Showing posts with label सखी. Show all posts
Showing posts with label सखी. Show all posts

Friday, March 31, 2023

मैत्रीण ( सखी)

मैत्रीण ( सखी)



 काल कॉलेज मधल्या एका मैत्रिणीचा (नाव राखी) फोन आला होता. पण मी थोडी कामात असल्याकारणाने तिच्याशी बोलणं होऊ शकलं नाही.पण दुसऱ्याच दिवशीच औचित्य साधून तिला मी फोन केला. आयुष्यात असे फार कमी लोक असतात जे वेळ काढून, व्यस्त असताना, आपल्याला समोरून फोन करतात, त्यांना नक्कीच पुन्हा फोन केला पाहिजे हे मत आहे.


कॉलेजमधल्या त्या थोड्या गोड- तिखट-आंबट अश्या आठवणी वर पुनः दोघींनी मिळून प्रकाश टाकला. सगळे flashback डोळ्यासमोर येतात. ती मज्जा, ती मस्ती, शिक्षकांच ओरडणं, मैत्रीणी सोबत केलेली धमाल सगळं आठवलं की टचकन डोळयातून पाणी येत.


मला म्हणाली वसू तुझे vlog आणि blog दोन्ही खूप छान असतात. माझे मिस्टराना तू जे काही लिहितेस ते खूप आवडतं.माझ्या मुलांना तुझे reels  खूप आवडतात. माझा मुलगा म्हणतो मावशी आपल्या कडे कधी येणार आहे. अस सगळं ऐकून आपन जी गोष्ट करतो त्याची पोचपावती मिळाली अस वाटत. खूप भारावून जायला होत. कधी कधी समोरच्या व्यक्तीचे आभार कसे मानावे ह्या साठी देखील शब्द अपुरे पडतील अस वाटत. 

थोडा वेळ असच इकडच्या तिकडच्या संसाराच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या. मी माझं  संध्याकाळ च जेवण बनवून तिला फोन केला होता. ती मात्र जेवण बनवता बनवता माझ्या शी बोलत होती. बोलता बोलता मला म्हणाली, "वसू तू नक्की कॉलेज मध्ये होती तीच वसू आहेस ना" हा तिला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न? 

आणि तिच्या अश्या प्रश्नावर मी निरुत्तर!


शेवटी तीच म्हणाली, कॉलेज मध्ये किती शांत होतीस, मोजकेच बोलायचं, जास्त बोलायची नाही, थोडी आगाऊ पण होतीस, सगळ्याना मदत करायची तेव्हा पण तुझा स्वभाव छान होता. पण आता खूपच मस्त आहे. हा एवढा बदल झाला कसा.


आधीची वसुधा असती तर तिने कदाचित माझी facebook request accept केली नसती, कारण ती 3-4 मैत्रिणी सोबतच असायची.  पण आता तिच्यात आमूलाग्र बदल झालेला जाणतो. स्वभाव तर आधी पासूनच छान होता. आणि आता नव्याने भर पडून इतके छान विचार, इतकं सुंदर बोलणं आहे तुझं की बोलतच राहावंसं वाटत. हे अस सगळं ऐकून मी निशब्द..

कारण माझ्या जिभेवर गोडवा आहे हे समोरची व्यक्ती जेव्हा मनातून बोलते ना तेव्हा त्या सारखा आनंद दुसरा कोणता नाही.


गप्पा तर बऱ्याच झाल्या पण काही गोष्टी ज्या फक्त समोरच्या व्यक्तीशी बोलून मनाला नवीन उमेद देऊन जातात. आणि आज याच माझ्या जिभेवरील गोडव्याने खूप माणसं जवळची झाली, नवीन नाती निर्माण झाली. आणि ती कायम तशीच राहावी.


✍️वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...