Showing posts with label जबाबदारी. Show all posts
Showing posts with label जबाबदारी. Show all posts

Saturday, October 4, 2025

आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली


आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली

मागच्या काही दिवसांतली एक धक्कादायक बातमी आपण सगळ्यांनीच ऐकली—एका आईने आपल्या १५ दिवसांच्या बाळाला रडत होतं म्हणून थेट फ्रिजमध्ये ठेवलं. देवाची कृपा म्हणून बाळ वाचलं. सुरुवातीला हे ऐकलं तेव्हा मन सुन्न झालं, पण नंतर जेव्हा समजलं की ती स्त्री *पोस्टपार्टम सायकॉसिस* या मानसिक आजाराशी झुंज देत होती, तेव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहिले.



आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा, कारण हा लेख माझ्या मैत्रिणीच्या आग्रहाने लिहितेय. अनुभव तिचा आहे, शब्दरचना माझी.


बाळ जन्मल्यानंतरचा काळ आईसाठी कसोटीचा असतो. बाळासाठी प्रेम, काळजी, माया या सगळ्यांची उधळण होते, पण बाळाच्या आईकडे लक्ष देण्याचं आपल्या समाजाला जणू विस्मरणच झालेलं असतं. गर्भावस्थेत जितकी आईची काळजी घेतली जाते, तितकीच प्रसूतीनंतर तिला बाजूला सारलं जातं.


आईचं शरीर शारीरिकदृष्ट्या नाजूक असतंच, पण तिचं मन अधिक अस्थिर असतं. हार्मोन्स, थकवा, झोपेची कमतरता आणि सततची जबाबदारी—या सगळ्यामुळे ती तुटत चाललेली असते. पण तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच दोष दिला जातो.


“आम्ही नाही का लेकरं केली? तुम्हालाच लेकरं झाली का?”

“बाळ आजारी आहे म्हणजे आईकडून काहीतरी चुकलं असेल.”

“बाळ बारिक दिसतंय, म्हणजे आईनं नीट काळजी घेतली नाही.”

“तू जाड झालीस, चेहऱ्यावर बदल दिसतोय.”


अशा टोमण्यांनी तिचं मन आणखी खचवलं जातं. तिची चिडचिड झाली तरी तिच्यावरच ओरडल जात. तिच्या मानसिक आरोग्याची काळजी मात्र कुणीच घेत नाही—कधी माहेरचेही तिला समजून घेत नाहीत. तिला सगळ्यात जास्त अपेक्षा माहेरून असते; कारण ते आपले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे असतात.


पण हेच खरं आहे की, अशा अवस्थेतही आई तग धरून राहते—फक्त आपल्या बाळासाठी. बाळ तिच्यासाठी पूर्ण विश्व बनतं. ती झगडते, रडते, खचते, पण शेवटी उभी राहते. आणि जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी ती कणखर होत जाते—इतकी कणखर की नंतर तिला कुठल्याही टीकेचा फरक पडत नाही.


पण एक गोष्ट ती कायम लक्षात ठेवते—त्या कठीण काळात कुणी तिची साथ दिली आणि कुणी जखम केली. हाच अनुभव तिच्या पुढच्या आयुष्याचा पाया ठरतो.


*तुम्ही आईला कशी मदत करू शकता?*


* आईला दोष देण्याऐवजी तिचं ऐका आणि समजून घ्या.

* तिच्या थकव्याला, निराशेला कमी लेखू नका. तिला बोलू द्या.

* बाळाची जबाबदारी वाटून घ्या—झोपवणं, पाजणं, डायपर बदलणं.

* तिच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबद्दल काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

* कुठलीही समस्या जास्त गंभीर वाटली तर तिला तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा.

* “तू आई झालीस म्हणजे आता सगळं तुझ्यावर” अशी अपेक्षा ठेवू नका. तिच्यासाठीही ती *नवीन भूमिका* आहे.


आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नव्हे; तर त्या काळातल्या तिच्या मानसिक प्रवासाला समजून घेणं आणि तिला जपणं हे समाजाचंही कर्तव्य आहे. कारण, बाळाला सांभाळणारी आई जर मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसेल, तर बाळाचं आयुष्यही खऱ्या अर्थानं सुरक्षित राहू शकत नाही.


✨ **प्रेरणादायी शेवट**

आई म्हणजे फक्त जीव देणारी नाही, तर जीवाला उभारी देणारी ताकद आहे. तिच्या मनाला थोडं समजून घेतलं, तिच्यावर थोडं प्रेम ओतलं, तर ती स्वतःलाही आणि बाळालाही नव्या जगाला सामोरं जाण्याची खरी शक्ती देते. 🌸



*“बाळाचं रडणं सगळ्यांना ऐकू येतं, पण आईच्या मनाचं रडणं क्वचित कुणाला जाणवतं.”*


✍🏻वसुधा इंगळे.

Sunday, June 22, 2025

Father's day

 Father's day ❤️ 




प्रिय डॅडा, "आज father's day आहे".... पण खरं सांगायचं तर, तुमचं महत्व एका दिवसात मोजता येणारही नाही, आणि अजून मी फक्त एक महिन्याची आहे त्यामुळे तुम्हाला काय शुभेच्छा देणारं ? 

तूमच्या शुभेच्छांवर तर चाललयं सगळं...! तरिपण....

मला मोठी झाल्यावर कळेल कि, तुम्ही जे शिकवत आहे ते शाळेच्या कोणत्याच पुस्तकात नसेल..! आणि हो आज एकच गोष्ट सांगायाची ती म्हणजे "आयुष्यात खुप... माणसं भेटतील मला, पण तुमच्या सारखा आधार कोणाचाच नसेल.... Thank you ...आणि father's day ... च्या मनापासून शुभेच्छा...!


तुमचे आरोग्य, आनंद याणि प्रेम असचं अबाधित राहो....!

✍🏻वसुधा इंगळे.

Wednesday, February 8, 2023

प्रेम

 प्रेम



प्रेमाचे दिवस साजरे करून काही होत नाही , आपला जोडीदार शेवटच्या श्वासापर्यंत सोबत जपता यावा बस इतकचं .🥰❤️ सोबत वाटचाल करत आयुष्याची सांजवेळ यावी.नाते जुळले मनाशी मनाचे ,उगाच नाही जन्मलो आम्ही .फेरे आमचे गत जनमाचे, बळ मिळाले तेव्हा आम्हा संकटाशी झुंजण्याचे ,वचन दिले एकमेका जीवनभर साथ देण्याचे....कुठल प्रॉमिस,कुठला डे,कधी जाणंवलच नाही काय असत मिस यू,लव्ह यू,शेवटचा श्वासअसेपर्यंत तू माझा मी तुझी होऊ काठी आधाराची.जगू असे की मरणाला ही आव्हान देवूनी पुन्हा परतण्याची आस घेवूनी......झाली आता सांजवेळ तुझ्या माझ्या संसाराची,घेवून हात हाती चल जावू पैलथडी.......

Wednesday, February 1, 2023

बाप

बाप

दोन पाऊलं चालल्यावरही थकणारे पाय जेव्हा वडिलांसाठी काही खास खरेदी करायला दोन तासही चालायला तयार असतात तेव्हा कळतं.. "बाप" माणूस नजरेतून आणि शब्दांतून नाही.. तर मनातून सुरू होऊन रक्तापर्यंत भिनलेला असतो..!

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...