Sunday, April 30, 2023

स्त्रीला काय हव असतं

 सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित.       

"स्त्रीला काय हव असतं?? "


एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


 प्रश्न असा होता, की ... स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजा, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."

राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली. विद्वान बराच फिरला, 

अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली, पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, "दूर जंगलात एक हडळ राहाते ती नक्की सांगू शकेल ...या प्रश्नाचं उत्तर."

विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. हडळ म्हणाली ...

 "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."

विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

तर जीव राजाच्या हातून जाणारच आहे,  म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला होकार दिला. 

लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली, "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता निर्णय घेतला आहे की ...१२ तास ... मी हडळ आणि १२ तास सुंदर परी होऊन राहीन.

आता तुम्ही मला सांगा ...दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?विद्वानांनं विचार केला ... जर ही दिवसा हडळ झाली,तर दिवस सरणार नाही, आणि रात्री झाली तर रात्र सरणार नाही . शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

"जेव्हा तुला वाटेल तेव्हा परी हो, जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो. त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, त्यामुळे मी नेहमीसाठीच परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


स्त्रीला नेहमी ....आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.जर स्त्रीला ....तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽  परी होऊन राहिल, नाहीतर हडळ.  👈🏽

◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

◆  खुशीही तुमचीच आहे  ◆सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷

आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

 कुणाच्या घरी परी आहे ?

              

Saturday, April 29, 2023

सेक्स की संभोग-भाग ३

सेक्स की संभोग - भाग ३


संभोग ही सर्वात सुंदर भावना आहे. फक्त ती न समजल्यामुळे जगात सर्वत्र वेड्यांची जत्रा आहे असंच दिसून येईल. काही साधू संन्याशी लोकं  या संभोगापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की संभोगापासून मुक्ती मिळवली की खरा परमार्थ होतो किंवा खरा संन्यासी होता येतं. पण पृथ्वीतलावरील हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपण बघितलं असेल की अशा प्रकारचे अनेक साधू संन्यासी आपल्याच आश्रमात अनेक मुली महिलांवर भक्तांवर अत्याचार करतात. कारण संभोग हे निसर्गाने बहाल केलेलं कर्म आहे याचं ज्ञान नसतं. आणि संभोग हे कर्म आहे म्हटल्यावर आपण जोपर्यंत शरीर रुपात आहोत तोपर्यंत ते कर्म लागू पडतं. पण अशा मूर्ख आणि अज्ञानी लोकांना काय बोलावं !!


हल्ली नुसत्या वासनेच्या भूकेपायी लोकं लहान लहान मुलींवर , तरुणींवर आणि महिलांवर देखील शारीरिक अत्याचार करतात. इंटरनेटच्या या युगात सर्सास सगळ्यांकडे मोबाईल आहेत. पण मोबाईल वर अश्लील व्हिडिओ, अश्लील फोटो अशा घाणेरड्या गोष्टीच जास्त बघितल्या जातात. त्याचाच हा परिणाम जास्त आहे. आताचे चित्रपट सुद्धा जवळजवळ अश्लीलच दाखवले जातात. अश्लील शिव्या देणं हा सुद्धा घाणेरडा संस्कार खूप लहान वयात अनेकांवर झालेला असतो. हल्ली जास्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी सुद्धा सोशल मीडियावर अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात. आणि शॉर्टकटच्या जमान्यात आजकाल अनेक तरुण तरुणी खूपच शॉर्ट कपडे वापरताना दिसतात. त्यामुळे अनेक लोकांची वासनामय बुद्धी झालेली आहे. खूप वेळेस असंही दिसून येईल की प्रेमाच्या नावाखाली शारीरिक सुखासाठी सगळी प्रेमाची नाटकं केली जातात. 



