Showing posts with label निस्सीम प्रेम. Show all posts
Showing posts with label निस्सीम प्रेम. Show all posts

Wednesday, July 26, 2023

प्रेम आणि काळजी

 प्रेम आणि काळजी

काळजात जर प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतुन व्यक्त होत असत.... पण अति काळजी आणि अति प्रेम हे दोन्हीही वाईट असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं का साखर गोड आहे म्हणून चहा मध्ये कपभर टाकत नाही किंवा मिठाशिवाय चव नाही म्हणून मुठभर मीठ टाकत नाही. त्याच पद्धतीने काळजी आणि प्रेम हे लिमिटमध्ये असेल तरच त्याचा आनंद मिळतो अन्यथा त्याचा त्रास होतो.. अगदी तुमच्या रक्ता मासाचे जरी नाते असले तरीसुद्धा प्रत्येकाचे आपले वेगळे विश्व असते प्रत्येकाला त्याची स्पेस हा द्यायलाच हवी....

      अर्थात ती स्पेस एवढिही नको की त्यात कसलीच माया भावना नाही थोडक्यात, काय तर प्रत्येक गोष्ट की बॅलन्स असण गरजेचे आहे... 

      प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात....माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते..... पण सातत्याने तोच सुवास डोकेदुखीला ही कारणीभूत ठरतो.... म्हणूनच लक्षात ठेवा " अती " कोणतीही गोष्ट नसावी...


✍️वसुधा इंगळे

Tuesday, May 2, 2023

सोबत

सोबत..



आपल्या आयुष्यात खुप चांगली माणसं असतात,त्यापैकी कित्येक माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.पण त्यांच प्रेम आपल्याला समजायला खुप वेळ जातो आणि समजलं तरी आपण ते गृहीत धरतो.

यामध्ये प्रामुख्याने आपल्या घरातील माणसं,जवळचे मित्र असतात. आपले आई वडील, आज्जी आजोबा आणि घरातील इतरं सगळे. म्हणजे आपली माणसं जी आपल्यावर प्रेम करतात. ती शब्दात सांगत नाहीत त्यांच आपल्या वर किती प्रेम आहे ते आपल्यासाठी काय करतात पण ते प्रेम,काळजी त्यांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्यासोबतच्या अनुभवातून समजत जातं आणि हे तेव्हा जास्त प्रकर्षानं समजतं आणि जाणवतं जेव्हा ती माणसं आपल्याजवळ नसतात. त्यावेळी त्यांची खरी उणीव भासत असते. त्यांच्या आठवणी दाटून येतात आणि वाटतं आपण त्या माणसांसाठी खूप काही करायला हवं होतं. पण ते राहुन गेल्याची खंत कायम मनात सल बनून राहते.

जी माणस आयुष्यात असण्यानं जितका फरक पडतो, त्यापेक्षा त्या माणसांच्या नसण्यानं फरक पडतो.

मग आता जी माणसं आपल्याजवळ आहेत, ज्याचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे.

त्यांच्याशिवायच आयुष्याची आपण कल्पना नाही करु शकत. अशा माणसांसाठी आपण काय करू शकतो??

मला वाटतं आपण या माणसांना प्रेम देऊ शकतो. त्यांच्या प्रेमाचा आदर करु शकतो. त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो जे त्यांना आनंद देऊन जाईल.

ती माणसं आपल्याजवळ नसताना त्यांच्या आठवणीत खंत व्यक्त करण्यापेक्षा, ते आपल्याजवळ आहेत तोवर त्यांना निस्सीम प्रेम,आनंद आणि आदर दिला तर आपल्यातील प्रेम शब्दात व्यक्त करावं लागणार नाही, आणि खंतही राहणार नाही.


आयुष्य खूप सुंदर आहे तितकंच ते खूप छोटं आहे. ते जगताना आपण इतकं व्यस्त होतो की खरं जगणंच विसरून जातो. ज्या माणसांसाठी सगळं काही करतो.त्यांच्यासोबतचे सुंदर क्षण मिळवायचं मात्र विसरतो.


त्यामुळे जेव्हा ते आपल्यासोबत आहेत, तेव्हा त्यांच्यासोबतच जगणं भरभरून जगायला हवं


✍️ वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...