Tuesday, December 30, 2025

३० डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 " ब" अक्षराने सुरू होणारे शब्द


प्रस्तावना

अक्षरानुसार शब्द ओळखणे आणि त्यांचा उपयोग समजणे ही भाषेतील महत्त्वाची कौशल्ये आहेत. “ब” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती सहज शिकवतात. प्रस्तुत प्रश्नसंचात बेट, बहिर्जी, बचत, बक्षीस, बुरूज अशा विविध क्षेत्रांशी संबंधित शब्दांचा समावेश केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि त्यांच्या निरीक्षणशक्तीला चालना मिळते.


१.जमिनीचा असा भाग जो चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो?

बेट (Island)



२.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

बहिर्जी (बहिर्जी नाईक).



३.एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या व्यापारावर किंवा व्यवहारावर घातलेली बंदी?

बहिष्कार 



५.जुन्या काळी किल्ल्याच्या भिंतीवर बांधलेला तो भाग जिथून शत्रूवर तोफा डागल्या जात?

 बुरूज 



६.शाळेत एखाद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यावर जे गौरव म्हणून दिले जाते, त्याला काय म्हणतात?

बक्षीस



७.भविष्यातील गरजांसाठी आपण जे पैसे खर्च न करता बाजूला साठवून ठेवतो, त्याला काय म्हणतात?

बचत



८.चहा पिताना कप गरम लागू नये म्हणून कपाच्या खाली काय ठेवले जाते?

बशी


९.आपण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणत्या ठिकाणी जातो?

बँक



१०.स्वयंपाकघरात लोणचे, साखर किंवा इतर वस्तू साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या पात्राला काय म्हणतात?

बरणी



१०.लहान मुलांना खेळायला आवडणारी गोल वस्तू?

बॉल 


निष्कर्ष

या प्रश्नसंचामुळे विद्यार्थ्यांना “ब” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख झाली. इतिहास, आर्थिक व्यवहार, स्वयंपाकघरातील वस्तू आणि भूगोल याबाबतची माहिती सहजपणे मिळाली. अशा प्रकारच्या अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषेचा अभ्यास अधिक रंजक व उपयुक्त बनवतात, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व शब्दसंपत्ती यांचा विकास करतात.

✍🏻वसुधा इंगळे.




" ब" अक्षराने सुरू होणारे शब्द (३०डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे 

१.सागर जाधव

२.स्वाती रंधे 

३.स्वाती पाटेकर 

४.तनुश्री बोदडे 

५.निकिता गावडे 

६.राजेश्री भोसले 

७.सविता चौगुले 

८.संगीता शिंदे 

९.शारदा सासणे 

१०.प्रिया महाडिक 

११.हर्षाली चव्हाण

डिसेंबर

 डिसेंबर


प्रस्तावना

डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असून तो फक्त काळाचा मापक नाही, तर विचार करण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची संधी देखील आहे. हा महिना आपल्याला वर्षभर घडलेल्या घटनांकडे, मिळालेल्या अनुभवांकडे व आपल्या चुका आणि यशांकडे मागे वळून पाहायला लावतो. त्यातून आपल्याला शिकण्याची संधी मिळते आणि आपण आपले ध्येय, निर्णय आणि जीवनातील मूल्यांचा आढावा घेऊ शकतो.



वर्ष संपत आलं की डिसेंबर एखाद्या पुस्तकाच्या शेवटच्या पानासारखा वाटतो. ते पान न वाचताच पुस्तक बंद करता येत नाही, कारण त्यातच संपूर्ण वर्षाचा सारांश दडलेला असतो—काय घडलं, काय सुटलं, काय हरवलं आणि काय उमगलं.

डिसेंबर आपल्याला थांबवतो, क्षणभर मागे वळून पाहायला लावतो. आपण काय शिकलो, कशाला घट्ट धरून ठेवलं आणि कशाला शांतपणे सोडून दिलं, याचे प्रश्न विचारतो.

हा महिना बदल घडवत नाही; पण समज वाढवतो. आणि कधी कधी ही समजच सगळ्यात मोठा बदल ठरते.

म्हणूनच शेवटचं पान समजून घ्यायचं असतं, जपून ठेवायचं असतं—

एका नव्या पुस्तकाची सुरुवात करण्याआधी.


निष्कर्ष

डिसेंबर आपल्याला थांबून विचार करण्याची आणि समज वाढवण्याची प्रेरणा देतो. वर्षभरच्या अनुभवांचे सारांश घेतल्यावर आपण काय धारण करणार, काय सोडणार आणि काय सुधारायचे, हे ठरवू शकतो. हा महिना बदल घडवत नाही, पण विचार आणि समज यांचा बदल घडवतो, जे पुढील वर्षासाठी नवीन सुरुवात करण्यास साहाय्य करतो. त्यामुळे डिसेंबर हा फक्त शेवट नाही, तर नवीन सुरुवातीची तयारी करण्याचा काळ आहे.


✍🏻वसुधा इंगळे.

Monday, December 29, 2025

२९ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "फ" अक्षराने सुरू होणारे शब्द 


प्रस्तावना

अक्षरानुसार शब्द ओळखणे ही भाषा शिकण्याची एक मजेदार आणि उपयोगी पद्धत आहे. “फ” अक्षराने सुरू होणारे शब्द दैनंदिन जीवनातील, खेळ, अन्नपदार्थ, शारीरिक ज्ञान आणि परंपरेशी निगडित आहेत. प्रस्तुत प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना फळे, फुफ्फुस, फोडणी, फुटबॉल अशा विविध शब्दांची माहिती मिळते, ज्यामुळे त्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि निरीक्षणशक्ती सुधारते.


१.झाडाच्या कोणत्या भागापासून आपल्याला बी मिळते आणि जो भाग आपण खातो?

 फळ


२.सापाने जेव्हा आपला गळा मोठा केलेला असतो, तेव्हा त्याला काय म्हणतात?

 फणा


३.आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीराच्या कोणत्या भागात जाते? (Lungs)

 फुफ्फुस


४.शेतामध्ये कीटकनाशकं साठी केली जाते?

फवारणी


५.लग्नामध्ये परंपरे नुसार डोक्याला घालतात?

फेटे


६.कंगव्याच्या जोडीला थोडी छोट्या आकाराची?

फनी


७.जेवण बनवताना सुरवातीला डाळी ला किंवा आमटीला देतात?

फोडणी


८.या खेळा मध्ये खेळाडू हाताने नाही तर पायाने चेंडू गोलात टाकतो?

फुटबॉल


९.एक असा चित्रपट ज्यामध्ये काळया चिमणीचा शोध घेतला जातो?

फॅन्ड्री


१०.यात हवा भारतात आणि तोंडाने फुगवतात?

फुगा


निष्कर्ष

या प्रश्नसंचातून विद्यार्थ्यांना “फ” अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांची ओळख सहज झाली. जीवनातील विविध क्षेत्राशी संबंधित शब्द शिकल्यामुळे भाषेवरील आत्मविश्वास वाढतो, तसेच दैनंदिन अनुभवांची समज सुधारते. अशा प्रकारच्या अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, प्रभावी आणि उपयोगी बनवतात.


✍🏻वसुधा इंगळे.



