Sunday, December 14, 2025

१३ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 " स " या अक्षराने सुरू होणारे शब्द...


१.सकाळच्या वेळी पूर्वेकडून वर येतो, त्याला काय म्हणतात?

सूर्य


२.हा गोड पदार्थ ऊसापासून बनवतात, जो चहात वापरला जातो?

साखर


३.पूर्वी प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे वाहन?

सायकल


४.स्त्रियांचा आवडता पोशाख?

साडी


५.घराच्या आत बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी याचा वापर होतो?

सोफा


६.आपण कोणाला मदत करतो, त्याला काय म्हणतात?

सहकार्य 


७.अंघोळी साठी किंवा कपडे धुण्यासाठी याचा वापर करतात?

साबण


८.२६ नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?

संविधान दिवस 


९.गव्हर्मेंट ला मराठी मधे काय म्हणतात?

सरकार


१०.झिंगाट गाण कोणत्या चित्रपटामधील आहे?

सैराट


११.चादरी साठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?

सोलापूर


✍🏻वसुधा इंगळे.






Saturday, December 13, 2025

१२डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 *"व" या अक्षराने सुरू होणारे शब्द*


१.कायदा आणि न्याय यामध्ये काम करणारा व्यावसायिक?

वकील


२.पदार्थाचा एक प्रकार, जशी अळूची..

वडी


३.एक पारंपरिक जेवणात भाताचा सोबती?

वरण


४.भावाच्या बायकोला काय म्हणतात?

वहिनी 


५.गणपती किंवा इतर उत्सवासाठी ही गोळा करतात?

वर्गणी


६.हा पक्षी नसून हवेत उडते?

विमान 


७.या मध्ये बारा महिने असतात?

वर्ष 


८.काम केल्यावर मिळते?

वेतन


९.हे किलो किलो ने वाढते?

वजन


१०.जसजसे वर्ष बदलते तसतसे तुमचे हे वाढते?

वय


✍🏻वसुधा इंगळे 






Wednesday, December 3, 2025

दाराशी उमललेलं गोड वसंत


दाराशी उमललेलं गोड वसंत


 आज घरचा दरवाजा उघडा ठेवला होता. तीर्था ला खेळवण्यात गुंग असताना अचानक लहान मुलांचा गोड गोड आवाज कानावर आला. क्षणभर वाटलं—कोण आलंय बाहेर? म्हणून मी माझी साडेसहा महिन्यांची लेक तीर्थाला उचलून दारापाशी गेले.


दार उघडलं तर दिसलं की वरच्या मजल्यावर ट्युशनला जाणारी लहान मुलं ट्युशन संपवून घरी निघाली होती. त्यांच्या चकाकणाऱ्या डोळ्यांमध्ये आणि खसखसणाऱ्या हसण्यात एक वेगळीच निरागसता होती.


मी तीर्थाला दाखवत म्हणाले,

“बघ… तुझ्यासारख्या दीदी आहेत या! या ट्युशनला येतात. तू पण मोठी झालीस की जाशील ना?”


तीर्थाने तिच्या छोट्या हातांनी हवेत फडफड करत ‘आ-बा-बा’ करत होकार दिला. माझ्या मनात एक वेगळीच ऊब पसरली.


तेवढ्यात मी त्या मुलींना हसत विचारलं,

“आप इसको लेकर जयोगे क्या कल?”

त्यापण हसत म्हणाले, “हा"

मी पण लगेच म्हटलं इसकी एक स्केट और दो बुक्स है, इतना बस.”





त्यावर त्यांपैकी एक मुलगी अगदी कौतुकाने म्हणाली, “बॅग भी है क्या इसके पास?”

मीही हसत होकार दिला, “हां, है ना छोटी सी!”


नंतर मी त्यांची नाव विचारली — रिद्धिमा, अनुष्का आणि अनन्या. अतिशय गोड, नम्र आणि हसतमुख मुली. मग मीही त्यांना माझ्या लेकीचं नाव सांगितलं,

“इसका नाम तीर्था है.”


मी त्यांना विचारलं, “तुम्ही कुठे राहता?”

त्या म्हणाल्या, “जयश्री अपार्टमेंट.”


तेवढ्यात मी त्यांना परत विचारल,

“घर में आओगे क्या?”