Friday, April 28, 2023

सेक्स की संभोग-भाग २

सेक्स की संभोग - भाग २

 या विश्वात जो जीव रूपाने जन्माला आला त्याला भूक, झोप, भीती आणि मैथुन ही चारही कर्म लागू होतात. म्हणजेच मैथुन हे प्रत्येक जीवाचं कर्म आहे. आणि हे आपलं कर्म आहे हेच खूप लोकांना माहीत नाही आणि हेच मोठ्ठं अज्ञान आहे. आणि म्हणूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. निसर्गातील माणूस सोडून इतर सर्व जीवांच्या ठिकाणी चालणारी संभोगाची प्रकिया ही निसर्गाच्या नियमानुसार ठराविक काळात आणि योग्य वेळेत होत असते. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व जीवांच्या ठिकाणी होतो तो खरा संभोग. परंतु माणसांच्या बाबतीत याच संभोगाचा आनंद घेणारे खूप कमी लोक आहेत. कारण अनेकांच्या बाबतीत सेक्स होत असतो तो म्हणजे वासनेने बरबटलेला. म्हणजेच नुसत्या शारीरिक कवायती केल्यासारखं. संभोग ही निसर्गाची सर्वांग सुंदर अशी दिव्य व्यवस्था आहे. पण आपल्याला ही व्यवस्था न समजल्यामुळे आपली अवस्था झाली आहे.


संभोग ही निर्मितीची व्यवस्था आहे. विश्वात जी जी निर्मिती झाली किंवा जे काही नवनिर्मिती होत आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संभोग. पावसाच्या पाण्याचा आणि मातीचा जेव्हा संभोग होतो तेव्हा त्यातून गवत उगवतं. झाडावरच्या फळाचा आणि निसर्गातील पोषक वातावरणाचा त्या फळाशी जेव्हा संभोग होतो तेव्हाच ते फळ परिपक्व होतं. संभोग ही निसर्गाची देणगी आहे. पण हे खूप लोकांना समजत नाही आणि त्यामुळे ते उमजायचा प्रश्नच नाही. 

Wednesday, April 26, 2023

निस्वार्थी प्रेम

निस्वार्थी प्रेम



बघ ना एकदा डोळ्यात माझ्या..

दिसतील भरलेल्या आठवणी तुझ्या..


दिसेल माझ्या नजरेत तुझेच रूप..

प्रेम आहे तुझ्यावर खूप म्हणजे खूप..


मनाच्या ओढिने तुझ्या जवळ आले..

निखळ भावनेने एकरूप झाले..


मान्य आहे थोडा हट्ट करते मी..

प्रेमाचा हा धागा घट्ट केला मी..


इतक्या दिवसाच्या ओढीने 

तुला जवळ घेतलं..

एकरूप होऊन तुझ्याशी 

जणू स्वर्ग सुखच भेटलं..


बघ पुन्हा एकदा माझं हृदय हलवुन..

बघ सार अंतरंग आतून बाहेरून झुलवून..

बघ तुला कुठे त्यात वासना दिसते का?

मग तुला कळेल, खऱ्या प्रेमाला मर्यादा असते का..


अजूनही माझं जीव तुझ्यासाठीच झुरावा..

मग का रे अबोला आणि कसला दुरावा..?


सारी नाती, सारे बंध

सगळ्या पल्याड जाऊन बघ..

होऊन धुंद-बेधुंद,

ह्या क्षणात एकदा वाहून बघ..


माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर..

आयुष्यभर ते असच राहील..

तुझं आहे का रे मझ्यावर?

की एका हट्टामुळे ते विरून जाईल?


पूर्ण झालोय आपण त्या क्षणाला

मनाने आणि तनाने ही..

याची ग्वाही दिलीय हृदयाने,

आणि शरीराच्या प्रत्येक कणानेही..


विचारातून बाहेर येऊन बघ..

पुन्हा तुझ्या मिठीत घेऊन बघ..

माझा प्रेमाचा ओलावा

तुझ्या हृदयात भिडवून बघ..


आता नाही रे शक्य..

तुझ्याशिवाय माझं जगणं

केवळ अशक्य..


काही वावग नाही केलं आपण,

आरश्यात स्वतःकडे बघून घे..

सोडून दे सगळे विचार,

ह्या क्षणात मनमुराद जागून घे..


