Wednesday, June 25, 2025

थोड मनातलं

थोड मनातलं ( सव्वा महिना)




आज सव्वा महिन्यांपूर्वीच तुझा जन्म झाला.. अनं इवलासा जीव कुशीत आला.. इटूकले डोळे उघडले तु सार जग पाहिलं, तुझ्या येण्याची किती वाट पाहत होतो हेच सांगायचं राहिल.. 

नाजुकसे ओठ तुझे बोलशील बोबडे बोल अन करशील नाटुकली,

चिऊ काऊ चा घास करत मांडशील का ग भातुकली, इवलेसे हात तुझे अनं इवलेसे पाऊल, धावशील कधी दुडूदुडू. आता इतकीच चाहूल, कधी होशील मोठी अनं चालता चालता डॅडी चे धरशील बोट...

 गालावर खळी तुझ्या, हास्य तुझे खुलते.. मम्मा मम्मा म्हणतं जणू नजर तुझी बोलते.. आलीस आयुष्यात अनं एक एक क्षण गोड झाला, या गोड क्षणांनी भरुन आज सव्वामहिना पूर्ण झाला💕❤️🥰🤱🏻


✍🏻वसुधा इंगळे.

Sunday, June 22, 2025

Father's day

 Father's day ❤️ 




प्रिय डॅडा, "आज father's day आहे".... पण खरं सांगायचं तर, तुमचं महत्व एका दिवसात मोजता येणारही नाही, आणि अजून मी फक्त एक महिन्याची आहे त्यामुळे तुम्हाला काय शुभेच्छा देणारं ? 

तूमच्या शुभेच्छांवर तर चाललयं सगळं...! तरिपण....

मला मोठी झाल्यावर कळेल कि, तुम्ही जे शिकवत आहे ते शाळेच्या कोणत्याच पुस्तकात नसेल..! आणि हो आज एकच गोष्ट सांगायाची ती म्हणजे "आयुष्यात खुप... माणसं भेटतील मला, पण तुमच्या सारखा आधार कोणाचाच नसेल.... Thank you ...आणि father's day ... च्या मनापासून शुभेच्छा...!


तुमचे आरोग्य, आनंद याणि प्रेम असचं अबाधित राहो....!

✍🏻वसुधा इंगळे.

Tuesday, March 25, 2025

थोड मनातलं

 थोडं मनातलं

आयुष्याने आपल्याला खूप काही शिकवलंय, शिकवतय आणि शिकवत राहील, आपण त्याचे all time student आहोत आणि असायला हवंच!


पण शिकताना परीक्षा नुसती attempt नाही करायची तर पास व्हायचं, जमलं तर direct 1st rank काढायचा आणि हे ही नाही जमलं आणि fail झालो तर fine पुन्हा आहेच ना आयुष्य शिकवायला, कारण तुमच्या चुकांतून सुद्धा तुम्ही काही तरी शिकत असता आणि शिकलच पाहिजे, आयुष्य तुम्हाला ते शिकवत राहील !! जोवर तुम्ही ही exam crack करत नाही तोवर !! चलो, let's crack it!!

Monday, December 16, 2024

Symbol of unity in japan

 



जपानमध्ये युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला... प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस...ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल.... त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की, हे ओझे नाहीये सर. हा माझा भाऊ आहे..

हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले...

      तेव्हा पासून हा फोटो जपानमधे "सिम्बॉल ऑफ unity" म्हणून प्रसिद्ध झाला... "हे ओझे नाहीये सर... हा माझा भाऊ आहे..." हा बोध किती सुंदर आहे... आपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत... आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला,  दमले तर आधार द्या,  ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा... मोठ्या मनाने माफ करा, आणि जर अख्ख्या जगाने त्यांना दूर लोटले  तर तुम्ही  त्यांना पाठीवर घ्या, कारण ते ओझे नाहीये.... ते तुमचे, स्वतः चे भाऊ/बहिण आहेत...

    Just be there for them... Let them know, I am here for you... 


Friday, November 22, 2024

पू.ल.देशपांडे

 भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो आणि


रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो...


ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि


ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही...


"विचित्र आहे पण सत्य आहे" आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते, तर...??


जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...


~ पु.ल.देशपांडे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...