 



 "फ" अक्षराने सुरू होणारे शब्द ( २९ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे

१.प्रिया मोरे

२.इंद्रजीत मोरे 

३.प्रिया महाडिक 

४.आरती सोनावणे 

५.वर्षा घेटे 

६.स्वप्नाली राऊळ

७.शारदा सासणे

८.प्रगती धनवटे 

९.कविता पाटील

१०.स्वाती पाटेकर

११.राजेश्री भोसले

१२.सविता चौगुले

१३.निकिता गावडे

१४.संगीता शिंदे

१५.स्वाती रंधे

१६.हर्षाली चव्हाण 

१७.स्नेहल दुर्गे

Sunday, December 28, 2025

२८डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "भ" अक्षराने सुरू होणारे शब्द


प्रस्तावना

भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत अक्षरानिहाय शब्दांची ओळख खूप महत्त्वाची आहे. “भ” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील, ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात भरीत, भवानी, भूकंप, भूजल, भविष्य, भजन, भ्रष्टाचार विरोधी विभाग, भ्रम, भव्यता आणि भाषा अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि निरीक्षण क्षमतेला चालना मिळते.

१.वांग्याला भाजून जो चविष्ट पदार्थ बनवला जातो, त्याला काय म्हणतात?

भरीत (वांग्याचे भरीत).


२.शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते?

भवानी (भवानी तलवार).



३.पृथ्वीचा पृष्ठभाग हादरण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात?

भूकंप (Earthquake)


४.जमिनीखाली असलेल्या पाण्याच्या साठ्याला काय म्हणतात?

भूजल (Groundwater)


५.एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे नशिबात काय लिहिलेले आहे, याला काय म्हणतात?

भविष्य (Future)



६.देवाला किंवा संतांना आळवण्यासाठी गायल्या जाणाऱ्या गाण्यांना काय म्हणतात?

भजन


७.भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या सरकारी विभागाला (ACB) मराठीत काय म्हणतात?

भ्रष्टाचार विरोधी विभाग.


८.मनात निर्माण झालेला संशय किंवा चुकीची समजूत म्हणजे काय?

भ्रम (Confusion)


९.एखाद्या गोष्टीचा खूप मोठा विस्तार किंवा तिचे भव्य स्वरूप?

भव्यता


१०आपल्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या माध्यमाला काय म्हणतात? (उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी)

भाषा


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “भ” अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांची ओळख सहज झाली. विविध क्षेत्राशी संबंधित शब्द शिकल्यामुळे त्यांचे ज्ञान वाचक, ऐकणारा आणि विचार करणारा म्हणून विस्तृत होते. अशा प्रकारच्या अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात, तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती यांचा विकास करतात.


✍🏻 वसुधा इंगळे.


"भ" अक्षराने सुरू होणारे शब्द (२८ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.वर्षा घेटे 

२.इंद्रजीत मोरे 

३.राजेश्री भोसले 

४.प्रिया मोरे

५.हर्षाली चव्हाण 

६.सविता चौगुले 

७.शारदा सासणे

८.निकिता गावडे

९.स्वाती रंधे

१०.प्रिया महाडिक 

११.स्वाती पाटेकर

१२.संगीत शिंदे

१३.स्वप्नाली राऊळ

१४.कविता पाटील

१५.स्नेहल दुर्गे

एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत

 

एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत 🌼

काही प्रवास नकाशावर आखलेले नसतात…ते मनात घडतात, भावनांतून जन्म घेतात आणि श्रद्धेपर्यंत पोहोचतात.

लहान बाळाला घेऊन पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करण्याचा विचार आला, तेव्हा आनंदापेक्षा भीतीच जास्त होती. गर्दी, गोंगाट, नवीन चेहरे—हे सगळं तिच्या लहानशा मनाला कसं झेपेल, याचीच काळजी होती. पण कधी कधी मनातल्या शंका बाजूला ठेवून फक्त विश्वासावर पाऊल टाकायचं असतं.

हा ब्लॉग अशाच एका छोट्याशा प्रवासाची कथा आहे—

आईच्या मनातल्या श्रद्धेची, बाळाच्या निरागसतेची,आणि दादर चैत्यभूमीच्या शांततेची.





एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत 🌼

आम्हाला आमच्या लहानशा मुलीला घेऊन ट्रेनने प्रवास करायचा होता. पण प्रवासापेक्षा जास्त गोंधळ मनात होता.

गर्दी बघून ती रडेल का?

ट्रेनमध्ये बसल्यावर अस्वस्थ होईल का?

प्रवास अर्धवट सोडावा लागेल का?

कारण ती अजून खूपच लहान आहे. नवीन चेहेरे, नवीन जागा दिसल्या की लगेच रडते. आजवर तिने मला एकही दिवस माहेरी थांबू दिल नाही—तो विषय वेगळा, पण तिच्या स्वभावाची ओळख देणारा नक्कीच.

माझ्या प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यातली एक आठवण मात्र कायम मनात कोरली गेली आहे. सोनोग्राफी करताना स्क्रीनवर बाळाने हाताची 👌🏻 अशी मुद्रा केली होती—अगदी तथागत गौतम बुद्धांच्या मुद्रेसारखी. तो क्षण पाहून आम्ही दोघेही काही क्षण स्तब्ध झालो होतो.

त्याच काळात माहेरी झालेल्या गर्भमंगल संस्कार विधीत, मी डोळे बंद करून हात जोडले होते. त्या वेळी मला एक विलक्षण भास झाला—जणू माझं बाळ माझ्या मांडीवर बसून शांतपणे हात जोडून 🙏🏻बसलं आहे.

या दोन प्रसंगांनी मनात एक हळुवार भावना रुजली—हे बाळ कधीतरी मला पॅगोडा किंवा दादर चैत्यभूमीपर्यंत नक्की घेऊन जाईल.

ती खूप लहान असल्यामुळे हा विचार मी नेहमी मनातच ठेवला. पण अचानक एक दिवस वाटलं—जाऊया. रडली तर तिथूनच परत येऊ. श्रद्धेला वेळेची अट नसते.

आज तीर्था साडेसात महिन्यांची आहे. ती आता स्वतः बसते, पालथी पडते, खेळताना रांगते. आणि जेव्हा एका कुशीवर विसावते, तेव्हा तिची ती मुद्रा मला नेहमी तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची आठवण करून देते.

मग ठरवलं—आज तीर्थाला दादर चैत्यभूमीला घेऊन जायचंच.

ट्रेनमध्ये ती आधी शांत होती. नंतर आजूबाजूचं सगळं कुतूहलाने पाहत होती. नवीन दृश्यं, नवीन आवाज… जणू सगळं काही ती मनापासून स्वीकारत होती.

चैत्यभूमीला पोहोचताच तीर्था गाढ झोपली.

आम्ही दोघांनी शांतपणे दर्शन घेतलं. थोडी गर्दी होती, पण मनात मात्र विलक्षण शांतता, आणि सकारात्मक ऊर्जा होती. दर्शन घेऊन बाहेर आलो, थोडा वेळ थांबलो… पण तीर्था काही उठेना. शेवटी ठरवलं—आता निघूया. एखादं पुस्तक पाहू, आवडलं तर घेऊ आणि परत जाऊ.

पण ज्या साठी आलो होतो, जिच्या साठी आलो होतो, तो क्षण अपूर्ण कसा राहील?

तीर्था जागी झाली.

मग आम्ही पुन्हा आत गेलो. तिला थोडं निवांत होऊ दिलं, खाऊ घातला. आजूबाजूच्या मुलांकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिचा मूड खुलला… आणि आमचं मनही.

दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.

आत गेल्यावर जेव्हा तिला खाली बसवलं, तेव्हा तीर्था गुडघ्यांवर येऊन स्थिर झाली—जणू तिच्या लहानशा देहबोलीतून नतमस्तक होण्याची भावना व्यक्त होत होती.

आम्ही तीन वेळा पंचांग प्रणाम करत असतानाही ती तशीच होती…

जणू तीही त्या शांततेला वंदन करत होती.

तो क्षण पाहून आम्ही दोघेही शब्दावाचून भरून आलो.