प्रेम करणं कधीच

गुन्हा ठरत नाही..

पण खरं प्रेम पुन्हा

पुन्हा मिळत नाही..


प्रेमात आणि युद्धात

सगळं सगळं माफ असत..

शुद्ध भावनेनं एकरूप

होण्यात काहीच पाप नसत ..


✍️वसुधा इंगळे.


पूर्ण केलेली माझी पहिली कविता;

(चार वर्षा पूर्वी सहज काही ओळी लिहून ठेवून दिलेल्या चारोळ्या होत्या.  नंतर जवळ जवळ मागच्या वर्षा पर्यंत तरी ह्या चारोळ्याच होत्या. नंतर हळू हळू त्यात काही आठवणी आणि क्षणाची चारोळ्या च्या मध्यमातून भर पडत गेली. अजून 2-4 चारोळ्या लिहिल्या. त्या नंतर जसा मूड होईल किंवा काही आठवलं तर ते मनातले विचार कागदावर उमटले जाऊ लागले, आणि ह्या चारोळ्या ची कविता होत गेली, जी मी काल पूर्णत्वास नेली.)

सेक्स की संभोग-भाग१

 सेक्स की संभोग - भाग १


तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे ??सोप्पं आहे!!  सेक्स म्हणजेच संभोग आणि संभोग म्हणजेच सेक्स. पण मला वाटतं सेक्स म्हणजे संभोग न्हवे. पण संभोग म्हणजेच 100% सेक्स.

खरं म्हणजे सेक्स हा विषय सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फक्त खूप सारे लोकं उघडपणे बोलणं टाळतात किंवा बरेच लोक लाजतात सुद्धा. पण सेक्स हा जवळजवळ सगळ्यांच्या आवडीचा प्रांत. फक्त सेक्सविषयी आपल्या समजुती आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हाच मुळात चुकीचा आहे त्याचं कारण सेक्सबद्दल खूप लोकांना योग्य ज्ञान नाही. आणि जे ज्ञान आहे ते चुकीचं. म्हणून आज अनेक नात्यांमध्ये गोंधळ सुद्धा दिसून येतो.


सेक्सला मराठीत संभोग असा अर्थपूर्ण शब्द आहे. सेक्स हा शब्द उच्चारताना किंवा ऐकल्यावर तो वासनेने बरबटलेला असा वाटतो. पण संभोग हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना नैसर्गिक आनंदाचं मिलन अशी सुंदर भावना उमटते. कारण *संभोग म्हणजे समान भोग घेणं किंवा समान आनंद घेणं असा सुंदर अर्थ आहे*. पण आपल्याकडे आजही स्त्री केवळ एक भोगवस्तू , मुलांना जन्म देणारी किंवा पुरुषांच्या वीर्यपतनाचं साधन या भावनेनेचं स्त्रीकडे पाहिलं जातं. किंबहुना तसेच संस्कार लहानपणापासून तिच्यावर केले जातात.



मॅक्डोल्ड्स

 मॅक्डोल्ड्स




बऱ्याच दिवसा पासून बाहेर गेलो नव्हतो, गेलो नव्हतो म्हणण्यापेक्षा एकमेकांना भेटलोच नव्हतो अस म्हणता येईल. आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच तब्बल पाच दिवसानी एकमेकांशी समोरासमोर बोलणं झालं. अगदी खिंड लढवून आल्यासारखं वाटलं. नंतर विचार केला कुठे तरी बाहेर जाऊया मार्केट मध्ये थोडं फार समान खरेदी करायचं होतं ते करू आणि बाहेरच जेवण करून येऊ. 

मॅक्डोल्ड्स मध्ये गेलो🥰 छान फोटो आणि व्हिडिओ काढले, नवरोबा चक्क पाच दिवसानी भेटले होते.... आनंद अगदी ओसंडून वाहत वैगेरे होता, आणि खान्यातच इतके मंत्रमुग्ध झालो की एक ऑर्डर खाऊन झाली🤣 दुसरी ऑर्डर केली अहोनी....


