Tuesday, April 25, 2023

स्वभाव

स्वभाव



कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं. कारण समोरच्या वर चिडणं खूप सोप्पं आहे पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघुन जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते, हवा आली की उष्णता निघुन जाते, प्रकाश आला की अंधार निघुन जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात. 

जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेंव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय, आणि कोण सावरायला येतंय. 

कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब, सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.


माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव बदलत नाही...


✍️ वसुधा इंगळे

Monday, April 24, 2023

स्त्री

 स्त्री



कुठल्याही स्त्रीशी मैत्री करायची तर ती मनात काही अपेक्षा न ठेवताच करायची असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त हुशार असतात. दहा लोकांच्या गर्दीत कोणाचा हाथ चुकून लागलाय अन् कोण मुद्दाम स्पर्श करतोय हे अचूक ओळखू शकणारी स्त्री तुमच्या मनात काय सुरु आहे, हे पहिल्या चार वाक्यातच ओळखून जात असते.. आणि तुम्हाला कसे ट्रीट करायचं किती मैत्री करायची, किती अंतरावर ठेवायचं हेही फिक्स झालेले असत तीच ...मैत्रीचं करायची तर आधी आपले मन साफ करायला शिकायला हवे.. मनात काही वेगळे ठेवून मैत्री करायला जाल.. तर just remember she knows it all..


✍️वसुधा इंगळे.

Saturday, April 22, 2023

वेड पांघरून पेडगावला जाणे

 आजकाल मुलांचं फाजिल लाड/कौतुक करणारे पालक प्रचंड वाढलेत. 

माझ्या लहानपणी बहुदा मुलांचं अजिबात कौतुक न करणारेच पालक जास्त असायचे म्हणून हा फरक प्रकर्षाने जाणवतो.

माझ्याही आईवडीलांनी तोंडावर माझं भरभरून कौतुक/ लाड वगैरे केलेलं मला आठवत नाही. 

"पानात पडेल ती भाजी खायची नको असेल तर रहा उपाशी" अशी शिस्त!

आरशासमोर जरा जास्त वेळ उभं राहिलं तरी मला टपलीत पडायची!

अर्थात त्यांच्या त्या parenting style मुळे आज माझ्यातला आत्मविश्वास कमी झालाय वगैरे मला अजिबात वाटतं नाही. 

उलट त्यामुळे स्वतःला अधिक प्रभावी बनवण्यासाठी मला indirectly motivation च मिळालं!

असो.


तर हे सांगायचं प्रयोजन म्हणजे, काल एका कार्यक्रमात मला एक अतिउत्साही पालक भेटले.

"माझी मुलगी फार सुंदर गाते. तुम्ही तिचं गाणं एकदा ऐकाचं! मी व्हिडीओ पाठवतो." अस म्हणाले. मी बरं म्हटलं.

पण तेवढ्याने काही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी लगेच मोबाइल काढला.

मी नको नको म्हणत असतानाही हट्टाने त्यांनी त्यांच्या मुलीचा व्हिडीओ मोबाईलमधे play केला. कुठल्याश्या कार्यक्रमात ती गायली होती तेव्हाचा व्हिडिओ होता.

खरतर अशाप्रकारे offline संभाषणात मोबाईलचा online व्हिडीओ पाहाण्याची गळ घालणारे लोकं मला अजिबात आवडत नाहीत.

पण तरीही I decided to be polite at that time.

त्यांचा मोबाईल मी हातात घेऊन पाहिलं तर सहा मिनिटाचा व्हिडिओ होता. 

शिवाय सुर, ताल, लय कशाचीही तमा न बाळगता ती बारा वर्षे वयाची मुलगी कमालीची बेसूर गात होती. 

माझ्याकडे खरच वेळ नव्हता व होता तो वेळ मला त्याक्षणी व्हिडिओ पाहाण्यात फुकट घालवायचा नव्हता. म्हणून मी "आता वेळेअभावी व्हिडिओ पाहू शकत नाही. पण तुमच्या मुलीला रियाज करत राहायला सांगा." अस म्हणत स्वतःची सुटका करून घेतली.


मी विचार करू लागले की या पालकांना आपल्या मुलीचं कौतुक आहे हे ठिक आहे. पण मुलीकडे गाणं गाण्याची aptitudeच नाहीये हे खरच त्यांच्या लक्षात येत नसेल का? की लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जाऊ पाहातायत?

सतत खोटी स्तुती ऐकत राहिलेली त्यांची मुलगी जेव्हा खर्या दुनियेला सामोरी जाईल तेव्हा तिचं काय होईल?

दुनियेतल्या इतर लोकांकडून खराखुरा feedback कधीतरी मिळेलच व तो मिळाल्यावर तिला कोलमडायला झालं तर तिला कोण सावरणार? 


किंवा कदाचित त्या मुलीला स्वतःलाच वस्तुस्थितीचं भान आलं तर ती मुलगी स्वतःसाठी वेगळा मार्ग निवडेलसुद्धा! पण खोटी स्तुती करणार्या पालकांवरचा तिचा विश्वासही तेव्हा उडालेला असेल.


तुम्हाला काय वाटतं?

डॉ मैथिली सावंत

Monday, April 10, 2023

नेहमी आनंदी राहा

 कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा,

आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा.


नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे... बोलताना शब्दाची  उंची वाढवा आवाजाची नाही.


कारण...

पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते

विजांच्या गडगडाटामुळे नाही..

वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबकं असतं...

डबक्यात डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!!

निवड आपली आहे..


कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन...भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.


जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून...!!!


मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि राजहंस मारताना सुद्धा गातो...


दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...

आणि सुखाच्या आनंदात कुणीही  झोपत नाही यालाच जीवन म्हणतात


किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, 

मग जगावे हसत खेळत कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही...


म्हणून नेहमी आनंदी राहा.


✍️ वसुधा इंगळे

Thursday, April 6, 2023

न उलगडलं कोड

 कसा आहे तू हे सांगणंही कठीण आहे.

कधी खूप चांगला वाटतो तर कधी खूप वाईट.

कधी कधी अस बोलतो की मनात अगदी खोल शिरतो.

आणि कधी असा की मनातून पण पार उतरतो.

कधी कधी तुझ्याशी बोलताना खूप राग येतो तर कधी खूप आनंद पण होतो.

कधी कधी अभिमान वाटतो तर कधी पछाताप पण होतो.

कधी कधी तू आपलेसा वाटतो तर कधी परका असल्याची जाणीव होते.

पण खरंच कसा आहे तू हे अजून मलाच नाही कळले. बहुतेक अस वाटत की कधीही न सुटणार कोड आहेस तू........


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...