तीर्थाच्या हातून भंतेना दान दिलं.

काही आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या.

आणि मनात खोल, निर्मळ समाधान घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

काही प्रवास अंतराचे नसतात…

ते श्रद्धेचे असतात, भावनांचे असतात, आणि अंतर्मनाला स्पर्श करणारे असतात.

हा प्रवास एक लहान पावलांचा, पण फार खोलवर जाणारा. 🙏🌼


आज मागे वळून पाहिलं, तर जाणवतं—हा फक्त एक प्रवास नव्हता.

तो सकारात्मक ऊर्जेचा होता.

विश्वासाचा होता.

आणि आई–वडील आणि मुलीच्या नात्यात आणखी एक सुंदर धागा गुंफणारा होता.

तीर्थाला काही कळत नव्हतं…

पण तरीही तिच्या लहानशा हालचालींमधून, तिच्या शांततेतून, त्या जागेचा आदर व्यक्त होत होता.

आणि ते पाहताना आमचं मन नकळत नतमस्तक झालं.

कधी कधी देव, धम्म किंवा श्रद्धा मोठ्या शब्दांत नाही तर अशा छोट्या क्षणांत भेटते—

बाळाच्या झोपेत,

त्याच्या हसण्यात,

आणि आपल्या मनात उमटणाऱ्या शांततेत.

हा प्रवास आम्हाला हेच शिकवून गेला—

जेव्हा भावना खरी असते,

तेव्हा वय, वेळ किंवा परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही.


✍🏻वसुधा इंगळे.












२७ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 

"छ" अक्षरावरून सुरू होणारे शब्द 


प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द ओळखणे ही भाषा शिकण्याची एक प्रभावी आणि मनोरंजक पद्धत आहे. “छ” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना घरगुती वस्तू, ऐतिहासिक व्यक्तिरेखा, भूगोल, छायाचित्रण, आवडीनिवडी आणि संस्कृतीशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात छत्री, छप्पर, छाया, छावा, छत्रपती, छायाचित्र, छंद, छळ, छान, छत्रसाल अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि निरीक्षणशक्तीला चालना मिळते.


१.पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण डोक्यावर काय धरतो?

 छत्री


२.घराच्या सर्वात वरच्या भागाला (Top layer) काय म्हणतात?

 छप्पर (किंवा छत)


३.एखाद्या वस्तूची सूर्यप्रकाशामुळे जमिनीवर पडणारी काळी आकृती म्हणजे काय?

छाया (Shadow)


४.शिवाजी महाराजांच्या मुलाचे (संभाजी महाराज) टोपणनाव किंवा त्यांना प्रेमाने काय संबोधले जाते?

छावा (सिंहाचा बछाडा)


५.शिवाजी महाराज यांना राज्याभिषेकानंतर कोणती पदवी मिळाली?

छत्रपती


६.वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात जे फोटो छापलेले असतात, त्यांना काय म्हणतात?

छायाचित्र (Photograph)


७.एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी असलेली मनाची ओढ?

 छंद (Hobby)


८.एखाद्याला जाणूनबुजून त्रास देणे किंवा सतावणे याला काय म्हणतात?

छळ


९.सुंदर दिसणे ला समानार्थी शब्द काय?

छान दिसणे


१०.मस्तानी च्या वडिलांचे नाव काय?

छत्रसाल बुंदेला


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “छ” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख झाली. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित शब्द शिकल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषेचे शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.


✍🏻वसुधा इंगळे.



"छ" अक्षरावरून सुरू होणारे शब्द (२७:डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.वर्षा घेटे 

२.इंद्रजित मोरे 

३.हर्षाली चव्हाण 

४.प्रिया मोरे 

५.स्वप्नाली राऊळ 

६.स्वाती रंधे 

७.निकिता गावडे 

८.राजेश्री भोसले 

९.सविता चौगुले 

१०.संगीता शिंदे 

११.कविता पाटील 

१२.शारदा सासणे 

१३.विधी नागवेकर 

१४.स्नेहल दुर्गे 

१५.आरती सोनवणे 

१६.प्रिया महाडिक


Saturday, December 27, 2025

सावित्रीबाई फुले व स्त्री शिक्षण चळवळ

 सावित्रीबाई फुले व स्त्री शिक्षण चळवळ – प्रश्नमंजुषा (Quiz)

प्रस्तावना

आजच्या प्रश्नमंजुषेत आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्या काळात मुलींना शिकवणे हे मोठे धाडस होते, पण सावित्रीबाई फुले यांनी हे आव्हान स्वीकारून समाजात मोठा बदल घडवून आणला.

🟢 प्रश्नमंजुषा : सावित्रीबाई फुले व शिक्षण चळवळ


1️⃣ भारतातील पहिली मुलींची शाळा कधी सुरू झाली?

उत्तर: १८४८ साली


2️⃣ पहिली मुलींची शाळा कुठे सुरू झाली?

उत्तर: पुणे


3️⃣ मुलींची शाळा सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश काय होता?

उत्तर: स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे


4️⃣ सावित्रीबाई फुले दररोज शाळेत जाताना काय सोबत ठेवत असत?

उत्तर: एक अतिरिक्त साडी

👉 माहिती: लोक शेण, दगड टाकत असत म्हणून.


5️⃣ स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले?

उत्तर: सामाजिक विरोध, अपमान, बहिष्कार


6️⃣ सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण चळवळीमुळे काय बदल झाला?

उत्तर: मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली


7️⃣ सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हे तर आणखी काय होत्या?

उत्तर: समाजसुधारक


8️⃣ विधवा महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी काय कार्य केले?

उत्तर: त्यांच्यासाठी आश्रय व मदतकार्य

👉 माहिती: विधवांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी प्रयत्न केले.


9️⃣ स्त्री शिक्षणामुळे समाजात कोणता सकारात्मक बदल झाला?

उत्तर: स्त्रिया आत्मनिर्भर बनल्या


🔟 सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण चळवळीतील कार्य आजही कशासाठी प्रेरणादायी आहे?

उत्तर: समान शिक्षण हक्कांसाठी

निष्कर्ष

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. शिक्षणामुळेच समाज प्रगत होतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.


📌 ही प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.

📌 पोस्ट आवडली तर शेअर करा.

📌 तुमचं उत्तर किंवा मत comment मध्ये नक्की लिहा.


✍🏻वसुधा इंगळे.

२६ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "क" अक्षराने सुरू होणारे शब्द


प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द ओळखणे हे विद्यार्थ्यांच्या भाषाशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. “क” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील, निसर्ग, साहित्य, शैक्षणिक व शेतकरी जीवनाशी संबंधित माहिती शिकवतात. प्रस्तुत प्रश्नसंचात कविता, काजळ, कपाट, कंदील, काजवा, कुऱ्हाड, कळशी, कात्री, कापूस आणि कमळ अशा विविध शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि निरीक्षणशक्ती सुधारते.

१.ही लयबध्द वाक्यरचना करून भावना व्यक्त केली जाते?

कविता


२.डोळ्यांसाठी वापरले जाणारे सौंदर्यप्रसादन?

काजळ


३.कपडे किंवा इतर सामान ठेवण्यासाठी वापरले जाणारे?

कपाट


४.दिव्याचा एक प्रकार? पूर्वी च्या काळी खुप प्रमाणात वापरला जाणारा?

कंदील


५.रात्री उडतो पण पक्षी नाही, उजेड देतो पण दिवा नाही?

काजवा


६.शेतकरी शेतामध्ये लाकूड तोडण्यासाठी याचा वापर करतो?

कुऱ्हाड 


७.पाणी भरण्यासाठी याचा वापर केला जातो?

