**तीर्थाचा पहिला प्रवास**
तीर्थाला जेव्हा पहिल्यांदा फिरण्यासाठी घराबाहेर घेऊन जायचं ठरवलं, तेव्हा “कुठे नेऊ?” हा प्रश्न आमच्या दोघांच्या मनात आला. पावसाळा सुरूच होता. फार लांब जायलाही नको, कारण ती अजून खूप लहान आहे. तिला त्रास होऊ नये, उलट तिला प्रसन्न वाटेल असं शांत, हवेशीर आणि सकारात्मक वातावरण असावं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं.
पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. एक दिवस गेला, दुसरा गेला… शेवटी आम्ही ठरवलं – तीर्थाला बुद्धविहारात घेऊन जाऊ.
हे ठिकाण निवडण्यामागे एक खास कारण होतं – तीर्था वैशाख महिन्यात झाली होती आणि जेव्हा ती हॉस्पिटलमधून आली, तो दिवस होता बुद्धपौर्णिमेचा!
आम्ही बुद्धविहारात गेलो. तीर्थाला भंतेजींचा आशीर्वाद मिळाला. विशेष म्हणजे ती एकदाही रडली नाही – ती आमच्या बरोबर पूर्ण वेळ शांत होती, हसत होती. हे तिचं आमच्यासोबतचं पहिलं सहप्रवासिकपण आमच्यासाठी फारच खास होतं.
भंतेजी म्हणाले, “आज विहारात एक बाल उपासिका आली आहे. ती आपल्या आई- वडिलां प्रमाणेच तेजस्वी आणि हुशार आहे.”
आणि अशा प्रकारे तीर्था चा मम्मा आणि डॅडा सोबतचा पहिला गोड प्रवास खास आठवण बनून गेला.
✍🏻वसुधा इंगळे.


Khup ch chan.... Tirtha khup nashibwan aahe tila tumchya sarkhe parents bhetlet....May Lord Buddha Bless you Tritha Beta....
ReplyDeleteमनापासून धन्यवाद, अभिप्राय दिल्या बद्दल, असच प्रेम असू द्या, तुम्ही दिलेल्या कमेंट्स च्या माध्यमातून, आपल्या कामाची पोचपावती मिळते.
Delete👌👌
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Delete