अभिनंदन
एकच गोष्ट " मेहनत". आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर माणूस जग जिंकू शकतो.
मेहनत करण्याची तयारी आणि आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या माणसांची साथ असेल तर केलेल्या कामातून समाधान मिळतेच.... एक नवीन ऊर्जा तयार होते. येणाऱ्या काळात आणखी चांगली कामं करण्याची इच्छा निर्माण होते.
आयुष्यात काही स्वप्नं आपल्या अगोदर आपले आई-वडील पाहत असतात. तुमच्यासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुम्हाला पुर्ण करायचे आहे. त्यातले हे एक खरतरं....
आयुष्य जगत असताना भेटणारी माणसं अनेक असतात पण कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाच्या सोबत राहायचे हे त्या माणसाच्या विचारावर, स्वभावावर आणि मेहनतीवर ठरत असते. नरेंद्र इंगळे त्यातलेच एक नाव. ज्याच्या सोबत उभं राहताना आनंद होतो आणि ज्याचा अभिमान ही वाटतो. आज घरच्यांना, मला, तुमच्या मित्र मैत्रिणी ना तुमच्यासाठी आनंदी झालेलं पाहून मी समाधानी झाले. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.....
✍️वसुधा इंगळे
