Friday, December 30, 2022

लफडी

 बॉसने सेक्रेटरीला फोन केला , ''

एका आठवड्यासाठी आपण

बाहेरगावी चाललो आहोत .

त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .''

.

.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''

एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार

आहे बॉसबरोबर .''

.

.

.

नव-याने प्रेयसीला फोन केला , ''

एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार

आहे . तू माझ्या घरीच राहायला ये .''

.

.

.

प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट

ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , ''

मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले

आहे . तुला ट्यूशनला सुट्टी .''

.

.

विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , ''

बाबा , माझ्या ट्यूशनला आठवडाभर

सुटी आहे . मला कुठेतरी घेऊन

चला ना फिरायला .''

.

.

.

बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन

केला , ''

हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर

घालवणार आहे . बाहेरगावी जाणे रद्द .''

.

.

.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''

बाहेरगावी जाणे रद्द .''

.

.

.

नव-याने प्रेयसीला फोन केला , ''

आपली भेट रद्द .''

.

.

.

प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , ''

माझे जाणे कॅन्सल झाले आहे . तुझी ट्यूशन

सुरूच राहील .''

.

.

.

विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , ''

ट्यूशन सुरूच राहणार आहे . आपलं जाणं रद्द 

पृथ्वी गोल आहे आणि सगळा झोल आहे.


वाचा! हसा! हसत राहा!

✍️वसुधा इंगळे

You happy ! I am happy

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...