Showing posts with label कुटुंब. Show all posts
Showing posts with label कुटुंब. Show all posts

Saturday, February 4, 2023

आता मला जमायला लागलंय

 आता मला जमायला लागलंय!


आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 

जे जे मला दुखवत गेले, त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं,

आता मला जमायला लागलयं!


संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी, वाद न घालता तेथून दूर 

निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय!


माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून, त्यात शक्ती खर्ची घालून,

आजूबाजूला जे जे उत्तम आहे, त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय

हे ही जाणवायला लागलयं!


आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत

स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आता जमायला लागलंय!


कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर

काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही!

कधी-कधी काहीही न बोलणं

किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं

खूप काही बोलून जातं,

आणि सांगूनही जातं! 

हे ही कळायला लागलंय!


आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधनं आणू शकत नाही,

पण स्वतः च्या मनावर मात्र

बांध घालू शकतो.

आपण अशा लोकांचे वागणे

किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या

आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं कां?

हे ठरवणं गरजेचं असतं

हे ही कळायला लागलयं!


कधी कधी परिस्थितीला

आहे तसच सोडून देणं,

आणि शांत राहणं सोईच ठरतं!

लोकांना कुठल्याही गोष्टीचं

स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळटपणाचं आहे हे कळल्यावर मी आता मला,

त्या दृष्टीने घडवायला लागलोय!


मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षाने शोध घेत होतो ती मन:शांती, समाधान मला मिळालं तेव्हा ठरवलं की,मी अशा लोकांपासून

लांब राहावे. ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला 

त्यांच्या साच्यात बसवणं शक्य नाही त्यांच्यापासून अंतर ठेवणं

आता मला जमायला लागलयं!


सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात.

तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणाऱ्या, वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलयं!


माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं, आणि उशीरा कां होईना पण मी आता त्या वाटेवर

समाधानानं पावलं टाकायला लागलोय! 

त्या वाटेवर स्थिर राहणं,

आता मला जमायला लागलंय!🌹🌿🌾

Wednesday, February 1, 2023

निर्णय

 तुझी गोड गोड बोलून परवानगी मिळवण्याची पद्धत मला चांगलीच ज्ञात झाली आहे ... पण ज्या गोष्टी माझ्या नजरेत वाईट असतील त्याची परवानगी तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि फक्त तुमची अडवणूक करायची म्हणून नाही, तर तूम्ही चुकूनही चुकीच्या वाटेला जाऊ नयेत किंवा अडचणीत फसू नयेत यासाठीच हा अट्टहास असेल. 


मग तिथे तुमचे अश्रूही माझ्यासाठी  फक्त त्या वेळापुरते गौण असतील. हे फक्त तुमच्यापुरतंच नाही तर घरातील प्रत्येकाला लागू होईल.. फक्त व्यक्तिपरत्वे नियम बदलत राहतील. मला स्त्रीप्रधान घर नकोय मला माझ्या पाठीमागेही माझी काळजी आणि निर्णय समजणारं प्रमाणिक कुटुंब हवंय.. स्त्री म्हणून इतकंही पुरेसं आहे माझ्यासाठी..!❤️


✍️वसुधा इंगळे

Saturday, January 21, 2023

वडील ( बाप)

वडील


*वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही...

*म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल..

*कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.

*वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका....

*वडिलांचा आदर करा..

*त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील..

*वडिलांचा सन्मान करा,यातच तुमचे भले होणार...

*वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल..

*वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला....

*वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात..

*वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका....

*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही ...

*आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही..

*पण बाप तो बापच असतो..

*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे...

*पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.

*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल..

*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते...

*तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही...

*बाप असो वा वडील...

*तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच  कमी पडत नाही...

*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो...

*हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही..

*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे,धगधगता अग्नी आहे..पण मावळला की सर्वत्र अंधार आहे..

*म्हणूनच म्हणतो,, बाप बाप असतो...

*आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही...

*मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही...

*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही...

*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही..

*आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघा ...

*आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही .*🌹🌿🌾🌾🌾🌾

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...