते तर एक मादी अनेक कोष तयार करते.


कीटकांचे हे वाढते प्रमाण आणि अन्नरुपात  वनस्पती भक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता कीटकांची संख्या एका विशिष्ट / ठराविक प्रमाणात नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि पक्ष्या मार्फत हे काम निसर्गात केले जाते . सामान्यपणे वनस्पती साठी विशेषत: शेतातील पिकासाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांचा समावेश पक्षांच्या अन्नामध्ये होतं त्यामुळे अनेक प्रजातीचे पक्षी फक्त किटकांनाच खात नाहीत तर त्यांची अंडी ही मोठया प्रमाणावर फस्त करतात त्यामुळे वेगवेगळया अवस्थेतील कीटक उदा . अंडी ,अळी ,कोष पूर्ण कीटक पक्ष्यांकडून खाल्ले जाते.

दरवर्षी हिवाळ्यात कीटकांची एक नवीन पिढी तयार होत असते भोरड्या आणि मैना हे पक्षी त्याच ऋतूमध्ये हिमालयातून लाखोंच्या संख्येने देशातील वेगवेगळ्या भागात येतात आणि ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांना घातक ठरणाऱ्या कीटकाच्या टोळ्या आणि आळ्या खाऊन किडीपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात , किडी पासून पिकांचे  संरक्षण करणाऱ्या पक्ष्यांमध्ये कावळे, निळकंठ यासारख्या पक्षांचाही समावेश होतो . शेतीसाठी घातक असणारे कीटक, गवतातील बिया इत्यादींपासून संरक्षण करण्याचे काम प्रोढ फिंचेस व सुगरण ,चंडोल, चिमण्या, वटवटे या जातीचे पक्षी करतात.प्रोढ फिंचेस व सुगरण या जातीचे पक्षी पिकावरील आळ्या व अंडी  यांच्या पिल्लांना भरवतात तसेच शेतातील गवताच्या बिया खाऊंन ते तणांचा  वाढता प्रसार थांबवता.

पोकळ्या पवर्गातील पक्षी ही गव्हावरील कीड नियंत्रणात  महत्त्वाची भूमिका बजावतात. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पिका वर ज्या किडीचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो त्यावर हे पक्षी उदरनिर्वाह करतात . वटवटे जातीचे पक्षी ऊस पिकातील कीटक खातात.


बुश चॅट, खाटीक, कोतवाल ,वेडा राघू हे पक्षी पिकाभोवती दिवसा  वेगवेगळ्या कीटकांना खाताना आढळतात पांढरा करकोचा ,शराटी यासारखे पक्षी जमिनीत वेग वेगळे कीटक  पायाने उकरून खात असतात. 


पक्ष्यांच्या अन्नातील कीटकांचे प्रमाण पाहिल्यास असे लक्षात येते की भोरड्या ची एक जोडी 24 तासात 370 वेळा घरट्याकडे अन्न घेऊन येते त्यामध्ये  अळी, टोळ ,नाकतोडे असे विविध कीटक असतात. भोरड्या च्या घरट्यात आणल्या जाणाऱ्या अन्नाचे वजन त्या त्या भोरड्या च्या वजनाइतके असते असे निरीक्षणावरून  लक्षात आले. 


सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षी तज्ञ डॉ. डब्ल्यू इ कोलिंग यांच्या मतानुसार एक चिमणी एका दिवसात 220 ते 260 वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन येते ज्यामध्ये वेगवेगळ्यां अळ्यांचा व इतर कीटकांचा समावेश असतो.

एका जर्मन पक्षी तज्ञाने अंदाज मांडलेला आहे की टोपीवाला या पक्ष्यांची एक जोडी तिच्या पिल्ला सह एका वर्षात कमीत कमी 120 दशलक्ष कीटकांची अंडी किंवा 1लाख 50 हजार अळ्या आणि कोष नष्ट करते . यावरून असे लक्षात येते की कीटकांच्या वाढीवर व कीटकांमुळे होणाऱ्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रीत्या पक्ष्यांची मदत होते निसर्गातील अन्नसाखळीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. बिहार राज्यातील पुसा येथील अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मधील सी डब्ल्यू मॅसन आणि एच मॅक्सवेल लेफ्रॉम  कीटक शास्त्रज्ञांनी भारतातील पक्ष्यांचे अन्न या विषयावर विसाव्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले त्याच त्यांना असे आढळून आले की शेतातील पिकावर येणारे अनेक पक्षी असे आहेत की ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकावरील कीड आणि कीटक  हे आहे तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. 

घुबडांची व इतर निशाचर पक्ष्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात उंदरावर होत असते त्यामुळे गरुड, घुबड, पिंगळा यासारखे विविध शिकारी पक्षी शेतीसाठी किंबहुना शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत.शृंगी  जातीचे घुबड एका रात्रीत एक किंवा त्यापेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खात असतात. घुबडांची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळपास एक हजार कुरतडणाऱ्या प्राण्यांना खात असतात त्यामुळे घुबड शेतकऱ्यांचे खरे मदतनीस आहे.


काही वनस्पतींच्या प्रजाती साठी सूर्यपक्षी हे महत्त्वाचे पराग वाहक  आहेत आपल्या परिसरातील ज्वारी ,बाजरी ,सूर्यफूल यासारख्या फुलोरा अवस्थेत बरेच पक्षी कणसावर  बसून त्या ठिकाणी असणारे कीटक खात असतात त्या वेळी त्यांच्या वजनाने ते कणीस इतर  कणसा वरती आपटते व परागी भवन घडून येते यामध्ये सुगरण, सातभाई, वटवटे यासारखे पक्षी मोलाची मदत करतात.

पक्षी संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी ही पुढाकार घ्यावा तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पक्ष्यांसाठी पिण्याची पाण्याची सोय करावी असे योगदान फाउंडेशन च्या वतीने आव्हान करण्यात येते . निसर्गातील पक्ष्यांचे महत्त्व  सर्वांनी जाणून घ्यावे. पक्ष्यांमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो बीज प्रसार होतो आणि निसर्गाची सुंदरता राखली जाते. पक्षी संवर्धन व निसर्ग संवर्धन कार्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा.🙏🐦🐦


योगदान फाऊंडेशन

https://youtube.com/channel/UCTFOGpA6sVFKB8rGJP_HVMw


टिटवाळा.


निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...