सेक्स की संभोग - भाग १
तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे ??सोप्पं आहे!! सेक्स म्हणजेच संभोग आणि संभोग म्हणजेच सेक्स. पण मला वाटतं सेक्स म्हणजे संभोग न्हवे. पण संभोग म्हणजेच 100% सेक्स.
खरं म्हणजे सेक्स हा विषय सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फक्त खूप सारे लोकं उघडपणे बोलणं टाळतात किंवा बरेच लोक लाजतात सुद्धा. पण सेक्स हा जवळजवळ सगळ्यांच्या आवडीचा प्रांत. फक्त सेक्सविषयी आपल्या समजुती आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हाच मुळात चुकीचा आहे त्याचं कारण सेक्सबद्दल खूप लोकांना योग्य ज्ञान नाही. आणि जे ज्ञान आहे ते चुकीचं. म्हणून आज अनेक नात्यांमध्ये गोंधळ सुद्धा दिसून येतो.
सेक्सला मराठीत संभोग असा अर्थपूर्ण शब्द आहे. सेक्स हा शब्द उच्चारताना किंवा ऐकल्यावर तो वासनेने बरबटलेला असा वाटतो. पण संभोग हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना नैसर्गिक आनंदाचं मिलन अशी सुंदर भावना उमटते. कारण *संभोग म्हणजे समान भोग घेणं किंवा समान आनंद घेणं असा सुंदर अर्थ आहे*. पण आपल्याकडे आजही स्त्री केवळ एक भोगवस्तू , मुलांना जन्म देणारी किंवा पुरुषांच्या वीर्यपतनाचं साधन या भावनेनेचं स्त्रीकडे पाहिलं जातं. किंबहुना तसेच संस्कार लहानपणापासून तिच्यावर केले जातात.
It's true,so sad...
ReplyDeleteThank you so much
Delete