Wednesday, June 28, 2023

प्रेम

 प्रेम


"प्रेम" या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार. अनेक सुखं - दुखं:, समाधान, शांती, संकटं, परीक्षा असे एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो. आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे.


एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय? 

खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी "नातं” यावरचे लेख वाचतो. पण माझ्या मते तो एक अनुभव आहे. हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगेवगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते.


प्रवास हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोप्पा होतो.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, June 21, 2023

आठवण

 आठवण


तुझी असण्यापेक्षा 

नसण्याची सवय जास्त 

मी रिकामीच रे 

तू मात्र कामात व्यस्त


खूप काही मनात साचून राहलेल

तुझ्या येण्या कडे लक्ष लागलेल

येशील तेव्हा मनसोक्त बोलु

सुखदुःखाचे कवाड खोलू


गप्पा च्या ओघात 

भान वेळेचे विसरू 

प्रितीच्या अस्मानी

सुखावेल सैरभैर पाखरू


शब्दांनीच ओंजळ

एकमेकांची भरू ... 

तृप्त होऊ मिठीत

दुःख विरहाचे विसरू...



Tuesday, June 13, 2023

रांगोळी

 रांगोळी




रांगोळी ही पुसली जाणार आहे, हे माहित असून देखील आपण ती मन लावून, जीव ओतून, तासभर अतिशय सुबक, सुंदर आणि रेखीव काढण्याचा प्रयत्न करतो... 

तसंच आपलं आयुष्य हे, कधीतरी संपणार आहे...

ते अधिक सुंदर बनवून जगण्याचा प्रयत्न करुयात !


✍️वसुधा इंगळे

Thursday, May 25, 2023

स्त्री व पुरुष

 स्त्री व पुरुष


पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रीयांवर प्रेम करतो किंवा करु शकतो. कारण, त्याच्या प्रेमाचा क्रायटेरिया हा बेसिकली शरीरापासून सुरु होऊन टप्प्याटप्प्याने मनाकडे जातो....हा प्रवास मोठा आहे. 

या प्रवासात अधेमधे त्या स्त्रीपेक्षा अधिक आकर्षक असं शरीर असणारी स्त्री त्याला पुन्हा Back to square one आणू शकते. मग पुन्हा नवं शरीर, त्या नव्या शरीराचे नवे गंध, नवे डावपेच, समागमाचे नवे आडाखे यात तो परत अडकतो आणि अलगदपणे प्रेमापासून लैंगिकतेकडे ओढला जातो. तो नैसर्गिकरीत्या स्खलनशील असल्याने नेहमीच अनैतिक, अश्लील आणि नितीभ्रष्ट म्हणून ओळखला जातो....


स्त्रीचं सॉफ्टवेअर नेमकं उलट आहे. तिचा प्रवास हा मनाकडून सुरु होतो आणि शरीराकडे जातो. जो लहानसा आहे. त्यातच तिला सिक्स् सेन्स असल्याने स्त्री अगदीच बिनडोक असेल तरच पुरुषी ढोंगीपणाला बळी पडते...तिला देखण्या शरीरयष्टीचा मोह क्षणिक होतो, जे नैसर्गिक आहे. पण मैत्री आणि वैवाहिक जोडीदार निवडण्याचे तिचे निकष हे अगम्य आणि Unpredictable असतात. काळानुसार बदलतातही. म्हणून तिच्या आयुष्यात खंडीभर पुरुष कधीच नसतात. फारफारतर दोन किंवा अगदीच तीन म्हणजे डोक्यावरुन पाणी. तिचे निर्णय चुकल्यावर ती नवा पुरुष शोधायच्या भानगडीतच पडत नाही हा तिचा अफाट USP आहे. ती झटक्यात    Move On होऊन स्वतःची एनर्जी वाचवते. दुसरा पुरुष आयुष्यात येताना त्याची असंख्य अग्निदिव्ये ती घेते. तिला जिंकणं म्हणजे तिचं मन जिंकून घेणं सोपं नसतं....


लक्षात घ्या, एखादी स्त्री जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तिच्या प्रेमाचा आदर करा. पुरुषी अहंकार चुलीत घाला. तिची मते विचारात घ्या. आणि तिला धोका देऊ नका. जेनेटिकली तुम्ही नैसर्गिकरीत्या खुले सांड असाल तरीही नाजूक पारिजातकाच्या झाडाला बांधलेले आहात हे विसरु नका. एका झटक्यात दावण तोडून निघू शकता, पण आयुष्यभर उन्हात वणवण फिरण्याची तयारी असू द्या म्हणजे झालं...


✍️सचिन मधुकर परांजपे.


मै हूं ना

मै हूं ना

आयुष्याच्या या धावपडीत तुमच्या सुखात, यशात पुढे पुढे करणारे खूप असतात. मोठे मोठे आश्वासने देऊन योग्य वेळेवर निसटून जाणे हे आजकालचं फॅशन आहे. योग्य वेळेवर आपली साथ देणारे हे मात्र मोजकेच.

आपल्या दुःखात हक्काने कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून 'मै हूं ना' म्हणत आपल्याला धीर देणारे हे फार कमी असतात. आणि आज खऱ्या अर्थाने अशी माणसे जोडणं फार महत्त्वाचं आहे. जी सुखा सोबतच तुमच्या दुःखात सुद्धा प्रामुख्याने सहभागी असतील.


✍️ वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...