कळशी


८.तिला दोन डोळे असतात, आणि तिच्या डोळ्यात बोट घातलं की ती तोंड उघडते?

कात्री


९.वस्त्रनिर्मितीसाठी वापरला जाणारा नैसर्गिक तंतू कोणता?

कापूस


१०चिखलात जन्म घेणाऱ्या फुलाला काय म्हणतात?

कमळ 


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “क” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. साहित्य, सौंदर्य, घरगुती उपयोग, शेतकरी साधने, फुलं व नैसर्गिक वस्तू यांविषयीची माहिती मिळाली. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.

✍🏻वसुधा इंगळे.



 "क" अक्षराने सुरू होणारे शब्द ( २६ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.इंद्रजित मोरे 

२.वर्षा घेटे 

३.प्रिया मोरे

४.राजेश्री भोसले 

५.सविता चौगुले 

६.कविता पाटील 

७.स्वप्नाली राऊळ 

८.निकिता गावडे 

९.प्रिया महाडिक

१०.स्वाती रंधे 

११.शारदा सासणे

११.संगीता शिंदे 

१३.विधी नागवेकर

१४. हर्षाली चव्हाण 

Thursday, December 25, 2025

सावित्रीबाई फुले यांचे जीवन

 सावित्रीबाई फुले  यांचे जीवन 

प्रश्नमंजुषा (Quiz)




प्रस्तावना

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. 

🟢 प्रश्नमंजुषा : सावित्रीबाई फुले


1️⃣ सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

उत्तर: ३ जानेवारी १८३१

👉 माहिती: हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.


2️⃣ सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावात झाला?

उत्तर: नायगाव, सातारा जिल्हा


3️⃣ सावित्रीबाई फुले यांचे पती कोण होते?

उत्तर: महात्मा ज्योतिबा फुले


4️⃣ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोण ओळखल्या जातात?

उत्तर: सावित्रीबाई फुले


5️⃣ सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली?

उत्तर: पुणे

👉 माहिती: १८४८ साली ही शाळा सुरू झाली.


6️⃣ सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रात अग्रणी होत्या?

उत्तर: स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणा


7️⃣ सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय सहन केलं?

उत्तर: लोकांकडून अपमान, दगड, शेणफेक

👉 माहिती: तरीही त्या दररोज शिकवायला जात असत.


8️⃣ सावित्रीबाई फुले या कशा प्रकारच्या लेखिका होत्या?

उत्तर: कवयित्री

👉 माहिती: त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर कविता लिहिल्या.


9️⃣ सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वाचे कार्य कोणते?

उत्तर: मुलींच्या शिक्षणाची सुरुवात, विधवांसाठी कार्य


🔟 सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले?

उत्तर: १० मार्च १८९७


✨ निष्कर्ष

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडवून आणला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर करून शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आज महिलाना शिक्षण खऱ्या अर्थाने सावित्रीबाई मुळेच मिळत आहे.आज महिला चंद्रा वर जाऊन पोहोचल्या आहेत.

📌 ही प्रश्नमंजुषा उपयोगी वाटली तर नक्की शेअर करा.

📌 तुमच्या उत्तरांबद्दल comment करा.

📌 सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुढील प्रश्नमंजुषा वाचायला ब्लॉग follow करा.


✍🏻 वसुधा इंगळे.

२५ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "ल" अक्षराने सुरू होणारे शब्द 

प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द ओळखणे ही भाषा शिकण्याची एक प्रभावी पद्धत आहे. “ल” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना इतिहास, विज्ञान, आरोग्य, नैसर्गिक घटक, जीवसृष्टी आणि स्वयंपाकघराशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात लोकशाही, लोकमान्य, लक्ष्मीबाई, लष्कर, लस, लाटा, लांडगा, लोखंड, लवंग आणि लसूण अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि त्यांचे निरीक्षण, विचारशक्ती व ज्ञान विकसित होते

.

१.लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे काय?

लोकशाही (Democracy)


२.बाळ गंगाधर टिळक यांना लोक प्रेमाने कोणत्या पदवीने ओळखतात?

लोकमान्य


३.झाशीच्या राणीचे नाव काय होते?

लक्ष्मीबाई


४.देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याला काय म्हणतात?

 लष्कर


५.आजारांपासून वाचण्यासाठी लहान मुलांना किंवा मोठ्यांना जे इंजेक्शन दिले जाते, त्याला काय म्हणतात?

लस (Vaccine)


६.समुद्रात वाऱ्यामुळे पाणी जे वर-खाली होते, त्याला काय म्हणतात?

लाटा


७.एक जंगली प्राणी जो कुत्र्यासारखा दिसतो आणि खूप धूर्त असतो?

लांडगा (Wolf)


८.लोहचुंबक (Magnet) कोणत्या धातूला स्वतःकडे खेचून घेते?

लोखंड


९.दात दुखीवर उपाय म्हणून मसाल्यातील कोणता पदार्थ दातात धरला जातो?

लवंग


१०.जेवणात फोडणीसाठी वापरला जाणारा पांढरा पदार्थ ज्याच्या पाकळ्या असतात?

लसूण

निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “ल” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख झाली. इतिहास, समाज, आरोग्य, नैसर्गिक घटनांशी संबंधित शब्द शिकल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.


✍🏻 वसुधा इंगळे.


"ल" अक्षराने सुरू होणारे शब्द (२५डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे 

१.इंद्रजित मोरे 

२.हर्षाली चव्हाण 

३.राजेश्री भोसले 

४.वर्षा घेटे 

५.आरती सोनवणे 

६.प्रगती धनवटे 

७.निकिता गावडे 

८.स्वप्नाली राऊळ 

९.सविता चौगुले 

१०.शारदा सासणे 

११.संगीता शिंदे 

१२.कविता पाटील 

१३.सुमेध शिरतुरे 

१४.स्वाती रंधे


डोळ्यात साचलेलं पाणी

 डोळ्यात साचलेलं पाणी


डोळ्यात साचलेलं पाणी म्हणजे न बोललेल्या भावनांची शांत भाषा, जिथे शब्द अपुरे पडतात आणि हृदय आपली सत्यकथा थेंबांतून सांगू लागतं.

 हे पाणी कधी दुःखाचं असतं, कधी अभिमानाचं, कधी अपमानाचं, तर कधी कोणीतरी आपलं आहे हे जाणवल्याचा सुखद स्पर्शही असत.

 डोळे भरतात म्हणजे मनात काहीतरी उफाळलेलं असतं, दटावलेलं, दाबलेलं, जगापासून लपवलेलं.

 हे पाणी बाहेर आलं की वेदना हलकी होते, न सांगता ऐकून घेणारे मिळतात, आणि मनावरचं ओझं थोडं हलकं होतं.

 डोळ्यात साचलेलं पाणी कमकुवतपणा नसतो... ते धैर्याचं शांत रूप असतं, खूप काळापासून न बोलताही जगत राहिलेल्या भावनांचा एक नीरव स्वीकार.


थोड मनातलं


शब्द फक्त अर्थ सांगण्यासाठी नसतात; जीवनातील मूल्ये समजून घेण्यासाठी संवादाची, नात्यांसाठी विश्वासाची आणि घरातील सुखासाठी प्रेमाची गरज असते. समाजात आपली ओळख निर्माण करण्यासाठी केवळ नाव नाही, तर कर्तृत्व आवश्यक आहे. जीवनात प्रगती साधण्यासाठी साधना, सुख मिळवण्यासाठी समाधान आणि लोकांच्या आठवणीत राहण्यासाठी अंतर्मुख योगदान महत्त्वाचे ठरते. शब्दांपलीकडे समजायला 'संवाद' लागतो, 


नाती टिकवायला निखळ 'विश्वास' लागतो, 

घर सजवायला फक्त वस्तू नाही, 'प्रेम' लागते, 

आणि ओळख निर्माण करायला नाव नाही, 

'कर्तृत्व' लागते.


