Showing posts with label आलिंगन. Show all posts
Showing posts with label आलिंगन. Show all posts

Wednesday, March 22, 2023

मिठी

 मिठी.....


दिवसभर घड्याळ्याचा काट्याप्रमाणे आयुष्याचे रूटीन बसवता बसवता इतके थकून जातो आपण की कधीतरी अश्यावेळी घरी आल्यावर काही करायची इच्छाच उरत नाही….


त्याक्षणी अचानक येऊन जेव्हा तो किंवा ती आपल्याला मिठीत घेते तेव्हा ती मिठी किती सुखदायक असेल ना..!!!


दिवसभरात झालेला सगळा शिण निघून जावा,विरघळून जावा इतकी गोड असते ती मिठी…अगदी आयुष्यभर मिठीत राहावे इतकं सुंदर सुख असतं त्या मिठी मध्ये…


आयुष्यात एकवेळ पैसा,ऐशोआराम या गोष्टी नसल्या तरी चालतील पण आपल्या हक्काचा एखादा तो किंवा ती असायलाच हवी…आयुष्यात एखादी अशी हक्काची अनपेक्षित मिठी असायलाच हवी कारण या अनपेक्षित गोष्टीचं खास असतात…


या अनपेक्षित गोष्टीचं नात्यामध्ये असलेली विण अधिक घट्ट करत जातात नव्याने दरवेळी…❤️


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...