Friday, September 29, 2023

मुंबई लोकल आणि लोकल मधले नियम

 मुंबई लोकल आणि लोकल मधले नियम!



महिलांच्या डब्यात चढताना तर खूप मारामारी असते. आधीच लोकलच्या दरवाज्यात उभ्या राहिलेल्या महिलांना धक्काबुकी करून आत कसं बसं शिरायचं असतं. त्यात ठाण्याला उतरणाऱ्या महिलांची गर्दी जास्त असेल तर मग काही खरंच नाही. अशात आतमध्ये गेलं तर दररोजचा प्रवास करणाऱ्या महिलांचा एक ग्रुप तयार झालेला असतो. यातल्या महिला आपापल्या मैत्रिणींच्या जागा आधीच बुक करून ठेवतात. मग ती मैत्रीण आरामात चढून आली तरी तिच्या बसण्यासाठी जागा तयार असते. तिच्या अगोदर धावपळ करत चढलेल्या महिला किंवा मुली वेड्याच, असं वाटू लागतं. यावरून कधी कधी वादही होतो. पण, तो महिलांचा एक ग्रुप असल्यामुळे वाद घालणारी एकटी महिला त्यात मात्र अपयशी ठरते.

दुसऱ्या बाजूला महिलांच्या डब्यात चढल्यानंतर कोणी ठाणे आहे का? कोणी घाटकोपर आहे का? कोणी कुर्ला आहे का? तुम्ही कुठे उतरणार? असं एकमेकींना विचारावं लागतं. बोलणाऱ्याची मातीही विकली जाते अन् न बोलणाऱ्याचे सोनं विकलं जात नाही अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती असते. ज्या महिलेनं एखादी जागा विचारली नाही, तर तिला मात्र शेवटपर्यंत उभं राहून प्रवास करावा लागतो. जर नशीब चांगलं असेल तर मग चौथी सीट मिळते.


या चौथ्या सीटवरून आठवलं. महिलांच्या डब्यातली चौथी सीट म्हणजे मौल्यवान जागा म्हणायला काही हरकत नाही. या जागेवरून सर्वात जास्त वाद होतात. जर ती जागा दिली नाही तर मात्र तुमची खैर नाही आणि जरी ती जागा दिली तर मग ‘थोडं अजून सरका’ यावरून कधी कधी जोरजोरात वाद होताना पाहिले आहेत. 


पुरुषांच्या डब्यात जर एखादा व्यक्ती सीएसएमटीपासून बसून आला तर त्यानं ठाण्याला उठून उभ्या असलेल्या व्यक्तीला स्वतःची जागा देणं. पुरुषांच्या डब्यात महिल्यांच्या डब्याप्रमाणे कुठे उतरणार असं विचारलं जात नाही. जी व्यक्ती दोन सीटच्यामध्ये येऊन पहिली उभी राहील, त्या व्यक्तीला पहिली रिकामी जागा मिळते. याशिवाय फर्स्ट क्लास डब्यात ही वेगळे नियम असतात. 


बहुतांश वेळा महिलांना पुरुषांच्या डब्ब्यात सॉफ्ट कॉर्नर मिळतो म्हणून महीला चक्क पुरुषांच्या डब्यात प्रवास करताना दिसतात..


शिवाय प्रत्येक डब्यात आपल्या प्रेयसीला बिनपगारी झेड सुरक्षा देऊन दरवाजा नजदीक एक तरी प्रियकर असतोच. मग तिकडे गर्दीत कोणी ट्रेन मधून पडून मरो अथवा काय होवोत यांना आपली प्रेयसीला सुरक्षित करायचं असतं.



 आयुष्यात ज्या क्षणी तुमच्याकडून चूक घडली आहे असं वाटतं त्याक्षणी तुम्ही त्या व्यक्तीला सॉरी म्हणू शकलात, तरच तुम्ही ते नातं वाचवू शकता.. तरच तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वास परत मिळवू शकता.. 

जितका चूक मान्य करायला उशीर होत जातो, तितका त्या नात्याला ओरखडा पडत जातो, आणि सॉरी नाहीच निघालं तोंडातून, तर विश्वास पण संपतो एवढं नक्की.. विश्वास संपला की नातं देखील संपते... 

अर्थात यासाठी प्रचंड कठोर आत्मपरीक्षण लागते.. समोरच्याने चूक दाखवल्याबरोबर तिथल्या तिथे सॉरी म्हणण्याचा मनाचा मोठेपणा लागतो.. आणि त्या माणसाला जो काही त्रास तुमच्या चुकीमुळे झालेला असतो, त्यासाठी त्याचे जे काही तळतळाट लागलेले असतात ते देखील निघून जातात.. अवघड वळणावर आलेलं नातं नव्याने पुढे जाऊ शकते..


निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...