सुखाचा शोध घ्यायला 'समाधान' लागते, 

प्रगती पथावर चालायला 'साधना' लागते, 

जगावे तर असे की लोक आठवण काढतील, 

त्यासाठी श्वास नाही, लोकांच्या मनात

 'जागा' लागते.


निष्कर्ष

हा विचार आपल्याला शिकवतो की जीवनातील खरी मूल्ये शब्दांपेक्षा अधिक गहन आहेत. संवाद, विश्वास, प्रेम, कर्तृत्व, समाधान, साधना आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करणे हे जीवन यशस्वी व अर्थपूर्ण बनवतात. या तत्वांवर आधारित आयुष्य जगल्यास आपल्याला खरी ओळख मिळते आणि लोकांच्या हृदयात आपली उपस्थिती कायम राहते.

Wednesday, December 24, 2025

२४ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 " ज" अक्षराने सुरू होणारे शब्द 

प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द शिकणे ही भाषा विकासाची आणि ज्ञानवर्धनाची प्रभावी पद्धत आहे. “ज” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र, नैसर्गिक घटना आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात जन गण मन, जांभूळ, जहाज, जादूगार, ज्वालामुखी, जंतू, जनगणना, जिजाबाई, जिज्ञासा आणि जामीन अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि निरीक्षणशक्ती सुधारते.


१.भारताचे 'राष्ट्रगीत' कोणते आहे?

जन गण मन


२.जांभळ्या रंगाचे आणि उन्हाळ्यात मिळणारे लहान फळ कोणते?

 जांभूळ


३.समुद्रात प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या बोटीला काय म्हणतात?

जहाज 


४.जादूचे प्रयोग करून दाखवणाऱ्या माणसाला काय म्हणतात?

 जादूगार


५.पृथ्वीच्या पोटातून तप्त लाव्हारस बाहेर फेकणाऱ्या पर्वताला काय म्हणतात?

ज्वालामुखी 


६.जे सजीव डोळ्यांना दिसत नाहीत, पण रोगास कारणीभूत ठरतात, त्यांना काय म्हणतात? 

जंतू


७.देशातील लोकांची मोजणी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (जी दर १० वर्षांनी होते)

 जनगणना 


८.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?

 जिजाबाई (किंवा जिजामाता)


९.एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा म्हणजे काय?

 जिज्ञासा (Curiosity)


१०.न्यायालयात आरोपीला सोडवण्यासाठी जी रक्कम किंवा हमी दिली जाते, त्याला काय म्हणतात?

जामीन


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “ज” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. इतिहास, समाज, विज्ञान, नैसर्गिक घटना आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती मिळाल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.

✍🏻 वसुधा इंगळे.





"ज" अक्षराने सुरू होणारे शब्द (२४ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.प्रगती धनवटे

२. वर्षा घेटे 

३.आरती सोनवणे 

४. इंद्रजीत मोरे

५.प्रिया मोरे

६.स्वप्नाली राऊळ

७.कविता पाटील

८.सविता चौगुले 

९.निकिता गावडे

१०.शारदा सासणे 

११.स्वाती रंधे

१२.हर्षाली चव्हाण 

१३.संगीता शिंदे

१४.स्नेहल दुर्गे 

Tuesday, December 23, 2025

२३ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "प" अक्षराने सुरू होणारे शब्द 


प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द शिकणे ही भाषा आणि ज्ञानवर्धनाची एक प्रभावी पद्धत आहे. “प” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, विज्ञान, जीवनशैली, अन्नपदार्थ आणि निसर्गाशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात पंडित जवाहरलाल नेहरू, पतंग, पाकिस्तान, पॅराशूट, पेरू, पोहे, पेशवा, प्रतापगड, पोट आणि पारिजात अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, निरीक्षणशक्ती सुधारते आणि ज्ञानसंपदा अधिक समृद्ध होते.

१.भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

पंडित जवाहरलाल नेहरू.


२.मकर संक्रांतीच्या दिवशी आकाशात रंगीबेरंगी काय उडवले जाते?

पतंग.


३.भारताच्या शेजारील देश जो १९४७ मध्ये वेगळा झाला?

पाकिस्तान.


४.विमानातून खाली उडी मारताना सुरक्षित उतरण्यासाठी कशाचा वापर केला जातो?

पॅराशूट


५.दक्षिण अमेरिकेतील एक देश ज्याचे नाव एका फळासारखे वाटते?

पेरू (Peru).


६.महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय नाश्ता कोणता?

पोहे.


७.मराठा साम्राज्याच्या प्रशासनातील पंतप्रधान पदाला काय म्हणत?

पेशवा 


८.अफजलखानाचा पराभव कोणत्या किल्ल्यावर झाला?

 प्रतापगड


९.अन्नाचे पचन शरीराच्या कोणत्या भागात होते?

पोट.


१०.रात्री उमलणारे आणि सूर्योदयापूर्वी जमिनीवर सडा पडणारे अत्यंत सुगंधी फूल कोणते?

पारिजात


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “प” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. इतिहास, भूगोल, अन्नपदार्थ, शारीरिक ज्ञान व नैसर्गिक घटक यांविषयीची माहिती मिळाल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.

✍🏻वसुधा इंगळे 



"प" अक्षराने सुरू होणारे शब्द ( २३डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:


१.इंद्रजित मोरे 

२.स्वप्नाली राऊळ 

३.वर्षा घेटे 

४.निकिता गावडे 

५.आरती सोनवणे 

६.कविता पाटील 

७.सविता चौगुले 

८.स्वाती रंधे 

९.राजेश्री भोसले 

१०.स्वाती पाटेकर

११.शारदा सासणे 

१२.हर्षाली चव्हाण 

१३.संगीता शिंदे 

१४.प्रगती धनवटे 

१५.स्नेहल दुर्गे

१६.शीतल जावळे

१७.विधी नागवेकर

Monday, December 22, 2025

२२ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 " र" अक्षराने सुरू होणारे शब्द 


प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द शिकणे ही विद्यार्थ्यांच्या भाषाशिक्षणासाठी आणि ज्ञानवर्धनासाठी एक प्रभावी पद्धत आहे. “र” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, सुरक्षा, युद्धसाहित्य, खाद्यपदार्थ आणि निसर्गाशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात रॉकेट, रातराणी, रणांगण गाडा, रक्षक, रपेट, रणनीती, रणांगण, रणशिंग, राष्ट्रपती आणि रसगुल्ला/रसमलाई अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, निरीक्षणशक्ती विकसित होते आणि ज्ञानसंपदा अधिक समृद्ध होते.


१.जमिनीवरून धूर सोडून आकाशात वेगाने जातो, मला पंख नसतात तरी मी ताऱ्यांकडे धाव घेतो, सांगा मी कोण?

 रॉकेट


२."दिवसा मी शांत असते, पण सूर्य मावळताच माझा सुगंध सर्वत्र पसरतो," सांगा मी कोण?

 रातराणी.


३.युद्धभूमीवर शत्रूच्या तोफगोळ्यांपासून सैनिकांचे संरक्षण करणारे आणि वेगाने धावणारे चिलखती वाहन कोणते?

 रणांगण गाडा 


४.देशाच्या सीमांचे शत्रूपासून संरक्षण करणाऱ्या वीरांना आपण सन्मानाने काय म्हणतो?

 रक्षक (देशरक्षक).


५.सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सैनिकांद्वारे केल्या जाणाऱ्या गस्तीला काय म्हणतात?

