Sunday, January 14, 2024

 HIII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर सूर्य तुम्हाला कधी बोलला आहे का मी रोज तुम्हांला सूर्य प्रकाश देतो. पण त्याच्या बदल्यात तुम्ही तर मला काहींच देत नाही. किंवा सूर्यच नाही तर निसर्गाने खूप काही आपल्याला दिले आहे. पण त्यांनी बोलून दाखवले नाही. निसर्गाचा प्रकोप खुप वेळा झाला पण निसर्गाने त्याचा राग शांत करून आपल्याला खूप काही दिले आणि तो अजून देतोय. मग आपण का छोट्या छोटया गोष्टी लक्षात ठेवायच्या की मी ह्याचे हे केले ते केले पण त्याला जाणीव नाही वगैरे वगैरे. मनापासून करायचे सगळे कशाचीच अपेक्षा न ठेवता. कारण अपेक्षांचा डोंगर कधीच संपत नसतो. 

✍️ वसुधा इंगळे.

2 comments:

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...