खा बाबा एकदाच खा....परत सोमवार पासून मी गायब असेल तुझे लाड तरी करून घेऊ अस म्हणत. दुसरी ऑर्डर केली🥰🤣


इकडे तिकडे बघून झालं, कॉमेंट पास करून झाल्या, गप्पा झाल्या, थोडी (थोडीच करते) माझी पाच दिवसाची बडबड होती, ती करून झाली, काही गोष्टी सांगायच्या होत्या, काही विचारायच्या होत्या. त्या पण झाल्या...... 


दुसरी ऑर्डर पण खाऊन झाली, आता गर्दी वाढायला लागली, म्हटलं जाऊ या आता घरी....घरी निघालो.


चक्क चार दिवसानी आठवल की आपण कार्ड तर तिकडेच विसरून आलो आहोत, आणि चार दिवसांनी ते घेऊन आलो. 🤣🤣🤣


✍️वसुधा इंगळे

Tuesday, April 25, 2023

नेटवर्क म्हणजे खरंच मायाजाल आहे.

नेटवर्क म्हणजे खरंच मायाजाल आहे.



 Facebook  किंवा तत्सम सोशल मिडीयातून होणाऱ्या सो कॉल्ड फ्रेंड्स वर विश्वास टाकताना...

   Be careful  about what you share... खास करून आशा मैत्रिणी ज्यांना एकटेपणा जाणवतोय आणि तो कमी करायला कुणी मित्र भेटला आहे fb ला! खूप बायका रिलीफ मिळालाय अस वाटून नको नको त्या personal गोष्टी share करत जातात.. का? कशासाठी?... तर काहींना बोलून बरं वाटतं... अहो ज्यांच्या सोबत राहाताय त्यांना सुद्धा तुम्ही नीट ओळखत नसता... मग हे तर... व्हरचुअल नातं!! 

     समोरचा या माहितीचा कसा कुठे वापर करेल माहीत नसतं! खूपदा अस होत की समोरची व्यक्ती जे सांगेल तेच बायका खरं समजतात मग ते त्या व्यक्तीबद्दल असो, त्याने त्या बाईच्या रूपाचं केलेलं कौतुक असो, किंवा तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल  त्याने दिलेल्या comments असो .... U never know....

       का सांगायचं आपलं काही... कुणा तिर्हाईताला?... तो काय करेल? असा कुणी जादूगार नसतो, जो कांडी फिरवेल आणि आपलं आयुष्य सुंदर बनवेल... आपली लढाई ...always आपली स्वतःचीच असते. आता हे आपल्याच कर्मामुळे किंवा अजून काहीही नाव द्या त्याने fact बदलणार नाही. मैत्री असावी ...पण मर्यादा जाणून...  fb सारखं माध्यम फक्त जोडून देत...  कोण कसं? याची खात्री देत नाही हे भान असू द्यावं.

        अनेक बायका आशा आगंतुक मैत्रीच्या जीवावर... घरांमध्ये भांडण करतात, बिघडलेली नाती अधिक complicated करतात आणि त्यांना जो सोडवेल यातून अस वाटणारा... mr मॅजिक असतो तो अशी सत्य समोर आल्यावर ब्लॉक करून बेपत्ता होतो... आणि मग यांचा सुरू होतो तो दुःख आणि सूडाचा प्रवास... ज्यामुळे त्यांचं कणभरही भलं होणार नसतं. उलट त्या अधिक powerless, inconfident आणि विचारीपणा पासून अधिक दूर जातात.

       जे तुमची खाण्या पिण्या पासून सगळी जबाबदारी घेऊन तुम्हाला सांभाळतात ...तेच तुमचे खरे कुणी असतात... मग ते पालक असो वा जोडीदार... हॉस्पिटल ला न्यायची वेळ आलीच तर ... fb वर entertain करणारा सो कॉल्ड mr मॅजिक येणार नसतो कधीही.. हेच वास्तव आहे... 

