Showing posts with label अभ्यास. Show all posts
Showing posts with label अभ्यास. Show all posts

Sunday, January 4, 2026

प्रश्नमंजुषा का आवश्यक आहेत?

 प्रश्नमंजुषा का आवश्यक आहेत? 


विद्यार्थ्यांच्या अभ्यासात त्यांचे महत्त्व

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठांतर करून यश मिळवणे शक्य नाही. समजून अभ्यास करणे, नियमित उजळणी करणे आणि स्वतःची तयारी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रश्नमंजुषा (Quiz) हा एक प्रभावी आणि सोपा मार्ग आहे.

प्रश्नमंजुषेचा अर्थ

प्रश्नमंजुषा म्हणजे विशिष्ट विषयावर आधारित प्रश्नोत्तरांची मालिका. यामध्ये विद्यार्थ्यांना विचार करावा लागतो, आठवण करून उत्तर द्यावे लागते आणि आपली चूक लगेच लक्षात येते.

प्रश्नमंजुषेचे फायदे

• आठवणशक्ती वाढते – प्रश्नोत्तरांमुळे शिकलेली माहिती दीर्घकाळ लक्षात राहते.

• अभ्यास तपासता येतो – आपण किती तयारी केली आहे हे समजते.

• आत्मविश्वास वाढतो – बरोबर उत्तर आल्यावर आत्मविश्वास वाढतो.

• स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त – MPSC, UPSC, TET अशा परीक्षांसाठी quiz फार उपयोगी ठरतात.

• अभ्यासात रुची निर्माण होते – प्रश्नमंजुषा मजेशीर असल्यामुळे अभ्यास कंटाळवाणा वाटत नाही.


विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा कशी वापरावी?

विद्यार्थ्यांनी दररोज थोड्या वेळासाठी प्रश्नमंजुषा सोडवावी. एखाद्या विषयाचा अभ्यास झाल्यावर त्या विषयावर आधारित प्रश्न सोडवल्यास तो विषय अधिक पक्का होतो.

शिक्षक व पालकांसाठी उपयोग


शिक्षक वर्गात quiz चा वापर करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवू शकतात. पालक घरी मुलांसोबत प्रश्नमंजुषा खेळ स्वरूपात घेतल्यास मुलांना अभ्यासाची गोडी लागते.


निष्कर्ष

प्रश्नमंजुषा ही केवळ खेळ नसून अभ्यासाची प्रभावी पद्धत आहे. नियमित प्रश्नमंजुषा सोडवल्यास ज्ञान वाढते, तयारी मजबूत होते आणि यशाचा मार्ग सुकर होतो.

अशाच अभ्यासपूर्ण प्रश्नमंजुषा व लेखांसाठी ब्लॉग नियमित वाचत रहा.


✍🏻वसुधा इंगळे.

Wednesday, December 3, 2025

दाराशी उमललेलं गोड वसंत


दाराशी उमललेलं गोड वसंत


 आज घरचा दरवाजा उघडा ठेवला होता. तीर्था ला खेळवण्यात गुंग असताना अचानक लहान मुलांचा गोड गोड आवाज कानावर आला. क्षणभर वाटलं—कोण आलंय बाहेर? म्हणून मी माझी साडेसहा महिन्यांची लेक तीर्थाला उचलून दारापाशी गेले.


दार उघडलं तर दिसलं की वरच्या मजल्यावर ट्युशनला जाणारी लहान मुलं ट्युशन संपवून घरी निघाली होती. त्यांच्या चकाकणाऱ्या डोळ्यांमध्ये आणि खसखसणाऱ्या हसण्यात एक वेगळीच निरागसता होती.


मी तीर्थाला दाखवत म्हणाले,

“बघ… तुझ्यासारख्या दीदी आहेत या! या ट्युशनला येतात. तू पण मोठी झालीस की जाशील ना?”


तीर्थाने तिच्या छोट्या हातांनी हवेत फडफड करत ‘आ-बा-बा’ करत होकार दिला. माझ्या मनात एक वेगळीच ऊब पसरली.


तेवढ्यात मी त्या मुलींना हसत विचारलं,

“आप इसको लेकर जयोगे क्या कल?”

त्यापण हसत म्हणाले, “हा"

मी पण लगेच म्हटलं इसकी एक स्केट और दो बुक्स है, इतना बस.”





त्यावर त्यांपैकी एक मुलगी अगदी कौतुकाने म्हणाली, “बॅग भी है क्या इसके पास?”

मीही हसत होकार दिला, “हां, है ना छोटी सी!”


नंतर मी त्यांची नाव विचारली — रिद्धिमा, अनुष्का आणि अनन्या. अतिशय गोड, नम्र आणि हसतमुख मुली. मग मीही त्यांना माझ्या लेकीचं नाव सांगितलं,

“इसका नाम तीर्था है.”


मी त्यांना विचारलं, “तुम्ही कुठे राहता?”

त्या म्हणाल्या, “जयश्री अपार्टमेंट.”


तेवढ्यात मी त्यांना परत विचारल,

“घर में आओगे क्या?”

तर नाही म्हणाल्या.


दरम्यान, तीर्था पण त्याच्या सोबत हया होहुहू आआबब्ब..

करायला लागली.

तीर्थाने उत्साहाने सगळ्यांच्या छोट्या हातात हात ठेवून ‘हाय’ केलं, ‘बाय-बाय’ केलं. तिच्या त्या निरागस गोड हसण्याने सगळ्यांच्याच चेहऱ्यावर अधिकच हसू उमटलं.


शेवटी मी त्यांना विचारलं,

“उद्या ट्युशन किती वाजता?”

त्यांनी एकदम एकत्र हसत उत्तर दिलं,

“छे बजे (सहा)वाजता!”


आणि त्या उड्या मारत, एकमेकींच्या हातात हात घालून निघून गेल्या.

दार बंद करताना मनात वाटलं — किती छान असतं ही लहान मुलांची दुनिया! निरागस, साधी, पण मन भरून टाकणारी.





✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...