Thursday, July 20, 2023

सहज मनात आलेलं

 सहज मनात आलेलं


पावसाळा चालू झाला म्हणून म्हटलं वॉटरफॉल ची सहल तर झालीच पाहिजे. मागच्या आठवड्यात नेरळ ला गेलो होतो. तिकडून माथेरान च्या वॉटरफॉल ला भेट दिली.  माथेरान चा वळणावळणाचा रास्ता, तिकडून जस जसे वर जाऊ तस खूपच उंच अशा टेकडी वर आल्यासारखे वाटत होतं. उंच असल्यामुळे तिथे शुद्ध हवा होती त्यांमुळे मन अगदी प्रसन्न होत होतं. शुद्ध हवेमुळे मनातील बरेचसे नकारात्मक विचार आपोआप कमी होत होते व मन प्रफुल्लित होत होतं.


थोड्या वेळाने मी थोड्या उंच अशा दगडावर शांत बसण्या- साठी गेले आजूबाजूला देखील छोटे छोटे दगड होते. त्यांचं थोडं निरीक्षण मी करत होते. त्या उंच टेकडीवरून ज्यांवेळी माझी नजर टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या माणसांकडे गेली त्या टेकडीवरून ती सर्व माणसं खूप लहान लहान दिसत होती.


मी शांत बसून माझ्या मनात येणाच्या विचारांचं निरीक्षण करत होते, त्यांवेळी माझ्या मनात त्या टेकडीवरून निरीक्षण करतांना एक गोष्ट लक्षात आली की, आपण ज्या विश्वात आहोत ते विश्वसुद्धा अतिविशाल आहे. कितीतरी आकाशगंगा था विश्वात आहेत त्यामध्ये कितीतरी ग्रह आहेत त्यात आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर कितीतरी प्रजाती आहेत त्यात आपणही एक आहोत. मग या एवढ्या मोठ्या विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्त्व पाहिलं तर ते मुंगीपेक्षासुध्दा कितीतरी छोट आहे; परंतू आपल्याला याची जाणीवच नाहीये. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींच दुःख, ओझं घेऊन जगत आहोत. आपल्याला कोणी मान-सन्मान दिला नाही तर आपल्याला दुःख होतं, राग येतो, आपला कोणी अपमान केला तर आपण तो कितीतरी दिवस लक्षात ठेवतो, मी उगाच कोणीतरी मोठा आहे हा अहंकार ठेवून जगत राहतो व दुःखी होतो, अपयश वाट्याला आलं की त्याचाही ताणतणाव येत राहतो मग अशा कितीतरी असंख्य गोष्टींच ओझं घेऊन आपण जगत आहोत.


या विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्व खरंच छोटं आहे म्हणून "मी कोणीच नाही" हा भाव ठेवून आपण काम करत राहुया...आपल्याला कोणत्याच गोष्टींच ओझं घेऊन आयुष्य जगायचं नाहीये, ते ओझं आज या क्षणाला उतरून टाकूया. मग पाहा मन हलकं होईल; कारण नको त्या अनेक गोष्टींना आपण कवटाळून बसलो आहोत, त्याचा आपल्याला त्रास होतो आपण अस्वस्थ होतो, तरीही आपण काही गोष्टी सोडायला तयार नाही. आज मात्र आपण या सर्व गोष्टी सोडून देऊन एक सुंदर आयुष्य जगूया. 


✍️वसुधा इंगळे

Monday, July 17, 2023

जास्त ऐकावं... कमी बोलावं

 जास्त ऐकावं... कमी बोलावं


      हे ज्याला जमतं तो बरच काही साध्य करु शकतो.. जिथे गरज नाही तिथे व्यक्त होवु नये हेच योग्य..

      आताच यूट्यूबवर शिवानी  यांना ऐकत होते.. त्या खूपच सुंदर बोलतात .. वेळ मिळेल तसं मी अनेकांना ऐकते.. ओशोना ऐकते.. जया कुमारी खुप जण खुप छान बोलतात.. किवा पुस्तक वाचन सतत सुरु असतं..जे मिळेल ते मी वेळ मिळेल तस वाचत असते. मला माझा वेळ वाया गेलेला आवडत नाही.. दंगा करताना फक्त दंगा आणि आणि इतर कामाच्या वेळी काम असत..