तर नाही म्हणाल्या.


दरम्यान, तीर्था पण त्याच्या सोबत हया होहुहू आआबब्ब..

करायला लागली.

तीर्थाने उत्साहाने सगळ्यांच्या छोट्या हातात हात ठेवून ‘हाय’ केलं, ‘बाय-बाय’ केलं. तिच्या त्या निरागस गोड हसण्याने सगळ्यांच्याच चेहऱ्यावर अधिकच हसू उमटलं.


शेवटी मी त्यांना विचारलं,

“उद्या ट्युशन किती वाजता?”

त्यांनी एकदम एकत्र हसत उत्तर दिलं,

“छे बजे (सहा)वाजता!”


आणि त्या उड्या मारत, एकमेकींच्या हातात हात घालून निघून गेल्या.

दार बंद करताना मनात वाटलं — किती छान असतं ही लहान मुलांची दुनिया! निरागस, साधी, पण मन भरून टाकणारी.





✍🏻 वसुधा इंगळे.

Wednesday, November 5, 2025

आयुष्य

 आयुष्य 


आयुष्य कोणाचंच सोप्पं नसत... फरक फक्त एवढाच असतो, कोणी आवाज करून रडतं, कोणी शांत हसत हसत सगळं सहन करतं. काहींना तुटण्याची संधी मिळते, तर काहींना तुटायला पण वेळ नसतो.. जगायचं, निभवायचं, उभं राहायचं... हाच कार्य तो आयुष्याचा नियम... 


बाहेरून सगळं छान दिसतं, पण आतून प्रत्येकजण लढतोच.. काहींशी जग लढतं, आणि काही स्वतःशीच. काही आपल्या माणसांशी..


म्हणून कोणाचं आयुष्य सोपं असतं, असं कधीच समजू नका.. फक्त त्यांची वेदना ते उघड करत नाहीत इतकंच.. ती ते घेऊन जगतात, आणि त्या वेदनेलाच स्वतःची ताकद बनवतात..


व. पू काळे च एक सुंदर वाक्य आहे....

अत्यंत महागडी, न परवडणारी 

खऱ्या अर्थाने

ज्याची हानी भरून येत नाही,

अशी गोष्ट किती उरली आहे

याचा हिशोब नसताना आपण जी 

वारेमाप उधळतो ती म्हणजे

‘आयुष्य’🫰🏻

Thursday, October 30, 2025

सातवा महिना : डोहाळे जेवण

 सातवा महिना: डोहाळ जेवण 


बघता बघता गरोदरपणाचा सातवा महिना लागला. खूप छान गेले हे सहा महिने. आम्ही बाळासोबत खूप आठवणी जमा केल्या. त्याची प्रत्येक प्रतिक्रिया मी माझ्या मनात साठवून ठेवली आहे. 


हळू हळू दिवस सरत होते, तस तस माझं पोट सुद्धा दिसायला लागलं. आणि टीटू ची हालचाल सुद्धा खूप वेगाने होत होती. कधी कधी तर त्याला पोटात इतकी मस्ती करावीशी वाटत असेल की माझी रात्री ची झोपच उडायची. 


एक दिवस टीटू शी गप्पा मारताना विचारलं मी, टीटू डॅडी चा वाढदिवस जवळ येत आहे. आपण त्यांना काय बर गिफ्ट द्यायचं. मग म्हटलं टीटू तर लहान आहे तो कसा सांगणार मला.

मग मी त्याला काही पर्याय दिले...आणि ज्या पर्याय ला टीटू हालचाल करेल किंवा लाथ मारेल आपण तेच गिफ्ट घ्यायचे. मग ठरलं असच करायचं, आणि टीटू ने हलकेच होकार दिला.





वाढदिवसाचा दिवस आला, छान गोड जेवण बनवल दुपारी. जेवण करून आराम झालं. संध्याकाळी मस्त दोघ तयार झालो. टीटू सोबत डॅडी चा पहिला वाढदिवस साजरा होणार होता. भगवंतांन समोर नतमस्तक झालो, आणि त्रिसरणं पंचशील ग्रहण करतं असताना; पुन्हा टीटू जणू पोटात खूप जोरात हालचाल करू लागला. जणू काही मी पण आहे तुमच्या सोबत. इतकं छान वाटलं ना, जणू अंगावरून मोरपिस फिरवाव तस.




