Thursday, May 25, 2023

स्त्री व पुरुष

 स्त्री व पुरुष


पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रीयांवर प्रेम करतो किंवा करु शकतो. कारण, त्याच्या प्रेमाचा क्रायटेरिया हा बेसिकली शरीरापासून सुरु होऊन टप्प्याटप्प्याने मनाकडे जातो....हा प्रवास मोठा आहे. 

या प्रवासात अधेमधे त्या स्त्रीपेक्षा अधिक आकर्षक असं शरीर असणारी स्त्री त्याला पुन्हा Back to square one आणू शकते. मग पुन्हा नवं शरीर, त्या नव्या शरीराचे नवे गंध, नवे डावपेच, समागमाचे नवे आडाखे यात तो परत अडकतो आणि अलगदपणे प्रेमापासून लैंगिकतेकडे ओढला जातो. तो नैसर्गिकरीत्या स्खलनशील असल्याने नेहमीच अनैतिक, अश्लील आणि नितीभ्रष्ट म्हणून ओळखला जातो....


स्त्रीचं सॉफ्टवेअर नेमकं उलट आहे. तिचा प्रवास हा मनाकडून सुरु होतो आणि शरीराकडे जातो. जो लहानसा आहे. त्यातच तिला सिक्स् सेन्स असल्याने स्त्री अगदीच बिनडोक असेल तरच पुरुषी ढोंगीपणाला बळी पडते...तिला देखण्या शरीरयष्टीचा मोह क्षणिक होतो, जे नैसर्गिक आहे. पण मैत्री आणि वैवाहिक जोडीदार निवडण्याचे तिचे निकष हे अगम्य आणि Unpredictable असतात. काळानुसार बदलतातही. म्हणून तिच्या आयुष्यात खंडीभर पुरुष कधीच नसतात. फारफारतर दोन किंवा अगदीच तीन म्हणजे डोक्यावरुन पाणी. तिचे निर्णय चुकल्यावर ती नवा पुरुष शोधायच्या भानगडीतच पडत नाही हा तिचा अफाट USP आहे. ती झटक्यात    Move On होऊन स्वतःची एनर्जी वाचवते. दुसरा पुरुष आयुष्यात येताना त्याची असंख्य अग्निदिव्ये ती घेते. तिला जिंकणं म्हणजे तिचं मन जिंकून घेणं सोपं नसतं....


लक्षात घ्या, एखादी स्त्री जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तिच्या प्रेमाचा आदर करा. पुरुषी अहंकार चुलीत घाला. तिची मते विचारात घ्या. आणि तिला धोका देऊ नका. जेनेटिकली तुम्ही नैसर्गिकरीत्या खुले सांड असाल तरीही नाजूक पारिजातकाच्या झाडाला बांधलेले आहात हे विसरु नका. एका झटक्यात दावण तोडून निघू शकता, पण आयुष्यभर उन्हात वणवण फिरण्याची तयारी असू द्या म्हणजे झालं...


✍️सचिन मधुकर परांजपे.


मै हूं ना

मै हूं ना

आयुष्याच्या या धावपडीत तुमच्या सुखात, यशात पुढे पुढे करणारे खूप असतात. मोठे मोठे आश्वासने देऊन योग्य वेळेवर निसटून जाणे हे आजकालचं फॅशन आहे. योग्य वेळेवर आपली साथ देणारे हे मात्र मोजकेच.

आपल्या दुःखात हक्काने कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून 'मै हूं ना' म्हणत आपल्याला धीर देणारे हे फार कमी असतात. आणि आज खऱ्या अर्थाने अशी माणसे जोडणं फार महत्त्वाचं आहे. जी सुखा सोबतच तुमच्या दुःखात सुद्धा प्रामुख्याने सहभागी असतील.


✍️ वसुधा इंगळे

Thursday, May 11, 2023

अवघं विश्व सुंदर भासतं...!!!

 अवघं विश्व सुंदर भासतं...!!!


बऱ्याच स्त्रियांना शारिरीक सौंदर्याचा न्युनगंड असतो,मी समाजात वावरत असतांना माझ्या निरीक्षणात येतो...

पण, खर सांगू मैत्रिणींनो...पुरूषांना कांय आवडेल, याचा विचार करून स्वतःला घडवू नका...

पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य तोलणं, म्हणजे स्वतः मधील स्त्रीत्वाला कमीपणा देणं आहे...

सकाळी उठून सडा-टाकून झाल्यावर स्वतःच्या हातानं काढलेली  रेखीव रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...

स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ  स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!

तुम्ही शिक्षिका असाल, तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात असेल. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, ही तुमचीच सुंदरता आहे...


सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे....

सौंदर्य नटण्यात नाही, विचारांमधे आहे... 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणांत आहे... 

सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनांत आहे...!!

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच

सादरीकरण असतं...!!

आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली

पाहीजे...

प्रेमानं बोलणं म्हणजे सुंदरता...!!

आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता...!!

नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता...!!

दुसर्‍याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता...!! 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.

हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यांत 

खरी सुंदरता आहे...!!

आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं, 

की आपोआपच आत्मविश्वास वाढतो, आत्मसन्मानाची 

जाणीव होते...


अशी आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोआप

सुंदर होते, हा माझा स्वानुभव आहे...

इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत होतं,...

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे...

बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या असामान्य प्रतिभेत होतं...

लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या अप्रतिम, दैवी आवाजात आहे...

वेळ प्रसंगी या सर्वजणींची आठवणच आपलं जगणं 

सुंदर करायला मदत करेल...

आपण जशा जन्माला आलो आहोत, तशा सुंदरच आहोत,

ही खूणगाठ मनाशी बांधून टाकली, की सौंदर्याकरीता

दुसर्‍या कुणाच्या पावतीची गरज पडत नाही आणि

अवघं विश्व सुंदर भासतं...!!!


✍️ वसुधा इंगळे

Saturday, May 6, 2023

कोणीतरी असावं

 कोणीतरी असावं


कोणीतरी असावं आईबाबानंतर निस्वार्थी प्रेम करणारं..

कोणत्याच मोहमायेत न ठेवता जवळ करणार

कधी एकटं वाटलं कि घट्ट मिठीत घेणारं

न काही बोलता मनाचं भाव ओळखणारं


कोणीतरि असावं 

कितीही राग आला तरी प्रेमाने तोंडावर हात फिरवणारं

आजारी असलं कि रात्रभर आपल्या उशाशी जागणारं 

मन भरून आलं कि मोकळं करता येईल असं असणारं

कितीही भांडल तरी साथ मात्र न सोडणार..


कोणीतरी असावं 

आपल्या पाठीवरही आपलं तोंडभरून कौतुक करणारं

आपण निपचित पडलो असता आपल्याला सावरून घेणार

आपल्यावर सतत प्रेमाचं छात्र धरणार

कोणतीच वचणं न देता पण पूर्ण करणार


कोणीतरी असावं आपलं सर्व लाड प्रेमाने पुरवणारं

आपण एखाद्याशी बोलायला गेलो तर रागाने बघणारं

कधीतरी आपल्यासोबत मोकळ्यापनान वावरणारं

कोणीतरी असावं आपल्याला मनापासून समजून घेणारं


                                            

Wednesday, May 3, 2023

हरवलेल्या भावना...

 हरवलेल्या भावना...


फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकौंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा कि आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही. कोणीही येत गुड मॉर्निंग करत. कोणी येत मला तू आवडते सांगते. कोणी येत माझ तुझ्यावर प्रेम आहे सांगते, कोणीही येत तुझ्याशिवाय माझ जग नाही सांगते, कोणी तूच माझी राणी म्हणते. कोणी माझ तुझ्यावर डिव्हाईन प्रेम आहे सांगते. कोणी मला तुझ्याबरोबर सेक्स करायचा आहे सांगते. कोणीही येत तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतो अस सांगत. कोणी माझ्याशिवाय मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही सांगते. बर हे सगळ कोणी एकटा माणूस नाही तर रोज असे १०-२० मेसजेस तरी इनबॉक्स मध्ये धडकत असतात. आपण कोणाला इग्नोर कराव आणि कोणाला ब्लॉक? 


कोणतीही स्त्री दिसली कि ना ओळख, ना पाळख, ना तिच्या आयुष्याविषयी काही माहिती, ना तिच्या मनाची अवस्था. थोड छान बोलण झाल कि लगेच ती अव्हेलेबल आहे. ती कुठेतरी झुरते आहे स्पेशली तिच्या शारीरिक संबंधात आणि मीच तो काय हिरो जन्माला आलो आहे जो तिच्या सगळ्या माहित नाही पण निदान शारीरिक संबंधातील गरजा पूर्ण करू शकतो अश्या आविर्भावात आज प्रत्येक पुरुष बिनधास्तपणे स्त्री च्या समोर पहिल्या काही तासात उभा रहातो. तू एकटी आहेस आणि तू मला आवडतेस अस म्हणत तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाला बाजूला टाकून मी सगळ काही करू शकतो. नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे. माझ समाजात हे स्टेटस आहे. तूच माझी गरज भागवू शकते हे सांगत गोष्टी कुठूनही सुरु झाल्या तरी शरीर संबंधान पर्यंत येऊन थांबतात. हे मी नाही तर फेसबुक वापरणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगू शकेल.  


ह्या सर्वात वयाच काहीच अंतर नाही. नुकतीच मिसरूड फुटलेला २० वर्षाचा तरुण ५० वर्षाच्या स्त्री ला तर ६० ला पोचलेला एक पुरुष एका १८ वर्षाच्या स्त्री शी बोलताना फक्त तिकडेच येऊन थांबतो. तिथवर येण्याची पद्धत प्रत्येक पुरुषाची वेगळी असेल पण शेवटच स्थानक मात्र सेक्स. ना ओळख ना पाळख पण प्रेम व्हायला आणि आवड निर्माण व्हायला एक फोटो किंवा एक च्याट किंवा एक भेट पुरेशी असते आजकाल सगळ्यांना. समोरच्याला काय वाटेल, काय वाटते ह्याचा काहीच विचार नाही. आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करायच्या. समोरच्याने काही विचार करण्याअगोदर आपण गादीवर जाऊन पोचलेले असतो.  इतका उतावीळपणा?? कॉलेज ला जाणारे किंवा नुकतच तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणान कडून हे व्हाव हे एकवेळ समजू शकतो. त्या वयात येणाऱ्या भावनांना मोकळीक मिळण्यासाठी वेळ असताना किंवा मिळत नसताना त्या अश्या रीतीने बाहेर येण कदाचित एकवेळ समर्थनीय पण आयुष्य कोळून प्यायलेल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींची चव चाखलेल्या पुरुषांनकडून पण त्याच तर्हेचे वर्तन होत असेल तर आपल्या भावना हरवलेल्या आहेत हे नक्की. 


पूर्वी स्त्री आवडली तरी स्वतःच्या भावना तिच्या पर्यंत पोचवायला अनामिक भीती असायची. किंबहुना स्त्री काय प्रतिक्रिया देईल ह्यातच आयुष्याची अनेक वर्ष वाया जात. आज उलट झाल आहे. तिला काय वाटेल हा विचार करण्याची गरजच पुरुषाला वाटत नाही. मला काय वाटते ते तिने ऐकावं आणि तसच कराव. नाही ऐकल तर तिला सोडणार नाही अश्या आविर्भावात अनेक पुरुष असतात. ती काय जागा, जमीन आणि वस्तू आहे का? हक्क गाजवायला. एखादी स्त्री आवडण ह्यात चुकीच काय? अगदी पहिल्या भेटीत तिने मनाचा ठाव घेण ह्यात हि चुकीच काहीच नाही. पण त्या भावना त्याच तरलतेने, त्याच हळुवार पद्धतीने आपण मांडतो आहोत का? ह्याचा विचार प्रत्येक पुरुषाने करावा. आपली आवड हि फक्त सेक्स पुरती मर्यादित आहे कि खरच एक स्त्री म्हणून ती आपल्याला आवडते ह्याचा हि त्यात विचार असावा. 


पोर्न बघून बघून आपले विचार ज्या वेगाने मशीन होत आहेत ते खूपच धक्कादायक आहे. एकेकाळी हळुवार उमलणाऱ्या आपल्या भावना आता कुस्करून आपण बाहेर आणत आहोत. एक एक पाकळी हळुवार उमलण्याची मज्जा न घेता आपल्याला फक्त फुलाला चाखायच असते. कारण आपल्या भावनाच संपल्या आहेत. एक फुल झाल का दुसर ह्याच्या शोधात अनेक जण भटकत असतात. हेच अनेकजण एकाचवेळी एकाच फुलाच्या आंगावर धडकत असतात. कधीतरी फुल होऊन विचार केला तर हे सगळ बघून त्या सगळ्यांचा किती तिटकारा वाटत असेल ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. आपला स्लेफ रिस्पेक्ट अश्या बाजारू बाई प्रमाणे पायदळी तुडवला जात असेल. तर शांत तरी किती वेळ राहायचं आणि कोणासाठी? 


आपण आपल्या आत झाकून बघायला हव. आपण जर उठून रोज १० स्त्रियांना ज्यांच्याशी आपला किंवा त्यांचा आपल्याशी जास्ती काही संबंध नसताना. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसताना नुसतच जर आयुष्यात डोकावण होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या भावना शोधायला हव्या. ज्या कधीच आपल्यातून हरवल्या आहेत. रिस्पेक्ट, डिग्निटी जपण आणि त्याचा सन्मान करण हे कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही. तर ते शिकावं लागते. फेसबुक असो वा खर आयुष्य. समोर येणारी कोणतीही स्त्री हि अव्हेलेबल नसते. तिला सहानभुतीची गरज नसते, तिला शरीरसंबंधात कोणाची तरी अजून गरज नसते. हे बाजूला ठेवून आपण जेव्हा संवाद साधू तेव्हा हरवलेल्या भावनांचा शोध आपण पुन्हा घ्यायला सुरवात करू अस मी म्हणेन.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...