Saturday, May 6, 2023

कोणीतरी असावं

 कोणीतरी असावं


कोणीतरी असावं आईबाबानंतर निस्वार्थी प्रेम करणारं..

कोणत्याच मोहमायेत न ठेवता जवळ करणार

कधी एकटं वाटलं कि घट्ट मिठीत घेणारं

न काही बोलता मनाचं भाव ओळखणारं


कोणीतरि असावं 

कितीही राग आला तरी प्रेमाने तोंडावर हात फिरवणारं

आजारी असलं कि रात्रभर आपल्या उशाशी जागणारं 

मन भरून आलं कि मोकळं करता येईल असं असणारं

कितीही भांडल तरी साथ मात्र न सोडणार..


कोणीतरी असावं 

आपल्या पाठीवरही आपलं तोंडभरून कौतुक करणारं

आपण निपचित पडलो असता आपल्याला सावरून घेणार

आपल्यावर सतत प्रेमाचं छात्र धरणार

कोणतीच वचणं न देता पण पूर्ण करणार


कोणीतरी असावं आपलं सर्व लाड प्रेमाने पुरवणारं

आपण एखाद्याशी बोलायला गेलो तर रागाने बघणारं

कधीतरी आपल्यासोबत मोकळ्यापनान वावरणारं

कोणीतरी असावं आपल्याला मनापासून समजून घेणारं


                                            

Wednesday, May 3, 2023

हरवलेल्या भावना...

 हरवलेल्या भावना...


फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा कि आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही. कोणीही येत गुड मॉर्निंग करत. कोणी येत मला तू आवडते सांगते. कोणी येत माझ तुझ्यावर प्रेम आहे सांगते, कोणीही येत तुझ्याशिवाय माझ जग नाही सांगते, कोणी तूच माझी राणी म्हणते. कोणी माझ तुझ्यावर डिव्हाईन प्रेम आहे सांगते. कोणी मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा आहे सांगते. कोणीही येत तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतो अस सांगत. कोणी माझ्याशिवाय मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही सांगते. बर हे सगळ कोणी एकटा माणूस नाही तर रोज असे १०-२० मेसजेस तरी इनबॉक्स मध्ये धडकत असतात. आपण कोणाला इग्नोर कराव आणि कोणाला ब्लॉक? 


कोणतीही स्त्री दिसली कि ना ओळख, ना पाळख, ना तिच्या आयुष्याविषयी काही माहिती, ना तिच्या मनाची अवस्था. थोड छान बोलण झाल कि लगेच ती अव्हेलेबल आहे. ती कुठेतरी झुरते आहे स्पेशली तिच्या शारीरिक संबंधात आणि मीच तो काय हिरो जन्माला आलो आहे जो तिच्या सगळ्या माहित नाही पण निदान शारीरिक संबंधातील गरजा पूर्ण करू शकतो अश्या आविर्भावात आज प्रत्येक पुरुष बिनधास्तपणे स्त्री च्या समोर पहिल्या काही तासात उभा रहातो. तू एकटी आहेस आणि तू मला आवडतेस अस म्हणत तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाला बाजूला टाकून मी सगळ काही करू शकतो. नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे. माझ समाजात हे स्टेटस आहे. तूच माझी गरज भागवू शकते हे सांगत गोष्टी कुठूनही सुरु झाल्या तरी शरीर संबंधान पर्यंत येऊन थांबतात. हे मी नाही तर फेसबुक वापरणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगू शकेल.  


ह्या सर्वात वयाच काहीच अंतर नाही. नुकतीच मिसरूड फुटलेला २० वर्षाचा तरुण ५० वर्षाच्या स्त्री ला तर ६० ला पोचलेला एक पुरुष एका १८ वर्षाच्या स्त्री शी बोलताना फक्त तिकडेच येऊन थांबतो. तिथवर येण्याची पद्धत प्रत्येक पुरुषाची वेगळी असेल पण शेवटच स्थानक मात्र सेक्स. ना ओळख ना पाळख पण प्रेम व्हायला आणि आवड निर्माण व्हायला एक फोटो किंवा एक च्याट किंवा एक भेट पुरेशी असते आजकाल सगळ्यांना. समोरच्याला काय वाटेल, काय वाटते ह्याचा काहीच विचार नाही. आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करायच्या. समोरच्याने काही विचार करण्याअगोदर आपण गादीवर जाऊन पोचलेले असतो.  इतका उतावीळपणा?? कॉलेज ला जाणारे किंवा नुकतच तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणान कडून हे व्हाव हे एकवेळ समजू शकतो. त्या वयात येणाऱ्या भावनांना मोकळीक मिळण्यासाठी वेळ असताना किंवा मिळत नसताना त्या अश्या रीतीने बाहेर येण कदाचित एकवेळ समर्थनीय पण आयुष्य कोळून प्यायलेल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींची चव चाखलेल्या पुरुषांनकडून पण त्याच तर्हेचे वर्तन होत असेल तर आपल्या भावना हरवलेल्या आहेत हे नक्की. 


पूर्वी स्त्री आवडली तरी स्वतःच्या भावना तिच्या पर्यंत पोचवायला अनामिक भीती असायची. किंबहुना स्त्री काय प्रतिक्रिया देईल ह्यातच आयुष्याची अनेक वर्ष वाया जात. आज उलट झाल आहे. तिला काय वाटेल हा विचार करण्याची गरजच पुरुषाला वाटत नाही. मला काय वाटते ते तिने ऐकावं आणि तसच कराव. नाही ऐकल तर तिला सोडणार नाही अश्या आविर्भावात अनेक पुरुष असतात. ती काय जागा, जमीन आणि वस्तू आहे का? हक्क गाजवायला. एखादी स्त्री आवडण ह्यात चुकीच काय? अगदी पहिल्या भेटीत तिने मनाचा ठाव घेण ह्यात हि चुकीच काहीच नाही. पण त्या भावना त्याच तरलतेने, त्याच हळुवार पद्धतीने आपण मांडतो आहोत का? ह्याचा विचार प्रत्येक पुरुषाने करावा. आपली आवड हि फक्त सेक्स पुरती मर्यादित आहे कि खरच एक स्त्री म्हणून ती आपल्याला आवडते ह्याचा हि त्यात विचार असावा. 


पोर्न बघून बघून आपले विचार ज्या वेगाने मशीन होत आहेत ते खूपच धक्कादायक आहे. एकेकाळी हळुवार उमलणाऱ्या आपल्या भावना आता कुस्करून आपण बाहेर आणत आहोत. एक एक पाकळी हळुवार उमलण्याची मज्जा न घेता आपल्याला फक्त फुलाला चाखायच असते. कारण आपल्या भावनाच संपल्या आहेत. एक फुल झाल का दुसर ह्याच्या शोधात अनेक जण भटकत असतात. हेच अनेकजण एकाचवेळी एकाच फुलाच्या आंगावर धडकत असतात. कधीतरी फुल होऊन विचार केला तर हे सगळ बघून त्या सगळ्यांचा किती तिटकारा वाटत असेल ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. आपला स्लेफ रिस्पेक्ट अश्या बाजारू बाई प्रमाणे पायदळी तुडवला जात असेल. तर शांत तरी किती वेळ राहायचं आणि कोणासाठी? 


आपण आपल्या आत झाकून बघायला हव. आपण जर उठून रोज १० स्त्रियांना ज्यांच्याशी आपला किंवा त्यांचा आपल्याशी जास्ती काही संबंध नसताना. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसताना नुसतच जर आयुष्यात डोकावण होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या भावना शोधायला हव्या. ज्या कधीच आपल्यातून हरवल्या आहेत. रिस्पेक्ट, डिग्निटी जपण आणि त्याचा सन्मान करण हे कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही. तर ते शिकावं लागते. फेसबुक असो वा खर आयुष्य. समोर येणारी कोणतीही स्त्री हि अव्हेलेबल नसते. तिला सहानभुतीची गरज नसते, तिला शरीरसंबंधात कोणाची तरी अजून गरज नसते. हे बाजूला ठेवून आपण जेव्हा संवाद साधू तेव्हा हरवलेल्या भावनांचा शोध आपण पुन्हा घ्यायला सुरवात करू अस मी म्हणेन.

माझं मन तुझ्यात

माझं मन तुझ्यात


 प्रत्येकाला प्रियसीला स्पर्श करायचा आहे .पण बायको मात्र पवित्र पाहिजे.. 

प्रियसी सोबत लग्नानंतर पण बोलायचं आहे, पण बायकोच्या फोन मध्ये मित्राच नाव पण खटकत...

 ✍️वसुधा इंगळे.

मन:स्पर्श

मन:स्पर्श



प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असते. जी मनात असते पण नशिबात नसते. जिच्यामध्ये जीव तर अडकलेला असतो पण सोडवता येत नसतो. आणि त्या भावना कोणाला व्यक्त पण करता येत नसतात. बस देवाकडे इच्छा असते की काही करून नशिबात याव आणि कायमचा आपला होऊन रहावा...

✍️वसुधा इंगळे

Tuesday, May 2, 2023

जोडीदाराशी संवाद

 जोडीदाराशी संवाद



जोडीदार प्रेमविवाहाच्या मार्गानं आयुष्यात येवो.

 अथवा रीतसर दाखवून' वगैरे येवो. 

ती निव्वळ सुरुवात असते. 

प्रवासाचा प्रारंभ असतो. 

शेवटी  अनुकूल, प्रतिकूल वैगेरे अनुभव सहवासानंच जमा होतात. 

विसंवाद, संवाद वा सुसंवाद हे टप्पे कालांतरानेच ठरतात.


✍️व पु काळे....

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...