वाढदिवस साजरा झाला, केक कापला, फोटो काढले, बाहेर जेवायला गेलो. आणि टीटू च्या छान छान प्रतिसादामुळे तर आणखीनच छान जातो दिवस. 


सातवा महिना लागला होतो, तर मग डोहाळे जेवण करायचं.

कस करायचं, काय काय करायचं, कपडे काय घालायचे, डेकोरेशन कस असेल, आमंत्रण करायची, सगळ्या सगळ्या गोष्टीची उत्साहात घाई सुरू झाली.


आणि मग आला तो दिवस, घरात पाहुणे जमले...घर अगदी भरून गेले. खूप आनंदा च वातावरण झालं होतं. मज्जा मस्ती, कोणाची गंमत तर कोणाची खोड काढणं अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या. कारण आमच्या आयुष्यातला लग्नानंतर चा पहिला क्षण होता. ज्या दिवसाची आम्ही खूप वर्ष वाट पाहिली होती.


आई होणं ही एक विलक्षण भावना आहे – नव्या जीवनाची चाहूल आणि एका स्त्रीच्या आयुष्यातील नवं पर्व. माझ्यासाठी या सुंदर प्रवासातला सर्वात खास दिवस म्हणजे माझं डोहाळे जेवण.




त्या दिवशीचा उत्साह अजूनही मनात तसाच ताजातवाना आहे. हिरवी साडी नेसलेली, हिरवा चुडा घातलेला, चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश – मी अक्षरशः तेजस्वी दिसत होते. त्या दिवसाची तयारी काही साधी नव्हती, कारण ही केवळ एक परंपरा नव्हती, तर माझ्या मातृत्वाच्या सुरुवातीची गोड साक्ष होती.




सगळ्यांना अजून आठवतंय – “झिंगाट” गाण्यावर माझा आणि नरेनचा एकदम धम्माल डान्स! लग्नातसुद्धा इतकी धमाल केली नव्हती, जितकी डोहाळे जेवणाला केली. आम्ही नुसतं नाचलो नाही, तर त्या क्षणाला जिवंत केलं. सगळे पाहुणे हसत होते, टाळ्या वाजवत होते – आणि आम्ही त्या आनंदात न्हालो होतो.





मग आला माझा खास उखाणा –


"रायगड किल्याचे पहिले नाव होते रायरी,


अहोन सोबत सुरू करते संसाराची पहिली पायरी,


आमच्या आनंदावर नाही राहिला ताबा,


सप्टेंबरमध्ये समजले मी होणार आई आणि हे होणार बाबा."




हा उखाणा घेताना माझ्या बाळाने पोटात मस्ती केली – आणि मी अर्धा उखाणा विसरले! पण त्या हास्यातच सगळं काही होतं – माझं आई होणं, नरेनचं बाबा होणं, आणि त्या छोट्याशा जीवाचं आमच्या आयुष्यात येणं.


"आता पर्यंत च्या प्रेमात यांनी पडू दिली नाही कसली कमी, काय माहित कोण येणार – थोर भीमबा की आमची रमाई!"


सगळ्यांना इतका मजेशीर वाटला हा उखाणा की टाळ्यांचा वर्षाव झाला. शेवटी हसत-हसत विचारलं – 


"नरेन राव सांगा आता काय उचलू – बर्फी की पेढा?"



उखाणा तर सगळ्यांना आवडला पण सगळ्यांच्या आग्रहाखातर यांना पण उखाणा घ्यावा लागला.

आधी मला म्हणाले होते मी नाही घेणार. पण मी म्हटलं लक्षात तर ठेवा फक्त, घ्यायचं की नाही नंतर ठरवू.


मग घेतला एकदाचा उखाणा, 

"नात्याच्या सृष्टीला प्रेमाचा गाभा,

वसुधा होईल आई आणि मी होणार बाबा".


त्या दिवसातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे – डान्स, उखाणे, मस्ती, आणि बाळाची चाहूल... सगळं एकत्र मिळून बनलं आहे माझ्या जीवनातलं एक सोन्यासारखं पान.



✍🏻वसुधा इंगळे.





निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...