Friday, July 7, 2023

ज्ञान

 ज्ञान


कोणत्याही गोष्टीचं ज्ञान कधीही वाया जातं नसतं. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान असने हे अज्ञान असण्यापेक्षा चांगलं असतं नेहमीच. प्रामाणिकपणे केलेला अभ्यास व घेतलेली मेहनत कधीही वाया जात नाही.  त्याचा मोबदला योग्य त्या वेळी व्यक्तीला मिळतोच. माणसाने आपल्याला जमेल ती प्रत्येक गोष्ट शिकायला हवी किंवा शिकायचा प्रयत्न तरी करायला हवा. स्वयंपाकापासून तर आणीबाणीत गाडीचं टायर बदलण्यापर्यत माणसाला सर्वकाही थोडंफार जमायला हवं. मला हे अजिबात माहित नाही किंवा मला हे जमतंच नाही, म्हणण्यापेक्षा त्याबद्दल थोडंफार तरी माहित असणे हे योग्य असते.

✍️वसुधा इंगळे

Sunday, July 2, 2023

माणुसकी

 माणुसकी

दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, 

आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, June 28, 2023

प्रेम

 प्रेम


"प्रेम" या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार. अनेक सुखं - दुखं:, समाधान, शांती, संकटं, परीक्षा असे एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो. आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे.


एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय? 

खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी "नातं” यावरचे लेख वाचतो. पण माझ्या मते तो एक अनुभव आहे. हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगेवगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते.


प्रवास हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोप्पा होतो.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, June 21, 2023

आठवण

 आठवण


तुझी असण्यापेक्षा 

नसण्याची सवय जास्त 

मी रिकामीच रे 

तू मात्र कामात व्यस्त


खूप काही मनात साचून राहलेल

तुझ्या येण्या कडे लक्ष लागलेल

येशील तेव्हा मनसोक्त बोलु

सुखदुःखाचे कवाड खोलू


गप्पा च्या ओघात 

भान वेळेचे विसरू 

प्रितीच्या अस्मानी

सुखावेल सैरभैर पाखरू


शब्दांनीच ओंजळ

एकमेकांची भरू ... 

तृप्त होऊ मिठीत

दुःख विरहाचे विसरू...



Tuesday, June 13, 2023

रांगोळी

 रांगोळी




रांगोळी ही पुसली जाणार आहे, हे माहित असून देखील आपण ती मन लावून, जीव ओतून, तासभर अतिशय सुबक, सुंदर आणि रेखीव काढण्याचा प्रयत्न करतो... 

तसंच आपलं आयुष्य हे, कधीतरी संपणार आहे...

ते अधिक सुंदर बनवून जगण्याचा प्रयत्न करुयात !


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...