आपण आपल्या कमतरता शोधून, त्या दूर करूया
एखादी मर्सिडीज कार असेल किंवा आणख दुसरं कोणतही वाहन असेल या वाहनांच्या टायरमध्ये जर काटा असेल किंवा खिळा असेल तर आपण ते असच टायरमध्ये ठेवून पुढील प्रवास करू शकत नाही. तो खिळा किंवा काटा आपल्याला काढावा लागतो. मग ती गाडी कोणतीही असो. तसेच आपल्या पायात सुध्दा काटा असेल तर आपण कितीही गडबडीत असलो तरीही आपल्याला तो काटा वेळ देऊन काढावाच लागतो तरच आपला पुढील प्रवास सुखकर होतो.
अगदी याचप्रमाणे आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असु. ते स्पर्धा परीक्षेच क्षेत्र असेल किंवा व्यवसायाचं क्षेत्र असेल यांमध्ये आपल्याला आपल्या कमतरता शोधून त्या कशा दूर करता येतील हे पाहावे लागेल. आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. यात काहीही चुकीच किंवा वाईट वाटून घेण्यासारखं नाही. परंतू आपण आपल्या कमतरता काय आहेत हे न शोधणे किंवा त्या कमतरता लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच चुकीच आहे.
आपल्यातील प्रत्येकालाच मोठं होण्याची, महान बनण्याची इच्छा आहे परंतु प्रत्येकजण महान बनत नाही कारण महान बनण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात. आपल्या कमतरता शोधून त्या दुर करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न प्रत्येक व्यक्ती घेत नाही. मी एक वाक्य वाचलं होत ते म्हणजे, जर ध्येयाच्या प्रवासाला एक हजार व्यक्ती निघाले तर त्यामधील एकच तो ध्येयाचा प्रवास पूर्ण करतो बाकीचे उरलेले सर्व जण कुठ ना कुठ अडकून पडतात. एखादा अडथळा येतो किंवा कोणाला तरी अशा गोष्टीचा मोह होतो आणि हा मोहच त्याला ध्येयापासून बाजूला घेऊन जातो.
आपल्यातील प्रत्येकाला आज हे शोधावं लागेल की माझ्या ध्येयापुढे कोणते अडथळे येत आहेत, कोणत्या अशा कमतरता आहेत ज्यांमुळे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही हे शोधून प्रत्येक कमतरता कशी दूर करता येईल यांसाठी प्रयत्न करावे लागतील
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment