सेक्स की संभोग - भाग ४
संभोग तर खरा नुसता शरीराचा नसतोच. सर्वात आधी तो मनाचा आणि विचारांचा असतो. दोन्ही मनाचं मिलन. दोन जीव एकरूप होणं. असं लग्नाच्या बाबतीत म्हटलं जातं. पण हे वास्तवात खूप कमी अनुभवास येतं. लग्न म्हणजे केवळ सेक्ससाठी समाजाने दिलेला परवाना अशीच काहीशी लोकांची समजूत आहे. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस झाले की नवरा बायको सेक्सकडे तितक्या गांभीर्याने बघत नाहीत. किंवा काहीजण लग्नानंतर सुद्धा आपल्या जोडीदाराला फसवत असतात. वास्तविक सेक्स ही माणसाला मरेपर्यंत हवी असणारी गरज आहे हेच मुळात विसरतात आणि मग संघर्ष सुरू होतो. प्रेम देणं आणि आनंद देणं हीच खरी तर संभोगाची मज्जा आहे पण अलीकडे उलटच बघायला मिळतं. सेक्ससाठी आपल्या जोडीदाराची इच्छा असणं, तिच्या भावना समजून घेणं, तिचा आदर करणं आणि तिला फक्त भोगवस्तू म्हणून न समजता आपली व्यवस्था समजून आनंदाने समान भोग घेणं आणि देणं हेच संभोगामध्ये सगळ्यात जास्त अपेक्षित असतं. आणि असं असेल तरच तो संभोग नाहीतर तो एक प्रकारचा बलात्कारच. नाहीतर हल्ली स्वतःच्या इच्छेसाठी जोडीदाराची इच्छा नसताना सुद्धा सेक्स केला जातो पण त्याला काहीही अर्थ नसतो. तो यांत्रिकी पद्धतीचा सेक्स असतो. कारण तिथे आनंद नसतो फक्त दुःख आणि त्रास असतो. आणि अशा सेक्सला संभोग म्हणता येत नाही.
संभोग या विषयीची ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ते जाणून सुद्धा घेतलं पाहिजे. आपल्या जोडीदाराला सुद्धा ते नीट सांगितलं पाहिजे. नीट समजून उमजून घेतलं पाहिजे. तर संभोगाचा आनंद आपल्या जोडीदारासोबत वाटता आणि लुटता सुद्धा येईल. कारण संभोग म्हणजे वासना नाही तर संभोग म्हणजे प्रेमाचा आणि आनंदाचा समान भोग घेणं.
That's true
ReplyDeleteIt's true 👍
ReplyDeleteYes! Thank you so much
DeleteRight 👍
ReplyDeleteThank you so much
Delete