      आज शीवानी बोलत होत्या तो विषय तुमच्याशी शेअर करावा वाटला.. त्यांचं म्हणणं होतं की , एखाद्याबद्दल आपल्या मनात आलेले वाईट विचार हे त्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्या व्यक्तीला तिकडे लो फील होतं.. आणि त्याचं पाप आपल्याला लागतं.. मी विपश्यना करत असल्यामुळे मला अस वाटत की प्रत्येकाच्या आत एकच परमात्मा वास करतो त्यामुळे कदाचित आपले चांगले वाईट विचार समोरच्यापर्यंत पोचत असावेत.. 

      काही जणाना हा विचार पटणार नाही पण मी प्रचंड पॉजीटीव्ह आहे त्या मागे माझ्या पती चा हाथ आहे असं मी मानते. आणि एखाद्या घटनेकडे किवा परिस्थितीकडे चांगल्याच नजरेने पहाण्याची सवय असल्याने मी विचार केला की शीवानीजी बोलतात ते खरं मानु म्हणजेच माझ्या मनात कधीच कोणाबद्दल काहीच वाईट येणार नाही..याचाच अर्थ मी माझ्या वाचकाना सांगेन असं जर खरच असं  होत असेल तर आपण सोशल मिडीयावर कोणावर व्यक्त होताना काय पध्दतीने व्यक्त व्हायला हवं याचा जरुर विचार करावा..कारण अनेकदा अनेक लोकांवर वाचु नये इतक्या वाईट कमेंट करत असतात आतापासुन शिवानीजी सांगतात तो विचार फॉलो करायला काहीच हरकत नाही..  कधीही कोणाकडून चांगलच घ्यावं.. चांगलच पहावं आणि चांगलच बोलावं..


    If you change your vision and thoughts

        Automatically whole world will change..


निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हीटीच पसरवते..यामुळे या क्षणापासून पाऊल उचलताना आणि व्यक्त होताना आपण जरुर विचार करायला हरकत नाही..  त्यामुळे कमी बोला आणि जास्त ऐका.. 🌹


✍️वसुधा इंगळे

Saturday, July 15, 2023

अभिनंदन

 अभिनंदन



एकच गोष्ट " मेहनत". आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर माणूस जग जिंकू शकतो. 


मेहनत करण्याची तयारी आणि आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या माणसांची साथ असेल तर केलेल्या कामातून समाधान मिळतेच.... एक नवीन ऊर्जा तयार होते. येणाऱ्या काळात आणखी चांगली कामं करण्याची इच्छा निर्माण होते.


आयुष्यात काही स्वप्नं आपल्या अगोदर आपले आई-वडील पाहत असतात. तुमच्यासाठी पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुम्हाला पुर्ण करायचे आहे. त्यातले हे एक खरतरं....


आयुष्य जगत असताना भेटणारी माणसं अनेक असतात पण कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाच्या सोबत राहायचे हे त्या माणसाच्या विचारावर, स्वभावावर आणि मेहनतीवर ठरत असते. नरेंद्र इंगळे त्यातलेच एक नाव. ज्याच्या सोबत उभं राहताना आनंद होतो आणि ज्याचा अभिमान ही वाटतो. आज घरच्यांना, मला, तुमच्या मित्र मैत्रिणी ना तुमच्यासाठी आनंदी झालेलं  पाहून मी समाधानी झाले. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.....


✍️वसुधा इंगळे

Move On

 Move On


वेळ निघून जाते पण आठवणी मागे राहतात. भूतकाळातल्या काही गोष्टी तुम्हाला सतत मागे खेचतात, move on होण्यापासून रोखतात. या गोष्टी सोडून द्यायला शिकणं महत्वाचं आहे, आयुष्य वर्तमानात जगणं आवश्यक आहे. 

✍️वसुधा इंगळे

Wednesday, July 12, 2023

आठवणी

 आठवणी

आठवणी या अशाच असतात. सिगारेटच्या झुरक्यासारख्या मनात ओढून घ्यायच्या, पण तशाच वाऱ्यासोबत सोडून द्यायच्या. 

काही आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात, तर काही हवेत विरून जातात. कोणाला मनात ठेवायच आणि कोणाला सोडून द्यायचं हे मात्र आपल्या हातात नसतं. 

ती त्या आठवणीमागची भावनिक तीव्रता ठरवत असते. आपण फक्त माध्यम व्हायचं.

✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...