Friday, August 18, 2023

Attach and Detach

 Attach and Detach



मोह आणि माया या गोष्टीच आकर्षक खूप असत. कारण त्या गोष्टी थोड्या वेळापुरता असतात. मोह आपल्याला अडकून ठेवतो, बंदीस्त करतो.म्हणूनच attachment आणि detachment या दोन गोष्टीमधील साम्य आपल्याला माहीत असलं पाहिजे.

 मला माहित आहे ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत. हे जे आयुष्य चालू आहे किंवा आपल्या रोजच्या जीवनात काय चालू आहे, तर हे एक नाटक आहे. आणि आपण हे नाटक play करत आहे. माझं शरीर हे हा नाटकाचा costume म्हणजेच पोशाख आहे. आणि तो मी परिधान केला आहे.

पण या बरोबरच मला या नाटकामध्ये कोणासोबत किती (attach) जवळीक साधायची आहे. आणि किती (detach) अंतर ठेवून वागायचं आहे. ही सीमा मला आखता आली पाहिजे. आणि जर मला माझी सीमारेषा आखता नाही आली तर काय होईल? तर मला वेड लागेल त्या गोष्टीच...

म्हणजे खूप वेळा अस होत, आज मी एक पोस्ट टाकली इन्स्टाग्रामवर किंवा फेसबुक वर त्याला जास्त लाईक किंवा व्ह्यू आले नाहीत. तर मला डिप्रेशन येईल. पण ते गरजेच नाही आहे. नाही आले लाईक तर काय झालं टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. 

"अरे माझे फॉलोव्हर्स कमी होत आहेत",मला डिप्रेशन येत आहे का? जे तुमचं आहे, जे तुमच्या साठी आहे, ते तुमचंच राहणार आहे. ते तुमच्या कडून कधीच, कोणीच हिरावून घेऊ नाही शकत. आणि जे तुमचं आहे ते कायम तुमच्या बरोबरच राहणार पण जे गेलं ते तुमचं नव्हतच.


✍️वसुधा इंगळे

Saturday, August 5, 2023

मैत्री

मैत्री




एक शब्दही न बोलता अबोल साथ देते, ती फक्त मैत्री.🤍

अटपिटा न करता एकटेपण मिटवते, ती फक्त मैत्री.🤍


खूप व्याप असतानाही आवर्जून आठवण काढते, 

ती फक्त मैत्री.🤍


हज्जार शब्दात सांगता येत नाही ते एका शब्दात समजवते ,

ती फक्त मैत्री..🤍


आपली चूक कबूल करून मनात राग न धरता,

परत पहिल्या सारखीच राहते ती फक्त मैत्री..🤍


आपल्यातलं आपलं माणूस अचूक ओळखून, 

आपलेपणानं आपलेपण जपते ती फक्त मैत्री..🤍


कितीही वादळं आली तरी खंबीरपणाने आपल्या सोबत राहते

ती फक्त मैत्री..🤍


स्त्री पुरुष हे सगळे बंध तोडून निर्व्याजपणे संगत करुन 

साथ निभवते ती फक्त मैत्री..🤍


आणि वयाचं अंतर न बाळगता एकमेकांना समजू शकते

ती फक्त मैत्री...🤍



✍️वसुधा इंगळे

Friday, August 4, 2023

अश्मयुग

 अश्मयुग



खरी मजा होती अश्मयुगात. , ना काम ना धंदा... शिकार करायची, कंदमुळे खायची, गुहेमध्ये घरटी करायची, लग्नाचे टेन्शन नाही, कर्जाचे टेन्शन नाही, नोकरीची चिंता नाही, निवडणूक किंवा राजकारण नाही, अटक नाही, खटला नाही, वशील्याची भानगड नाही, कामासाठी पळापळ नाही, शिक्षण व डोनेशनची गरज नाही, पोरांच्या भविष्याची चिंता नाही, लग्नं, मानपान, ववसा, डोहाळजेवण, मूळसाडा, बाळंतइडा असली पिडा नाही, रुसवा फुगवा नाही, आनलाईन नाही, चॅटिंग नाही, त्यामुळे एक्झिट किंवा रिमूव्ह नाही, ना डिबेटिंग ना डेटिंग... ओन्ली इटिंग.. फक्त खायचे...... झोपायचे व वेळ येईल तेव्हा मरायचे.. पण माती नाही, दहावा नाही, उत्तरकार्य नाही, वर्ष श्राद्ध नाही, कुठल्या माकडानं प्रगतीला सुरूवात केली काय माहित ????

Wednesday, August 2, 2023

स्त्री online राहते

 स्त्री online राहते



पुरुष online असले तर अभिमानाची गोष्ट ..पण बायका online असल्या की आभाळ कोसळते..त्यांच्यावर jokes टाकले जातात..चर्चेचा विषय होतो...पण तरिही...स्त्री online राहते..


होय मी online राहते....

सर्वांशी connected राहायला 

एकमेकांशी बोलायला 

हितगुज करायला🤗 

सुख दुःख जाणायला


होय मी online राहते ....

शुभेच्छासंदेश द्यायला 

कोडकौतुक करायला 😘

चांगले विचार घ्यायला 

कधी खळखळून हसायला 😂


होय मी online राहते...

विचारांना वाट द्यायला 

पोस्टस् ला प्रतिसाद द्यायला 

अनेकांशी संवाद साधायला

अनोळखींशी नाते जोडायला👫


होय मी online राहते...

भावना व्यक्त करायला 

मनातील कल्ला थांबवायला

मनाप्रमाणे जगायला 💃


" इतराचा दृष्टीकोन आणि त्याची मानसिकता"


 1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते. ती तुमच्या विचारांना सलाम करते...


2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. की ती तुम्हाला लाईक करते....ती तुमचं कौतुक करते......


3) एक स्त्री तुमच्याशी बोलते चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. .....ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...


4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...


जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.

प्रत्येक स्त्री चा आदर करा.


✍️वसुधा इंगळे

Tuesday, August 1, 2023

हे स्वतः करून पाहा...

 हे स्वतः करून पाहा...


भरपूर मित्र हवेत का? मग स्वतः मित्र व्हा आणि मैत्री निभावण्याचा कसोशीने प्रयत्न करा.


सर्व नातेसंबंधातील विश्वासार्हता जपा. त्याने स्वतःची व समाजाची जोपासना होते. विश्वासावरच जग चालतं, हे कायम लक्षात ठेवा.


लोक चूक करतात तेव्हा त्यांना क्षमा करायला शिका. नाती नष्ट होऊ देऊ नका. त्यांच्यात सुधारणा घडवून आणा, चूक आपल्याही हातून होऊ शकते, हे विसरू नका. एखाद्याच्या कृतीमुळे जर तुमचं काही नुकसान झालं असेल तर ते मुद्दामच केलं आहे असा पूर्वग्रह ठेवू नका.

मित्रमंडळीना आवर्जून घरी बोलवा. ते आपल्याकडे येतात तेव्हाच आपल्यात जवळीक आणि आपुलकीचा धागा निर्माण होतो. आपण त्यांना बोलावतो तेव्हा त्यातून आपली आपुलकी निर्माण करण्याची गरज व्यक्त होत असते..


ई-मेल्सद्वारे आलेले मेसेज, व्हाट्सएप वर आलेले मेसेज आणि फोन कॉल्सना न चुकता प्रतिसाद द्या. कुणाला ई-मेल केला किंवा रिप्लाय दिला नाही किंवा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर माणूस वैतागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्यांना रिप्लाय देण्यानं माणसाला आपला निरोप तरी पोहोचल्याचा दिलासा मिळतो.


शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. ते कधी रस्त्यात भेटले तर हसून ओळख दाखवायला विसरू नका शेजाऱ्यांच्या आनंदाच्या व दुःखाच्या प्रसंगात त्यांना जरूर भेटा. त्यांना हवी ती मदत करा. मैत्री दीर्घकाळ कशी टिकेल याचा विचार करून वागा. जुने मित्र लांब जाण्यानं काळाच्या ओघात अंतर पडतं, पण संपर्क ठेवल्यास हे अंतर पुसताही येतं. 

दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही कधीतरी विचार करा इतरांची बाजूही पटेल. यामुळे तुमचा दृष्टिकोन व्यापक होईल व लोकंही तुमच्या बोलण्याचा विचार करतील


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...