          नेट वर्क म्हणजे खरंच मायाजाल आहे हे... यात किती अडकायच? कशाचा जीवावर? याचा सारा सार विचार मनात हवा... आणि आयुष्यात लढण्यासाठी पूर्णतः स्वतः वर विश्वास हवा.. आज काल अस झालय की रक्ताची नाती सुद्धा आपली राहत नाहीत. त्यात मग अशा मायावी नात्यांना भुलून आपलं वाटोळं होण्याआधी सावरायला हवं. आपल्या पारखी नजरेला थोडं धार करून ठेवायला हवं... कुठलीही व्यक्ती तुमच्यावर तोवर जबरदस्ती नाही करत ..जोवर.. तुम्ही त्याला .. पर्सनल लेव्हल वर आत शिरू देत नाही...  त्यामुळे... नंतर दोष त्या परक्या व्यक्तीला देण्यापेक्षा... स्वतःला मजबूत बनवावं... आणि माध्यमाला त्याच्या कुवती प्रमाणे वापरावं.


✍️वसुधा इंगळे.

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं




 वेळ थोडाच आहे 

आता सावरायला हवं ,

काहीतरी निसटून चाललं आहे

ते थांबायलाच हवं 

पुढे तर खूप आलो 

आता थोडं मागे वळून पहायला हवं 

आपलं काही चुकत तर नाही ना?

 हे आता बघायला  हवं

 मी ,माझं न करता "आपले" पण जपायला हवं

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं.

स्वभाव

स्वभाव



कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं. कारण समोरच्या वर चिडणं खूप सोप्पं आहे पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघुन जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते, हवा आली की उष्णता निघुन जाते, प्रकाश आला की अंधार निघुन जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात. 

जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेंव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय, आणि कोण सावरायला येतंय. 

कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब, सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.


माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव बदलत नाही...


✍️ वसुधा इंगळे

Monday, April 24, 2023

स्त्री

 स्त्री



कुठल्याही स्त्रीशी मैत्री करायची तर ती मनात काही अपेक्षा न ठेवताच करायची असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त हुशार असतात. दहा लोकांच्या गर्दीत कोणाचा हाथ चुकून लागलाय अन् कोण मुद्दाम स्पर्श करतोय हे अचूक ओळखू शकणारी स्त्री तुमच्या मनात काय सुरु आहे, हे पहिल्या चार वाक्यातच ओळखून जात असते.. आणि तुम्हाला कसे ट्रीट करायचं किती मैत्री करायची, किती अंतरावर ठेवायचं हेही फिक्स झालेले असत तीच ...मैत्रीचं करायची तर आधी आपले मन साफ करायला शिकायला हवे.. मनात काही वेगळे ठेवून मैत्री करायला जाल.. तर just remember she knows it all..


✍️वसुधा इंगळे.

Saturday, April 22, 2023

वेड पांघरून पेडगावला जाणे

 आजकाल मुलांचं फाजिल लाड/कौतुक करणारे पालक प्रचंड वाढलेत. 

माझ्या लहानपणी बहुदा मुलांचं अजिबात कौतुक न करणारेच पालक जास्त असायचे म्हणून हा फरक प्रकर्षाने जाणवतो.

माझ्याही आईवडीलांनी तोंडावर माझं भरभरून कौतुक/ लाड वगैरे केलेलं मला आठवत नाही. 

"पानात पडेल ती भाजी खायची नको असेल तर रहा उपाशी" अशी शिस्त!

आरशासमोर जरा जास्त वेळ उभं राहिलं तरी मला टपलीत पडायची!

अर्थात त्यांच्या त्या parenting style मुळे आज माझ्यातला आत्मविश्वास कमी झालाय वगैरे मला अजिबात वाटतं नाही. 

उलट त्यामुळे स्वतःला अधिक प्रभावी बनवण्यासाठी मला indirectly motivation च मिळालं!

असो.


तर हे सांगायचं प्रयोजन म्हणजे, काल एका कार्यक्रमात मला एक अतिउत्साही पालक भेटले.

