Showing posts with label पाऊस. Show all posts
Showing posts with label पाऊस. Show all posts

Monday, July 24, 2023

इर्शाळगड

इर्शाळगड



 इर्शाळगडाच्या पायथ्याशी

 नांदत होते एक गांव, 

क्षणात झाले भुईसपाट 

इर्शाळवाडी त्याचं नाव...


चिल्ल्यां पिल्ल्यांचा तो आवाज 

अचानक दबला गेला, 

गोठ्यातच अंत झाला...

हंबरणाऱ्या जनावरांचा


जीता जागता माणूस 

जमिनीत गाडून मेला, 

रक्ताच्याच पावसाने 

रक्ताचा चिखल झाला...


असा कसा हा निसर्ग

गावावर होता कोपला,

हुंदक्यात अडकला श्वास 

चहूकडे फक्त चिखलच सोडून गेला...


माळीन, तळीये नंतर आता इर्शाळवाडी 

अजुन किती नाहक बळी जाणार ?? 

का समजत नाही मानवाला, 

की तो सुद्धा असाच वागणार...

निसर्गाच्या विरुद्ध वागलो

की तो सुद्धा असच विरुद्ध जाणार...


निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...