 रपेट


६.शत्रूने केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी सैन्याने आखलेल्या योजनेला काय म्हणतात?

रणनीती


७.युद्धाच्या मैदानाला मराठीत काय म्हटले जाते?

रणांगण.


८.युद्धाच्या मैदानात सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी जे संगीत किंवा वाद्य वाजवले जाते, त्याला काय म्हणतात?

रणशिंग.


९.भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचा (Army, Navy, Airforce) सर्वोच्च प्रमुख कोण असतो? (ज्याला आपण देशाचे प्रथम नागरिकही म्हणतो)

 राष्ट्रपती.


१०.दूध फाटल्यानंतर त्यापासून बनवलेली पांढरी शुभ्र मिठाई कोणती?

 रसगुल्ला किंवा रसमलाई.


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “र” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. विज्ञान, सुरक्षा, युद्धसाहित्य, राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि खाद्यपदार्थ यांविषयीची माहिती मिळाल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.

✍🏻वसुधा इंगळे.



"र" अक्षराने सुरू होणारे शब्द  ( २२ डिसेंबर)

१.स्वाती रंधे 

२.आरती सोनवणे 

३.स्वप्नाली राऊळ 

४.कविता पाटील

५.हर्षाली चव्हाण 

६.प्रगती धनवटे 

७.निकिता गावडे 

८.शारदा सासणे 

९.वर्षा घेटे 

१०.सविता चौगुले

११.संगीता शिंदे 

१२.इंद्रजित मोरे 

१३.शीतल जावळे

Sunday, December 21, 2025

२१ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "ख" अक्षराने सुरू होणारे शब्द

प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द शिकणे हे विद्यार्थ्यांच्या भाषाशिक्षणासाठी आणि ज्ञानवर्धनासाठी प्रभावी पद्धत आहे. “ख” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ, नैसर्गिक संसाधने, इतिहास, प्राणी आणि घरगुती वस्तू यांविषयी माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात खवा, खग, खलबत, खनिज, खरवस, खलिता, खसखस/खोबर, खडक, खलबत्ता आणि खेकडा अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, निरीक्षणशक्ती सुधारते आणि ज्ञानसंपदा अधिक समृद्ध होते

१.दुधापासून तयार होणारा पदार्थ जो मिठाईत वापरतात?

खवा


२. आकाशाचा समानार्थी शब्द काय?

खग 


3.पूर्वी च्या काळी राजे महाराजे गुप्त चर्चा करायचे त्याला काय म्हणत?

खलबत


४. जमिनीतून खोदून काढलेला उपयुक्त पदार्थ?

 खनिज


५. गाय किंवा म्हशी च्या चिकापासून बनविलेला पदार्थ कोणता?

खरवस


६. जुन्या काळात राजांच्या पत्राला काय म्हणत?

खलिता



७.जेवणाची चव वाढवणारे आणि मसाल्यात वापरले जाणारे?

 खसखस, खोबर


८.मोठ मोठ्या दगडांना काय म्हणतात?

खडक


९.मसाला ठेचण्यासाठी घरात वापरली जाणारी एक वस्तू?

खलबत्ता


१०."पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी राहणारा, कडक कवच असलेला आणि तिरपी चाल चालणारा प्राणी कोणता?"

 खेकडा


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “ख” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. अन्नपदार्थ, नैसर्गिक संसाधने, प्राणी आणि घरगुती उपयोग यांविषयीची माहिती मिळाल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.


✍🏻वसुधा इंगळे 




"ख" अक्षराने सुरू होणारे शब्द ( २१ डिसेंबर)


अचूक उत्तर देणारे:

१.वर्षा घेटे 

२.इंद्रजित मोरे

३.राजेश्री भोसले 

४.प्रगती धनवटे

५.आरती सोनवणे

६.शारदा सासणे 

७.स्वाती रंधे

८.संगीता शिंदे

९.स्वप्नाली राऊळ 

१०.हर्षाली चव्हाण 

११.सविता

१२.निकिता गावडे

Saturday, December 20, 2025

२० डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "म" या अक्षराने सुरू होणारे शब्द

प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द शिकणे हे विद्यार्थ्यांच्या भाषाशिक्षण आणि ज्ञानवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. “म” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना भूगोल, इतिहास, निसर्ग, फळे, अन्नपदार्थ आणि नातेसंबंध यांविषयी माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात मुंबई, महात्मा गांधी, मेहुणी, मोगरा, म्यानमार, मका, मदन, माउंट एव्हरेस्ट, माठ आणि मोसंबी अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, निरीक्षणशक्ती सुधारते आणि ज्ञानसंपदा अधिक समृद्ध होते.

१. महाराष्ट्र ची राजधानी कोणती आहे? 

मुंबई

२. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? 

महात्मा गांधी 

३. बायको च्या बहिणीला काय म्हणतात? 

मेहुणी 

४. केसात गजरा म्हणून घातलेले सुवासिक फूल? 

मोगरा

५. भारताच्या शेजारी असलेला "बुद्धांचा देश" म्हणून कोणता देश ओळखला जातो? 

म्यानमार

६. खाण्यासाठी वापरले जाणारे धान्य? 

मका 

७. तीन अक्षरी माझे नाव, मधले अक्षर कापले तर 'मन' होतो, शेवटचे अक्षर कापले तर 'मद' होतो. सांगा पाहू मी कोण? 

मदन

८. जगातील सर्वात उंच शिखर कोणत? 

माउंट एव्हरेस्ट 

९. पाणी थंड राहण्यासाठी चे भांडे? 

माठ

१०. झाडावर लागणारे रसाळ फळ? 

मोसंबी

 

निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “म” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. भूगोल, इतिहास, फळे, अन्नपदार्थ आणि नातेसंबंध यांविषयी माहिती मिळाल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.

✍🏻वसुधा इंगळे 





"म" अक्षराने सुरू होणारे शब्द ( २० डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:


१.इंद्रजीत मोरे 

२.प्रिया महाडिक 

३.प्रिया मोरे 

४.प्रगती धनवटे 

५.शारदा सासणे 

६.राजेश्री भोसले 

७.आरती सोनवणे 

८.निकिता गावडे 

९.कविता पाटील

१०.स्वप्नाली राऊळ

११.सविता

१२.वर्षा घेटे 

१३.स्वाती रंधे 

१४.संगीता शिंदे 

१५.हर्षाली चव्हाण

Friday, December 19, 2025

१९ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "ज्ञ" अक्षराने सुरू होणारे शब्द


१.माणसाला शिकून मिळणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?

ज्ञान


२.आळंदी ला कोणाची समाधी आहे?

ज्ञानेश्वर


३.ज्याच्याकडे खूप ज्ञान असते, त्याला काय म्हणतात?

ज्ञानी


४.“पसायदान” कोणी लिहिले?

 ज्ञानेश्वर महाराज


५.ज्ञानाचा योग्य वापर करणारा माणूस कसा असतो?

ज्ञानी


६.मुक्ताबाई कोणाची बहीण होती?

ज्ञानेश्वर


७.पुस्तक वाचून आपल्यात काय वाढते?

 ज्ञान


८.शिक्षक विद्यार्थ्यांना काय देतात?

ज्ञान


९.ज्ञानेश्वर महाराजांनी लिहलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्वरी


१०.अज्ञानाच्या विरुद्ध शब्द कोणता?

ज्ञान


✍🏻वसुधा इंगळे.



 "ज्ञ" अक्षरावरून शब्द (१९ डिसेंबर )

अचूक उत्तर देणारे:


१.इंद्रजीत मोरे 

२.निकिता गावडे

३.प्रगती धनवटे

४.स्वप्नाली राऊळ 

५.कविता पाटील

६.सविता

७.स्वाती रंधे 

८.वर्षा घेटे 

९.हर्षाली चव्हाण 

१०.शारदा सासणे

११.आरती सोनावणे

१२. राजेश्री भोसले 

Thursday, December 18, 2025

१८ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "ह" या अक्षराने सुरू होणारे शब्द 


१.एव्हरेस्ट पर्वत कोणत्या पर्वतरांगात आहे?

