Saturday, December 31, 2022

बालपणी चा काळ सुखाचा





 

बालपणी शाळा नसत्या तर बालपणी चा काळ किती सुखाचा झाला असता. 


सुट्टी सक्तीची पण शिक्षण मात्र ऐच्छिक असावा असं माझं मत होतं.


पण मला शिक्षणाची आवड नव्हती अस मुळीच नव्हतं.


पण...आंबे पिवळे का होतात? नारळा मध्ये गोड पाणी कोण ओतत? आपण रोज गाणी म्हटली तर काय होईल किंवा गाभोळलेली चिंच झाडावर कशी येते? 


असे सगळे विषय शिकवायचे सोडून, शाळेत इतर सगळे विषय शिकवले जात होते.


आपण रोज प्रार्थना म्हणतो, मग देव आपल्याला गणितात मार्क देताना दुष्ट का होतो.


अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शाळेत कधीच मिळाली नाही.


✍️वसुधा इंगळे

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...