मी फक्त एक उदाहरण देणार आहे. कारण मोठी पोस्ट वाचण्याचा लोक आळस करतात.
मानवाला कच्चे अन्न खाण्याचा ( शक्तिनिशी तोडण्याचा आणि तासनतास चावण्याचा ) आळस आला म्हणून चुल आली.
चुल पेटवण्याचा आळस म्हणून त्याने स्टोव्ह आणला. सतत रॉकेल भरण्याचा आळस म्हणून गॅस आणला.
सिलेंडर संपल्यावर नवीन आणा, जूना काढा, नवीन लावा. या कामाचा आळस आला म्हणून नळीने गॅस आणला.
गॅसवर पदार्थ गरम होईपर्यंत लक्ष ठेवण्याचा आळस येतो म्हणून ओव्हन आला.
आता सगळ्याच सोयी सुविधांचा वापर करण्याचा आळस आला म्हणून तो निघाला नाविन्याच्या शोधात.
तो आता पांचशे रुपयाचे पेट्रोल आणि चार तास खर्च करुन चुलीवरचे जेवण जेवायला घरापासून वीस किलोमीटर दूर जातो. दोन हजार रुपये बील पे करुन घरी परत येतो.
सुरुवातीलाच चुल वापरायचा आळस केला नसता तर आज त्याला तिन्ही त्रिकाळ चुलीवरचे जेवण, चुलीवरचा चहा, चुलीवरची मिसळ मिळाली असती.
मला टाईप करण्याचा आळस आला आहे, नाहीतर मी अशाच अनेक विषयावर लिहिले असते.
कसे लिहिले आहे हे 🤔 सांगण्याचा आळस मात्र करू नका😄
✍️वसुधा इंगळे
Khup sundar
ReplyDeleteमनापासून धन्यवाद... आपल्या अभिप्रायाने खूप समाधान वाटलं... धन्यवाद 🙏🙏🙏
ReplyDeleteVery nice thoughts
ReplyDeleteThank you so much
Delete