Monday, July 10, 2023

आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.

 आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.



पाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत. त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत असतात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून वेगळे किंवा विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपन पृथ्वी ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.
माझा आसपास चा समाज पाहते, तेव्हा स्वत: हाला शोधात नाही. त्यांना काय अपेक्षित आहे, हे ओळखताना मला 'मी' काय हवंय याचा शोध घेत नाही, त्याची कल्पना पण करत नाही, एकाग्र होत नाही. काळावर स्वार होऊन जगण्याचा विचार करत नाही. विचार विश्व पातळीवर जात नाही. मनाचं परीघं आकाशगंगा काही सेकंदात पार करू शकतं. पण त्याला कल्पनेच्या मर्यादेत सामवून ठेवतं. बुद्धी आणि मनाची सांगड घालणं सोडून फ़क़्त बुद्धीचे ऐकूण दोघांत युद्ध लावून स्वत:ची फरपट करून घेतो. मनाचे श्लोक विसरून बुद्धीचे व्यवहार्य चातूर्याचे गोडवे गातो. मन मारतो, पिळवटतो, आणि बुद्धीवर स्वार होऊन जग जिंकायला निघतो. पण समजत नाही, बुद्धी ही मनाची रसद आहे. तिला कोमेजून शरीरात कुठलाच भाग स्थिर राहत नाही. बुद्धी काम करेनाशी होते. मग उंच उडणारा घोडा अगदी खोल जातो, ढासळतो, मनोरे पडतात. पर्यायी व्यक्तीमत्व, व्यक्ती खंगत जाते. अकार्यक्षम होते, निस्तेज होते.
मला या जगात माझ्या मनाच्या पातळीवर मुक्त विहार करायला पाठवलं आहे. मुक्त जगायला, बागडायला. बंधणाच जाळ करून त्यात अडकायला नाही. तर ते सोडवून, त्याची वीण जाणून मुक्त जगायला . .! 

तात्पर्य :- कधी कधी आपण आपल्याच्या जवळच्या व्यक्ती बद्दल काही विशिष्ट समज करून घेतो. (चांगले किंवा वाईट)
आणि आपल्याला वाटत आपण त्यांना खूप चांगलं ओळखतो हे गृहीत धरतो. आणि नेमक्या वेळी हीच जवळची माणस कच खातात. आणि आपला पुरता हिरमोड होतो. त्याचप्रेमाने मुक्त जगण्यासाठी देखील ह्याच जवळच्या व्यक्ती चा कुठे तरी मनाच्या खोल कप्यात विचार चालू असतो. की आज आपण फिरायला जाऊया अस आपण गृहीत धरतो, पण समोरची व्यक्ती अरसिक आहे हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण असा विचार करतो की ती येईल.
म्हणून च ही जी वीण आहे आपलेपानाची, समाजाची ती थोडी सैल करून आपण स्वतःच आनंद शोधला पाहिजे.

✍️वसुधा इंगळे.

2 comments:

  1. आयुष्य हे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी च असते...

    ReplyDelete
  2. आपल्याला आयुष्य एकच मिळालं आहे, भरभरून जागून घ्या. आयुष्यात खूप व्यक्ती भेटतील कोणी चांगल्या कोणी वाईट, प्रत्येका कडून काही न काही शिकण्यासारखं असत. राग, रुसवे, फुगवे हे सगळे दोन दिवसाचे पाहुणे असतात, त्यांना आपण पाहुणे च राहू दयायचे असते. आनंददायी जीवन आहे

    ReplyDelete

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...