*आयुष्य आनंदाने जगू या.....।*
*ज्याच्या जवळ सर्व असतं त्याला त्याची किंमत कळत नसते, हेच खरं , आयुष्यातील प्रत्येक सीन वन टेक, परत तो सीन नाही म्हणुन तर जीवन जगतांना Must Be positive , Must Be happy & satisfied...!!!
*कुणी एक विधवा साश्रूनयनांनी सांगत होती ... , "नेहमी भांडायचे मी... माहेरी जाईन... घटस्फोट देईन.... इतक्या थरापर्यंत आमची भांडण जायची, पण आता काय ....!!!!
*नाती, माणसं... जिवंत असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्यांची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं...!
*म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा....! पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी समोर राहील उभा... भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.
*एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही..?
*अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...!! आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.
*जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.
*अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दाखवला गेला असता तर ...?
*आपण काय चुकतो ते न पाहता दुसऱ्याला दोष देणारे कधीच समाधानी असू शकत नाहीत. अपेक्षा वास्तव व योग्य असल्या तर एकमेकांच्या विचाराने पूर्ण करता येतात. जीवन समाधानाने जगणे हे पैशापेक्षाही महत्वाचे असावे.
*सुंदर जीवन आपल्याच मनाने व वागण्याने जगता आले पाहिजे. शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक घेतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?
*आयुष्य खुप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. तसेच दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. एकमेकांना प्रेम द्या, अडचणीत मदत करा, संकटसमयी धीर घ्या, आधार द्या.
*हीच विचारसरणी अंगी बानवूया,*
*चला आनंदाने जगू या...।*
✍️वसुधा इंगळे