Friday, January 27, 2023

विस्मरण

 मॅक्डोल्ड्स मध्ये गेलो🥰 छान फोटो आणि व्हिडिओ काढले, नवरोबा चक्क पाच दिवसानी भेटले होते.... आनंद अगदी ओसंडून वाहत वैगेरे होता, आणि खान्यातच इतके मंत्रमुग्ध झालो की एक ऑर्डर खाऊन झाली🤣, दुसरी ऑर्डर केली अहोनी....


खा बाबा एकदाच खा....परत सोमवार पासून मी गायब असेल तुझे लाड तरी करून घेऊ अस म्हणत. दुसरी ऑर्डर केली🥰🤣


इकडे तिकडे बघून झालं, कॉमेंट पास करून झाल्या, हसून झालं, गप्पा झाल्या, थोडी (थोडीच करते) माझी पाच दिवसाची बडबड होती,ती करून झाली, काही गोष्टी सांगायच्या होत्या, काही विचारायच्या होत्या. त्या पण झाल्या...... 


दुसरी ऑर्डर पण खाऊन झाली, आता गर्दी वाढायला लागली, म्हटलं जाऊ या आता घरी....घरी निघालो.


 चक्क चार दिवसानी आठवल की आपण कार्ड तर तिकडेच विसरून आलो आहोत, आणि चार दिवसांनी ते घेऊन आलो🤣🤣🤣


✍️वसुधा इंगळे

Wednesday, January 25, 2023

संभाषण कौशल्य Communication tips

  संभाषण कौशल्य  (Communication Tips) 


Office Communication Rule.


कामाच्या ठिकाणी होणार्या संभाषणात कुणाशीही आपल्या पर्सनल गोष्टी कधीच शेयर करू नयेत.

Its not a sign of professionalism.


कारण एक म्हणजे, जर त्या पर्सनल गोष्टी स्वतःला "बिचारा मी/ बिचारी मी" अशाप्रकारे portray करणार्या असतील तर we come across as a "Powerless Sympathy Seeking Person" 

व दुसरं म्हणजे असं करून आपण अजाणतेपणी स्वतःचा control इतरांना देत असतो.


For example - 


"माझ्या घराचा EMI अमुक आहे. त्यामुळे मला हा जाॅब करण्याशिवाय गत्यंतर नाही." 

अस जर तुम्ही तुमच्या colleagueला सांगितलंत तर तो तुम्हाला नक्की सहानुभूती ऑफर करेल. पण त्याच्याकडून हिच गोष्ट जर तुमच्या बाॅसला कळली तर या गोष्टीचा फायदा तुमचा बाॅस तुम्हाला control करण्यासाठी करून घेऊ शकतो.


किंवा "माझं व माझ्या नवर्याचं पटत नाही." अस एखाद्या स्त्री ने सांगितलं तर इतर ऑफीस मधील तिच्या मैत्रिणीकडून तिला सहानुभूती सहज मिळू शकते. त्या मैत्रीणीकडून ती गोष्ट पसरत गेली तर इतर सर्व कर्मचारी वर्गाकडूनही तिला सहनुभूती मिळेल. 

परंतू यामधे खोटी सहनुभूती दाखवून अती सलगी साधू पहाणार्या संधीसाधू पुरूषांचाही समावेश होऊ शकतो. 

व समजा त्या खोट्या सहानुभूतीला ती स्त्री बळी पडलीच तर मात्र तिचे आधीच बिघडलेले नातेसंबंध अधिक बिघडू शकतात.


(Please note काही पर्सनल गोष्टी तुम्हाला एखाद्या विशिष्ट हेतूने शेयर कराव्याश्या वाटल्या तर तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. )

✍️ डॉ मैथिली सावंत

Monday, January 23, 2023

पोस्टमन

 पोस्टमन




एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एकेदिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन"

आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"

दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचेच"

आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"

पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"

पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"

घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून दहा हजार रुपये कर्ज हवे आहे"

साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?

पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."

साहेब:- अरे! पण तुझा मुलगा धडधाकट आहे मग जयपुर फुट कोणासाठी??

पोस्टमन:- साहेब जे माझ्या धडधाकट मुलाला उमगले नाही ते एका परक्या अपंग मुलीस उमगले आणि माझे अनवाणी पायाचे दुःख कमी झाले. तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून मला कर्ज हवे आहे

सगळेच निशब्द झाले. 

सारेच गहीवरले!

Sunday, January 22, 2023

घड्याळ

 *घड्याळ ......🕰*



        जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि

 *घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले.*

        घड्याळ्यात तास काटा, मिनीट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनीट काटा म्हणजे आई,व सेकंद काटा मुलं असल्याचे जाणवले.

          या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही.

       *परिवारात वडील म्हणजे तास काटा*,  याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात.

पण ते घरातल्या कोणालाच लक्षात नसते. 

ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.


वडिलांचे म्हत्तव लक्षात येत नाही.

        *आई म्हणजे मिनीट  काटा असते.*

 प्रत्येक मिनीटाला (अगदी सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, *थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो,*

 व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

        *आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं.*

 ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

        जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटूंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे *आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्या शिवाय घराला पुर्णत्व येत नाही.*


        *पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पुर्ण झाले तरी* या साठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच

 *आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे.*

 एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,  तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला

 *तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ ऊडेल*

Saturday, January 21, 2023

वडील ( बाप)

वडील


*वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही...

*म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल..

*कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.

*वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका....

*वडिलांचा आदर करा..

*त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील..

*वडिलांचा सन्मान करा,यातच तुमचे भले होणार...

*वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल..

*वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला....

*वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात..

*वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका....

*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही ...

*आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही..

*पण बाप तो बापच असतो..

*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे...

*पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.

*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल..

*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते...

*तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही...

*बाप असो वा वडील...

*तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच  कमी पडत नाही...

*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो...

*हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही..

*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे,धगधगता अग्नी आहे..पण मावळला की सर्वत्र अंधार आहे..

*म्हणूनच म्हणतो,, बाप बाप असतो...

*आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही...

*मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही...

*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही...

*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही..

*आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघा ...

*आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही .*🌹🌿🌾🌾🌾🌾

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...