Showing posts with label विरह. Show all posts
Showing posts with label विरह. Show all posts

Sunday, July 23, 2023

माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका

 माणसांमध्ये खूप जास्त गुंतून पडू नका


जीवन जगत असतांना आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. त्यामधून काही निघून जातात, काही माणसे आपल्यासोबत जोडले जातात. काही माणसांचा सहवास आपल्याला आवडायला लागतो कारण सहवासाने आवड निर्माण होत असते आणि मग आपण कधी त्या व्यक्तीमध्ये गुंतलो हेच आपल्या लक्षात येत नाही.


आपण ज्यावेळी त्या व्यक्तीमध्ये गुंततो तेंव्हा आपण त्या व्यक्तींवर खूप जास्त अधिकार दाखवत राहतो. मग ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, तेंव्हा या गोष्टीचा खूप जास्त मानसिक त्रास हा आपल्याला सहन करावा लागतो. काही गरज नसतांना विनाकारण आपल्यावर दुःखी राहण्याची वेळ येते. या सर्व गोष्टी आपण खूप जास्त माणसामध्ये गुंततो त्यामुळेच घडतात. आजपासून एखादया व्यक्तीसोबत एवढं पण अटैचमेंट नका ठेवू की, ती व्यक्ती थोडं वेगळी वागली किंवा तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागेल.



आपल्याला जर यापुढील आयुष्य अगदी आनंदाने, समाधानाने जगायचे असेल तर आपण आपली ऊर्जा ही आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी वापरूया. म्हणजेच आपण आपलं हे आयुष्य एखादया कामात व्यस्त ठेवा आणि मग ते 'काम' पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दयायचं. मग आपल्याला हे पाहण्यासाठी वेळच नाही मिळणार की, कोणं काय करत आहे किंवा हा व्यक्ती असा का वागत आहे?.


आपला खरा प्रॉब्लेम झालाय कुठे तर आपण आपलं आयुष्य हे काही ठराविकच लोकांसोबत बांधून घेतलं आहे त्यामुळे ते लोकं थोडं जरी आपल्या मनाविरुद्ध वागले तर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपले अनेक दिवस याच गोष्टीमुळे दुःखात जात आहेत. 


मित्रांनो, आपलं आयुष्य हे अनिश्चित आहे. आपल्या आयुष्यात काय घडले पाहिजे हेच आपल्या हातात नाही. तिथं कुठ आपण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल विचार करून स्वत: ला त्रास करून घ्यायचा. त्यांपेक्षा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्यानं कसं वागलं पाहिजे याचं त्याला स्वातंत्र्य आहे. विनाकारण त्यांच्यामध्ये गुंतून पडायचं नाही.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, June 21, 2023

आठवण

 आठवण


तुझी असण्यापेक्षा 

नसण्याची सवय जास्त 

मी रिकामीच रे 

तू मात्र कामात व्यस्त


खूप काही मनात साचून राहलेल

तुझ्या येण्या कडे लक्ष लागलेल

येशील तेव्हा मनसोक्त बोलु

सुखदुःखाचे कवाड खोलू


गप्पा च्या ओघात 

भान वेळेचे विसरू 

प्रितीच्या अस्मानी

सुखावेल सैरभैर पाखरू


शब्दांनीच ओंजळ

एकमेकांची भरू ... 

तृप्त होऊ मिठीत

दुःख विरहाचे विसरू...



निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...