"माझी मुलगी फार सुंदर गाते. तुम्ही तिचं गाणं एकदा ऐकाचं! मी व्हिडीओ पाठवतो." अस म्हणाले. मी बरं म्हटलं.

पण तेवढ्याने काही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी लगेच मोबाइल काढला.

मी नको नको म्हणत असतानाही हट्टाने त्यांनी त्यांच्या मुलीचा व्हिडीओ मोबाईलमधे play केला. कुठल्याश्या कार्यक्रमात ती गायली होती तेव्हाचा व्हिडिओ होता.

खरतर अशाप्रकारे offline संभाषणात मोबाईलचा online व्हिडीओ पाहाण्याची गळ घालणारे लोकं मला अजिबात आवडत नाहीत.

पण तरीही I decided to be polite at that time.

त्यांचा मोबाईल मी हातात घेऊन पाहिलं तर सहा मिनिटाचा व्हिडिओ होता. 

शिवाय सुर, ताल, लय कशाचीही तमा न बाळगता ती बारा वर्षे वयाची मुलगी कमालीची बेसूर गात होती. 

माझ्याकडे खरच वेळ नव्हता व होता तो वेळ मला त्याक्षणी व्हिडिओ पाहाण्यात फुकट घालवायचा नव्हता. म्हणून मी "आता वेळेअभावी व्हिडिओ पाहू शकत नाही. पण तुमच्या मुलीला रियाज करत राहायला सांगा." अस म्हणत स्वतःची सुटका करून घेतली.


मी विचार करू लागले की या पालकांना आपल्या मुलीचं कौतुक आहे हे ठिक आहे. पण मुलीकडे गाणं गाण्याची aptitudeच नाहीये हे खरच त्यांच्या लक्षात येत नसेल का? की लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जाऊ पाहातायत?

सतत खोटी स्तुती ऐकत राहिलेली त्यांची मुलगी जेव्हा खर्या दुनियेला सामोरी जाईल तेव्हा तिचं काय होईल?

दुनियेतल्या इतर लोकांकडून खराखुरा feedback कधीतरी मिळेलच व तो मिळाल्यावर तिला कोलमडायला झालं तर तिला कोण सावरणार? 


किंवा कदाचित त्या मुलीला स्वतःलाच वस्तुस्थितीचं भान आलं तर ती मुलगी स्वतःसाठी वेगळा मार्ग निवडेलसुद्धा! पण खोटी स्तुती करणार्या पालकांवरचा तिचा विश्वासही तेव्हा उडालेला असेल.


तुम्हाला काय वाटतं?

डॉ मैथिली सावंत

Monday, April 10, 2023

नेहमी आनंदी राहा

 कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा,

आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा.


नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे... बोलताना शब्दाची  उंची वाढवा आवाजाची नाही.


कारण...

पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते

विजांच्या गडगडाटामुळे नाही..

वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबकं असतं...

डबक्यात डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!!

निवड आपली आहे..


कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन...भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.


जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!!!


मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि राजहंस मारताना सुद्धा गातो...


दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...

आणि सुखाच्या आनंदात कुणीही  झोपत नाही यालाच जीवन म्हणतात


किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, 

मग जगावे हसत खेळत कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही...


म्हणून नेहमी आनंदी राहा.


✍️ वसुधा इंगळे

Thursday, April 6, 2023

न उलगडलं कोड

 कसा आहे तू हे सांगणंही कठीण आहे.

कधी खूप चांगला वाटतो तर कधी खूप वाईट.

कधी कधी अस बोलतो की मनात अगदी खोल शिरतो.

आणि कधी असा की मनातून पण पार उतरतो.

कधी कधी तुझ्याशी बोलताना खूप राग येतो तर कधी खूप आनंद पण होतो.

कधी कधी अभिमान वाटतो तर कधी पछाताप पण होतो.

कधी कधी तू आपलेसा वाटतो तर कधी परका असल्याची जाणीव होते.

पण खरंच कसा आहे तू हे अजून मलाच नाही कळले. बहुतेक अस वाटत की कधीही न सुटणार कोड आहेस तू........


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...