Monday, November 4, 2024

दिवाळी


 दिवाळी आली... घराची सजावट करून झाली, फराळ तयार झाला, नवीन कपडे घेऊन झाले अन् सुट्ट्याही मिळाल्या. पण आता लहानपणीइतकी एक्साइटमेंट काही राहीली नाही दिवाळीची..लहानपणीची दिवाळी वर्षभर वाट पाहिल्यावर यायची. वडिलांकडे केलेले नवीन कपड्यासाठीचे अन फटाक्यांचे हट्ट, आईला फराळात केलेली मदत, मोती साबन, उटणं, घरभर अन अंगणात केलेली पणत्यांची आरास, शाळेतून दिलेला दिवाळीचा अभ्यास, भाऊबीजेला लहान किंवा मोठ्या भावाकडून ओवाळणी म्हणून घेतलेले दहा रुपये, अंगणात आईने काढलेली रांगोळी, फराळासाठी घरी आलेले पाहूणे आणि भाऊबीजेला आईसोबत अनुभवलेल मामाच गाव....

सगळं आता मोठं झाल्यावर हरवून गेल्यासारख झालं आहे. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या अन् विसरून गेलो दिवाळी जगायची कशी असते. खिशात भरमसाठ पैसा आहे. पन ती लहानपणीची दिवाळी होती, तशी आता वाटत नाही. बाकी काय तर जोपर्यंत लहान आहोत आणि आईवडील आहेत तोपर्यंत खरी दिवाळी अन त्यानंतरच्या फक्त जबाबदाऱ्या!

✍️वसुधा इंगळे.

Thursday, March 7, 2024

Clarity


 Hiii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण मस्तच गेला असेल अशी आशा करते. जेव्हा आपण स्वतःला आरशात बघायला जातो आणि तेव्हा जर तो आरसा स्वच्छ नसेल तर आपण त्यामध्ये स्वतःला नीट नाही बघू शकत.आपल्याला जर स्वतःचे रूप आरशामध्ये clear बघायचे असेल तर आरसा पुसावा लागेल. हे तर झाल आरशाचे पण आपल्या सगळ्यांमध्ये खूप सारे गुण असतात. प्रत्येक जण हुशार असते, प्रत्येक जण जिद्दी असते, प्रत्येक जण सहनशील, धाडशी, कर्तृत्ववान असते.मात्र हे सगळे गुण कुठेतरी धूळ खात आपल्या सगळ्याच्या आतमध्ये दडलेले असतात. जसे आसरा पुसला की आपण clear दिसायला लागतो. तसेच आपल्यामध्ये दडलेले गुण बाहेर काढले, त्यावर बसलेली धूळ बाहेर काढली की आपल्याला आयुष्याची clarity येते आणि त्यामुळे आपण जे ठरवले आहे ते नक्कीच पूर्ण करू शकतो. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

Friday, March 1, 2024

विचार

 Hii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना सुद्धा मस्तच गेला असेल अशी आशा करते. इंस्टाग्राम वरती आपण जे जास्त बघत असतो त्याच्याच संबंधित पोस्ट आपल्याला सारख्या सारख्या दिसतात. म्हणजे आपल्या मनात जे चालते जे आपल्याला बघावे वाटते ते आपल्याला लगेंच समोर दिसते. हे तर इन्स्टाचे झाले. आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण जसा विचार करू तसे आपले आयुष्य बनत जाते आपण नेहमी छान छान हसत असू नेहमी सकारात्मक असू तर आपले आयुष्य सुद्धा तसेंच छान छान बनते.इन्स्टा आपल्या आवडीनुसार पोस्ट दाखवते मग आयुष्य का नाही बनणार आपल्या मनात जसे असेल तसे..? बनते हो. मी सांगते ना.त्यामुळे नेहमी छान छान हसत रहा आणि खुश रहा.bye


✍️वसुधा इंगळे.

Monday, February 19, 2024

शिवजयंती

 


Hii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण मस्तच गेला असेल अशी आशा करते. आज शिवजयंती होती. सगळ्यांनी घरांना, गाडयांना भगवे झेंडे लावले. आज सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस सुद्धा ठेवले होते. हे सगळ करणे चांगले आहे. पण वर्षभरात फक्त एक दिवस हे सगळे करून आणि जगाला दाखवुन आपण शिवभक्त किंवा शिवकन्या होतो का..? खरंच मनाला विचारले तर इथे किती जण आहेत त्यांना पूर्ण इतिहास माहित आहे राजांचा. किती जण तो इतिहास वाचयचा म्हणून न वाचता त्यातून काहीतरी शिकून आपल्या आयुष्यात तसे वागण्याचा प्रयत्न करतात.  शिवाजी राजे तर पुन्हा जन्माला येणे शक्य नाही कारण ते जन्माला आले तरी मावळ्यांची साथ त्यांना मिळणार नाही.
सत्ता आणि पैसा ह्यासाठी फक्त आजकाल लोक भांडतात. पण अन्यायच्या विरुद्ध कोणी उभ राहिले तर त्याच्या सोबत का नसेना पण पाठीशी पण कोणी उभ नसते. असो.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि आपण सगळ्यांनी शिवरायांना फक्त स्टेटस वर नाही तर आचरणात ठेऊया.चला उद्या परत भेटू.
हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

Tuesday, January 30, 2024

ध्येय

 

HII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना मस्तच गेला असेल अशी आशा करते. आपल्या घरचे आपल्याला कधी कधी बोलतात की ह्या सुट्टीत आपण फिरायला जाऊ. आणि जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा काहीतरी कारणामुळे ते राहून जाते. मग आपण रुसतो, फुगतो आणि असे बोलायला लागतो की तुम्ही मला उगच स्वप्ने दाखवली. जे बोलला ते तुम्ही केले नाही. वगैरे वगैरे बघा म्हणजे आपल्या मनासारखे झाले नाही तर आपल्याला कसा राग येतो. मग आपल्या मनात जे ध्येय असते ते पूर्ण होत नाही तेव्हा का राग येत नाही आपल्याला. एकदा प्रयत्न करून पाहिजे ते मिळाले नाही तर राग आला पाहिजे. आणि आपण आधीपेक्षा जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या धर्मात असे बोलतात की प्राण जाये पण वचन ना जाये. मग स्वतःला जर आपण वचन दिले असेल की ह्या वर्षाअखेर माझी ही ही स्वप्ने काहीपण करून पूर्ण झाली पाहिजेत. तर ते आपण स्वतःला दिलेले वचन काहीपण करून पूर्ण केले पाहिजेच. तुम्ही सगळे नक्कीच तुमची ध्येय पुर्ण कराल अशी आशा. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.BYE🦋

✍️वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...