Showing posts with label व पु काळे. Show all posts
Showing posts with label व पु काळे. Show all posts

Friday, July 7, 2023

व पु काळे

 

बायकांची जात' असं म्हणत जन्माला येताक्षणी, काही बायका जणु काही आपल्याला काय काय वर्ज्य ते ठरवतात. आणि निम्मं जगणं कायमचं नाकारतात. राह्यलेलं निम्मं आयुष्य कसं जगायचं, हे समाज बाईवर लादत असतो. त्यातलाही खुप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो.

बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरुन शंखात कोंडुन घेतो. आणि मन तर मारण्यासाठीच असतं. ते तर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखावरचा वर्ख गळायच्या आतच संपलेलं असतं. गरूडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त. तरीही, ते मन मेलं की जगण सोपं. पण ते जर फिनिक्स पक्ष्यासारखं असलं तर संपलं. मग 'तडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे' अशी फक्त तडफड.....


✍️व पु काळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...