Showing posts with label आदर. Show all posts
Showing posts with label आदर. Show all posts

Wednesday, August 2, 2023

स्त्री online राहते

 स्त्री online राहते



पुरुष online असले तर अभिमानाची गोष्ट ..पण बायका online असल्या की आभाळ कोसळते..त्यांच्यावर jokes टाकले जातात..चर्चेचा विषय होतो...पण तरिही...स्त्री online राहते..


होय मी online राहते....

सर्वांशी connected राहायला 

एकमेकांशी बोलायला 

हितगुज करायला🤗 

सुख दुःख जाणायला


होय मी online राहते ....

शुभेच्छासंदेश द्यायला 

कोडकौतुक करायला 😘

चांगले विचार घ्यायला 

कधी खळखळून हसायला 😂


होय मी online राहते...

विचारांना वाट द्यायला 

पोस्टस् ला प्रतिसाद द्यायला 

अनेकांशी संवाद साधायला

अनोळखींशी नाते जोडायला👫


होय मी online राहते...

भावना व्यक्त करायला 

मनातील कल्ला थांबवायला

मनाप्रमाणे जगायला 💃


" इतराचा दृष्टीकोन आणि त्याची मानसिकता"


 1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते. ती तुमच्या विचारांना सलाम करते...


2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. की ती तुम्हाला लाईक करते....ती तुमचं कौतुक करते......


3) एक स्त्री तुमच्याशी बोलते चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. .....ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...


4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...


जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.

प्रत्येक स्त्री चा आदर करा.


✍️वसुधा इंगळे

Tuesday, May 2, 2023

सोबत

सोबत..



आपल्या आयुष्यात खुप चांगली माणसं असतात,त्यापैकी कित्येक माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.पण त्यांच प्रेम आपल्याला समजायला खुप वेळ जातो आणि समजलं तरी आपण ते गृहीत धरतो.

यामध्ये प्रामुख्याने आपल्या घरातील माणसं,जवळचे मित्र असतात. आपले आई वडील, आज्जी आजोबा आणि घरातील इतरं सगळे. म्हणजे आपली माणसं जी आपल्यावर प्रेम करतात. ती शब्दात सांगत नाहीत त्यांच आपल्या वर किती प्रेम आहे ते आपल्यासाठी काय करतात पण ते प्रेम,काळजी त्यांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्यासोबतच्या अनुभवातून समजत जातं आणि हे तेव्हा जास्त प्रकर्षानं समजतं आणि जाणवतं जेव्हा ती माणसं आपल्याजवळ नसतात. त्यावेळी त्यांची खरी उणीव भासत असते. त्यांच्या आठवणी दाटून येतात आणि वाटतं आपण त्या माणसांसाठी खूप काही करायला हवं होतं. पण ते राहुन गेल्याची खंत कायम मनात सल बनून राहते.

जी माणस आयुष्यात असण्यानं जितका फरक पडतो, त्यापेक्षा त्या माणसांच्या नसण्यानं फरक पडतो.

मग आता जी माणसं आपल्याजवळ आहेत, ज्याचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे.

त्यांच्याशिवायच आयुष्याची आपण कल्पना नाही करु शकत. अशा माणसांसाठी आपण काय करू शकतो??

मला वाटतं आपण या माणसांना प्रेम देऊ शकतो. त्यांच्या प्रेमाचा आदर करु शकतो. त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो जे त्यांना आनंद देऊन जाईल.

ती माणसं आपल्याजवळ नसताना त्यांच्या आठवणीत खंत व्यक्त करण्यापेक्षा, ते आपल्याजवळ आहेत तोवर त्यांना निस्सीम प्रेम,आनंद आणि आदर दिला तर आपल्यातील प्रेम शब्दात व्यक्त करावं लागणार नाही, आणि खंतही राहणार नाही.


आयुष्य खूप सुंदर आहे तितकंच ते खूप छोटं आहे. ते जगताना आपण इतकं व्यस्त होतो की खरं जगणंच विसरून जातो. ज्या माणसांसाठी सगळं काही करतो.त्यांच्यासोबतचे सुंदर क्षण मिळवायचं मात्र विसरतो.


त्यामुळे जेव्हा ते आपल्यासोबत आहेत, तेव्हा त्यांच्यासोबतच जगणं भरभरून जगायला हवं


✍️ वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...