हिमालय


२.जखमेवर लावला जाणारा पिवळा औषधी पदार्थ?

हळद


३.नदी पार करण्यासाठी कशाचा वापर करतात?

होडी


४.शिवाजी महारांच्या पत्नी सोयराबाई यांच्या भावाचे नाव काय?

हंबीरराव मोहिते 


५.माणसाच्या शरीराचा महत्वाचा अवयव कोणता

हदय 


६.घरात उष्णता देणारे साधन?

हिटर


७.हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात ठेवले जाणारे साधन?

ह्युमिडिफाय


८.पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वतरांग कोणती आहे?

 हिमालय


९.“ये बाबूराव का स्टाइल है।” हा डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे

हेराफेरी


१०.शिवाजी महाराजांनी कोणते स्वराज्य संस्थापित केले होते?

हिंदवी


✍🏻वसुधा इंगळे 




"ह" अक्षरावरून शब्द (१८ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.इंद्रजीत मोरे 

२.निकिता गावडे

३.हर्षाली चव्हाण 

४.स्वप्नाली राऊळ 

५.कविता पाटील

६.सविता

७.स्वाती रंधे 

८.वर्षा घेटे 

९.प्रगती धनवटे 

१०.शारदा सासणे

११.आरती सोनावणे

१२.स्वप्नाली सासणे

Wednesday, December 17, 2025

१७ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "ड" या अक्षराने सुरू होणारे शब्द 


१.पांढऱ्या रंगाचा तांदळापासून बनवलेला पदार्थ?

डोसा


२.या पासून वरण बनवतात?

डाळ


३.रस्त्याच्या कामात याचा वापर करतात?

डांबर


४.केळी किंवा आंबे हे किलो मध्ये नाही तर कशामध्ये मिळतात?

 डजन


५.वैद्य ला इंग्रजी शब्द

डॉक्टर 


६.ज्याला उजव्या हाताने लिहिता येत नाही तो?

डावखुरा 


७.कोणत्या खेळामध्ये रशीवर चालतात?

डोंबारी


८.दाताच्या आकाराचे एक बिया असलेल फळ?

डाळिंब


९.एक वाद्य मदारी वाजवतो?

डमरू


१०.एक गोड पदार्थ ज्याच्या मधोमध छिद्र केले जाते आणि ज्यामध्ये जाम, क्रीम आणि चॉकलेट चा समावेश असतो?

डोनट


✍🏻 वसुधा इंगळे 


 

"ड" अक्षरावरून शब्द (१७ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१. वर्षा घेटे 

२. प्रिया मोरे

३. इंद्रजीत मोरे

४. प्रिया महाडिक

५. स्वप्नाली राऊळ

६. विधी

७. सागर जाधव

८. प्रगती धनवटे 

९. सविता

१०. हर्षाली चव्हाण 

 ११.संगीता शिंदे 

 १२.निकिता गावडे 

 १३.आरती सोनावणे 

 १४.दिप्लेशा भाटकर


नाळ जुळली सुरांची...

नाळ जुळली सुरांची...



प्रेग्नंट होते तेव्हापासूनच माझ्या बाळाशी माझं एक वेगळंच नातं जुळलं होतं.
पोटात असतानाच जेव्हा ते मस्ती करायचं, हलायचं, लाथा मारायचं… तेव्हा त्याला शांत करण्यासाठी मी हळूच गुणगुणायची—

“गाई गाई बाळा झोपी जाई,
बाळा ला माझ्या झोप येई…”

त्या वेळी बाळ अजून दिसत नव्हतं, पण त्याचं अस्तित्व माझ्या प्रत्येक श्वासात होतं.
पोटात असतानाच मी त्याचं नाव ठरवलं होतं— टीटू.
नाव ठेवल्यापासून ते अजूनच आपलं वाटू लागलं.

हळूहळू हे गाणं फक्त माझंच राहिलं नाही.
बाळाचे डॅडी ही ते म्हणायला लागले.
तीन जणांमधला तो पहिला संवाद होता—
मी, पोटातलं बाळ आणि त्याचा डॅडी.

डिलिव्हरीनंतर तर या गाण्याला अजूनच वेगळी ओळख मिळाली.
माझ्या पतीने त्याच गाण्यावरून, प्रेमाने एक नवं अंगाईगीत तयार केलं—

गाई गाई टीटू झोपी जाई,
टीटू ला माझ्या निनू येई
टीटू माझी राजकुमारी
टीटू आता झोपी जाई..

गाई गाई टीटू झोपी जाई,
टीटू ला माझ्या निनू येई
टीटू माझी सोनपरी
टीटू आता झोपी जाई...

गाई गाई टीटू झोपी जाई,
टीटू ला माझ्या निनू येई
टीटू माझी परिराणी,
टीटू आता निनू करी..

हे गाणं म्हणजे फक्त शब्द नाहीत,
ते आमचं प्रेम आहे, आमची माया आहे,
आई-बाबा आणि बाळामधली न दिसणारी पण खोल जुळलेली नाळ आहे.

ही गाणी माझ्यासाठी आठवण नाहीत,
ती माझ्या मातृत्वाची सुरुवात आहेत.
पोटातल्या पहिल्या हालचालींपासून
हातात घेतलेल्या त्या पहिल्या स्पर्शापर्यंत—
या गाण्यांनीच माझं बाळ मोठं केलं…
आणि मला आई बनवलं. 💗

✍🏻वसुधा इंगळे.




१६ डिसेंबर २०१५ प्रश्नोत्तरे

"न" या अक्षराने सुरू होणारे शब्द


१.माणसाच्या चेहऱ्यावर असलेला श्वास घेण्याचा अवयव? 

नाक


२.माणसाच्या बोटांवर असलेली कठीण गोष्ट?

 नख


३.पाण्यात तरंगणारे वाहन? 

नाव, नौका 


४.शेतात जमीन नांगरण्यासाठी वापरतात? 

नांगर


 ५.रात्री आकाशात चमकणारे तारे?

 नक्षत्र


६.दगड फोडला चांदी चकाकली, 

चांदीच्या आडात मिळाले पाणी? 

नारळ


७.सगळ्यात जास्त दाक्षाचे मळे कुठे आहेत?

 नाशिक


८.स्त्रियांचा एक मराठमोळा दागिना? 

नथ 


९.एका चायनीज पदार्थाचे इंग्रजी मध्ये नाव? 

नूडल्स 


१०.ही चपाती नाही आणि भाकरी सुद्धा नाही? 

नान


✍🏻 वसुधा इंगळे.




"न" अक्षरावरून शब्द १६डिसेंबर 

अचूक उत्तर देणारे 

१.हर्षाली चव्हाण 

२.गुड्डी ताई (वर्षा घेटे)

३.इंद्रजीत मोरे

४.निकिता गावडे

५.प्रिया मोरे

६.प्रगती धनवटे 

७.सागर जाधव

८.कविता पाटील

९.प्रिया महाडिक

१०.राजेश्री भोसले

११. हर्षदा तायडे

Tuesday, December 16, 2025

१५ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "अ " अक्षराने सुरू होणारे शब्द 


१. हे माणसांच्या मूलभूत गरजांनपैकी एक आहे? 

अन्न 


2. एक पेशीय प्राणी आहे, सतत आकार बदलत असतो? अमिबा


3. शंभूराजांचा शिरच्छेद कोणी केला? 

औरंगजेब 


4. आपल्या हाताच्या पाच बोटांपैकी एक? 

अंगठा


5. लहान मुलांना झोपण्यासाठी ही गातात? 

अंगाई


6. हा काळया रंगाचा सस्तन प्राणी आहे? 

अस्वल


7. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला फ्री मध्ये मिळते, पण हॉस्पीटल मधे गेल्यावर विकत घ्यावी लागते? 

ऑक्सिजन 


8. असे काय आहे की जे पती पत्नी ला देऊ शकतो,पण बायको नवऱ्याला देऊ शकत नाही? 

आडनाव


9. फळाचा राजा कोणाला म्हणतात? 

आंबा


10. ही म्हण पूर्ण करा. .......पाहून पाय पसरावे? 

अंथरूण


✍🏻 वसुधा इंगळे.

"अ" अक्षरावरून शब्द १५डिसेंबर 

अचूक उत्तर देणारे:
१.इंद्रजीत मोरे
२.प्रगती धनवटे
३.प्रिया मोरे
४.हर्षाली चव्हाण 
५.कविता पाटील
६.निकिता गावडे 
७.आरती सोनवणे
८.गुड्डी ताई
९.शारदा सासणे



Monday, December 15, 2025

१४ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "त" या अक्षराने सुरू होणारे शब्द…


१.पूजेच्या वेळी प्रसाद म्हणून हातावर काय दिले जाते?

तीर्थ


२.पदार्थ टाळण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?

तेल किंवा तूप


३.जेवन जेवण्यासाठी वापरतात?

ताट 


४.लढाई करण्यासाठी वापरली जाणारी धातू ची वस्तू?

तलवार


५.लहान मुलांच्या पायात घालायचे दागिने?

तोडे


६.संक्रांतीला कशाचे लाडू बनवतात?

तिळ


७.देवपूजेसाठी वापरले जाणारे पवित्र झाड?

तुळस


८.जेवताना पाणी घेण्यासाठी याचा वापर होतो?

तांब्या


९.भजनातील एक वाद्य प्रकार?

तबला


१०.वजन मोजण्यासाठी कशाचा वापर करतात?

तराजू


११.माझ्या लेकीच नाव आहे?

तीर्था


✍🏻वसुधा इंगळे.


" त" अक्षरावरून शब्द १४डिसेंबर 


अचूक उत्तर देणारे :
१.Priti kamble
2.Priya more
3.Guddi Tai 
4.Nikita 
5.Harshali chavan
6.Priya mahadik
7.Aarti 
8.Vidya
9.Kavita patil
10.Pragti dhanwate

Sunday, December 14, 2025

१३ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 " स " या अक्षराने सुरू होणारे शब्द...


१.सकाळच्या वेळी पूर्वेकडून वर येतो, त्याला काय म्हणतात?

सूर्य


२.हा गोड पदार्थ ऊसापासून बनवतात, जो चहात वापरला जातो?

साखर


३.पूर्वी प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे वाहन?

सायकल


४.स्त्रियांचा आवडता पोशाख?

साडी


५.घराच्या आत बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी याचा वापर होतो?

सोफा


६.आपण कोणाला मदत करतो, त्याला काय म्हणतात?

सहकार्य 


७.अंघोळी साठी किंवा कपडे धुण्यासाठी याचा वापर करतात?

साबण


८.२६ नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?

संविधान दिवस 


९.गव्हर्मेंट ला मराठी मधे काय म्हणतात?

सरकार


१०.झिंगाट गाण कोणत्या चित्रपटामधील आहे?

सैराट


११.चादरी साठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?

सोलापूर


✍🏻वसुधा इंगळे.






Saturday, December 13, 2025

१२डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 *"व" या अक्षराने सुरू होणारे शब्द*


१.कायदा आणि न्याय यामध्ये काम करणारा व्यावसायिक?

वकील


२.पदार्थाचा एक प्रकार, जशी अळूची..

वडी


३.एक पारंपरिक जेवणात भाताचा सोबती?

वरण


४.भावाच्या बायकोला काय म्हणतात?

वहिनी 


५.गणपती किंवा इतर उत्सवासाठी ही गोळा करतात?

वर्गणी


६.हा पक्षी नसून हवेत उडते?

विमान 


७.या मध्ये बारा महिने असतात?

वर्ष 


८.काम केल्यावर मिळते?

वेतन


९.हे किलो किलो ने वाढते?

वजन


१०.जसजसे वर्ष बदलते तसतसे तुमचे हे वाढते?

वय


✍🏻वसुधा इंगळे 






Wednesday, December 3, 2025

दाराशी उमललेलं गोड वसंत


दाराशी उमललेलं गोड वसंत


 आज घरचा दरवाजा उघडा ठेवला होता. तीर्था ला खेळवण्यात गुंग असताना अचानक लहान मुलांचा गोड गोड आवाज कानावर आला. क्षणभर वाटलं—कोण आलंय बाहेर? म्हणून मी माझी साडेसहा महिन्यांची लेक तीर्थाला उचलून दारापाशी गेले.


दार उघडलं तर दिसलं की वरच्या मजल्यावर ट्युशनला जाणारी लहान मुलं ट्युशन संपवून घरी निघाली होती. त्यांच्या चकाकणाऱ्या डोळ्यांमध्ये आणि खसखसणाऱ्या हसण्यात एक वेगळीच निरागसता होती.


मी तीर्थाला दाखवत म्हणाले,

“बघ… तुझ्यासारख्या दीदी आहेत या! या ट्युशनला येतात. तू पण मोठी झालीस की जाशील ना?”


तीर्थाने तिच्या छोट्या हातांनी हवेत फडफड करत ‘आ-बा-बा’ करत होकार दिला. माझ्या मनात एक वेगळीच ऊब पसरली.


तेवढ्यात मी त्या मुलींना हसत विचारलं,

“आप इसको लेकर जयोगे क्या कल?”

त्यापण हसत म्हणाले, “हा"

मी पण लगेच म्हटलं इसकी एक स्केट और दो बुक्स है, इतना बस.”





त्यावर त्यांपैकी एक मुलगी अगदी कौतुकाने म्हणाली, “बॅग भी है क्या इसके पास?”

मीही हसत होकार दिला, “हां, है ना छोटी सी!”


नंतर मी त्यांची नाव विचारली — रिद्धिमा, अनुष्का आणि अनन्या. अतिशय गोड, नम्र आणि हसतमुख मुली. मग मीही त्यांना माझ्या लेकीचं नाव सांगितलं,

“इसका नाम तीर्था है.”


मी त्यांना विचारलं, “तुम्ही कुठे राहता?”

त्या म्हणाल्या, “जयश्री अपार्टमेंट.”


तेवढ्यात मी त्यांना परत विचारल,

“घर में आओगे क्या?”

तर नाही म्हणाल्या.


दरम्यान, तीर्था पण त्याच्या सोबत हया होहुहू आआबब्ब..

करायला लागली.

तीर्थाने उत्साहाने सगळ्यांच्या छोट्या हातात हात ठेवून ‘हाय’ केलं, ‘बाय-बाय’ केलं. तिच्या त्या निरागस गोड हसण्याने सगळ्यांच्याच चेहऱ्यावर अधिकच हसू उमटलं.


शेवटी मी त्यांना विचारलं,

“उद्या ट्युशन किती वाजता?”

त्यांनी एकदम एकत्र हसत उत्तर दिलं,

“छे बजे (सहा)वाजता!”


आणि त्या उड्या मारत, एकमेकींच्या हातात हात घालून निघून गेल्या.

दार बंद करताना मनात वाटलं — किती छान असतं ही लहान मुलांची दुनिया! निरागस, साधी, पण मन भरून टाकणारी.





✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...