राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या,
तर त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या.
त्यांचे जीवन, विचार आणि संस्कार आजही प्रेरणादायी आहेत.
खाली दिलेली प्रश्नोत्तरे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.
१. प्रश्न: जिजाऊंचे पूर्ण नाव काय होते?
उत्तर: जिजाबाई शहाजीराजे भोसले.
२. प्रश्न: जिजाऊंच्या जन्मगावाचे नाव काय?
उत्तर: सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा).
३. प्रश्न: जिजाऊंच्या वडिलांचे नाव काय होते?
उत्तर: लखुजीराव जाधव.
४. प्रश्न: जिजाऊंच्या आईचे नाव काय होते?
उत्तर: म्हाळसाबाई.
५. प्रश्न: शिवरायांचे पहिले गुरु कोण होते?
उत्तर: राजमाता जिजाऊ.
६. प्रश्न: जिजाऊंनी पुण्यात कोणता महाल बांधला?
उत्तर: लाल महाल.
७. प्रश्न: जिजाऊंची समाधी कोठे आहे?
उत्तर: पाचाड (किल्ला रायगडच्या पायथ्याशी).
८. प्रश्न: जिजाऊंनी शिवरायांना कशाचे धडे दिले?
उत्तर: न्याय, धाडस आणि संस्कारांचे.
९. प्रश्न: जिजाऊंची जयंती कधी साजरी केली जाते?
उत्तर: १२ जानेवारी.
१०. प्रश्न: स्वराज्याची प्रेरणा शिवरायांना कोणाकडून मिळाली?
उत्तर: राजमाता जिजाऊंकडून.
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातून आपल्याला
संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा मिळते.
अशा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून इतिहास समजून घेणे सोपे होते.
✍️ – Vasudha’s World
अचूक उत्तर देणारे:
१.हर्षाली चव्हाण
२.स्वप्नाली राऊळ
३.सविता चौगुले
४.संगीता शिंदे
५.राजेश्री भोसले
६.स्वाती रंधे
७.शारदा सासणे
८.तनुश्री बोदडे
No comments:
Post a Comment