Sunday, January 21, 2024

वाईट गोष्टी मधून चांगल काही तरी

 

Hiii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप सुंदर होता. तुम्हाला सगळ्यांना सुध्दा आजचा दिवस छान गेला असेल अशी आशा करते. लहानपणी म्हणजे जेव्हा मी चौथी मध्ये होते, तेव्हा वर्गात आम्हाला मोजून 10 ते 12 सुविचार शिकवले होते. त्यात ते आपले नेहमीचेच नेहमी खरे बोलावे वगैरे वगैरे. एक दिवस आमच्या मॅडम क्लास मध्ये आल्या आणि सगळ्यांना ओळीने एक एक सुविचार विचारायला सुरुवात केली. तेव्हा झाल असं ज्या दिशेने ते विचारायला सुरुवात केली नेमके त्याच्या विरुद्ध दिशेला मी बसले होते, माझा नंबर शेवटीच येणार होता. काही मुलांनी सांगितले काहींनी नाही असे करत करत माझा जेव्हा सांगण्याचा नंबर आला तेव्हा आम्हाला शिकवलेले सगळेच सुविचार संपून गेले. आणि मी काहीच सांगू शकले नाही. तेव्हा माझ्यासहित अजून ज्यांनी सांगितले नाही अशा 22 जणांना 100 उठाबश्या काढाव्या लागल्या होत्या. तेव्हा माझ्या पायापेक्षा पण जास्त काहीतरी दुखावले होते ते म्हणजे माझे मन. माझ्या मनाला वाटत होते की तुला साधा चांगला एक विचार बोलता आला नाही. असो पण त्या दिवशी मी ठरवले होते. जिथे आज मला काहीच सांगता आले नाही म्हणून मी शिक्षा भोगली, ती एक दिवस नक्कीच उठता बसता चांगल्या विचारांचे भांडार घेऊन फिरेल. आणि हो तिच मी आहे जी आत्ता 1 सुविचार काय तर सुविचारांचे पुस्तक लिहू शकते. प्रयत्न करत रहा. ह्या जगात अशक्य काहीच नाही. ज्यात आपण zero असू त्यात आपण एक दिवस hero पण होऊ शकतो. विश्वास ठेवा. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

Monday, January 15, 2024

यशाचा पतंग

 

Hiii, सगळे मस्त ना...!! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त आणि सुंदर होता. तुम्हांला सगळ्यांना सुद्धा आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते. आज संक्रांत होती. सगळीकडे मस्त उत्साह होता. सगळीकडे पतंग उडताना दिसत होते. बघा ना पतंगाची डोर आपल्या हाती असते. आपण त्याला जेवढे आकाशात उंच उडवू तेवढा तो उंच जातो. म्हणजे किती पतंग उंच उडवाईची हे आपल्या हातात आहे. तसेंच आयुष्यात आपल्याला आपले ध्येय किती उंच ठेवायचे आहे आणि पूर्ण करायचे आहे ह्याची डोर आपल्या हातातच आहे. तुमच्या सगळ्यांचा यशाचा पतंग उंच जावो की अपेक्षा. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️ वसुधा इंगळे.

Sunday, January 14, 2024

 HIII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर सूर्य तुम्हाला कधी बोलला आहे का मी रोज तुम्हांला सूर्य प्रकाश देतो. पण त्याच्या बदल्यात तुम्ही तर मला काहींच देत नाही. किंवा सूर्यच नाही तर निसर्गाने खूप काही आपल्याला दिले आहे. पण त्यांनी बोलून दाखवले नाही. निसर्गाचा प्रकोप खुप वेळा झाला पण निसर्गाने त्याचा राग शांत करून आपल्याला खूप काही दिले आणि तो अजून देतोय. मग आपण का छोट्या छोटया गोष्टी लक्षात ठेवायच्या की मी ह्याचे हे केले ते केले पण त्याला जाणीव नाही वगैरे वगैरे. मनापासून करायचे सगळे कशाचीच अपेक्षा न ठेवता. कारण अपेक्षांचा डोंगर कधीच संपत नसतो. 

✍️ वसुधा इंगळे.

Friday, January 12, 2024

यश - अपयश

 

Hiii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुम्हांला सगळ्यांना मस्त गेला असेलच अशी आशा करते. आपण कधीकधी अपयशामुळे खूप खचुन जातो. पण बोलतात ना अपयश हिच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे ठीक आहे ना आत्ता नाही तर परत कधीतरी यश येईलच, प्रयत्न मात्र सोडायचे नाहीत. अपयश म्हणजे संकट नसते. तर आपल्याला योग्य मार्गांवर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात. सगळे होईलच ठीक संयम ठेवा. यश लवकरच आपल्या पायाशी लोटांगण घालेल. तुम्ही फक्त हसत रहा आणि खुश रहा...bye

✍️ वसुधा इंगळे.

Thursday, January 11, 2024

शिकवण

 Hii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांचा पण आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते.

सगळेच बोलतात की दुःख वाईट असते, जेव्हा पण येते रडवून जाते.पण मी म्हणते दुःख चांगले असते. जेव्हा पण येते तेव्हा रडवून जातेच पण खूप काही शिकवून पण जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्याला शिकवून जात असतो.पण त्यातून आपण नक्कीच काहीतरी शिकले पाहिजे. बाकी तुम्ही सगळे हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️ वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...