Wednesday, July 2, 2025

नवीन आई

 प्रिय नवीन आई


तुम्हाला ही वाटत का मुल जन्माला घालणं सोप्प नसतं!!! मला तर वाटतं!!

पुर्ण नऊ महिने गरोदर असताना जेवढा त्रास होत नाही तेवढ नंतर होतो...पण आई होताना तो त्रास विसरून जातो.

- प्रसुतीच्या वेळी येणाऱ्या कळा म्हणजे मरणाच्या दारात उभं असल्यासारखं.. तरी ती आई धीर धरते.

- प्रसुती नंतर टाके म्हणजे बसता उठता त्रास.. पण व्यक्त कस होणार, तो त्रास सहन करावाच लागतो. कारण बाळाकडे पाहुन त्या आईची सहन करण्याची क्षमता वाढलेली असते.

- नंतर आईची झोप, बाळाला पिण्यासाठी झोपेतुन जागे करणे, आपल्या बाळाला काय होत किंवा त्याच पोट भरत असेल का हे टेन्शन.

या असंख्य गोष्टींचा भार, आईची चिडचिड आणि टेन्शन वाढवतं.

ती आई बाळा कड़े पाहून सगळ विसरून जाते!! आणि उपाय शोधत असते !!


✍🏻 वसुधा इंगळे.

नवीन आई

 प्रिय नवीन आई


तुलाही बाळाचं मन समजायला लागलं आहे का ?

पहिल्या २ महिन्यातच आई आणि बाळा चं नात घट्ट होतं.


बाळाला भुक लागली, झोप आली, अस्वस्थ झालय, गॅस होतोय, गरम होतय, या सगळ्या गोष्टी आई ला समजायला लागतात. आणि बाळाला पण आई समजायला लागते, तीचा स्पर्श समजतो, आई जवळ आल कि बाळ शांत होते, सुरक्षित होते.


आई ला बाळाचा स्पर्श, आणि बाळाला आई चा स्पर्श पाहिजे असतो, दोघांना एकमेकांच्या जवळ पाहिजे, झोपतांना पण बाळ आईच्या जवळच पाहिजे


✍🏻वसुधा इंगळे.

Monday, June 30, 2025

नवीन बाबा

 प्रिय नवीन बाबा


प्रत्येक मुलीच पहिल प्रेम बाबा असतो. आणि बाबाच शेवटचं प्रेम मुलगी असते.


मुलांसाठी हाक्काची जागा म्हणजे आई - बाबा निस्वार्थ प्रेम म्हणजे आई - बाबा


नवीन बाबांनी आपल्या कामातुन वेळ काढून आपल्या बाळाला वेळ द्यावा, कारण बाळाचं बालपण परत येणार नाही, त्याची प्रत्येक होणारी वाढ आनंदाने अनुभवा.


आपल्या बाळाला आपला स्पर्श द्या, त्याला सुरक्षेतीची जाणीव होते, आई प्रमाणे तुमची माया त्याला जाणवते, रडत असेल तर तुमच्याकडे येऊन ते शांत होते.


त्यामुळे आई बाबांनी आपल्या कामातुन जास्तीत जास्त वेळ काढुन आपल्या बाळाला द्या, काम रोजची आहे पण बाळाच बालपण नंतर नाही, बाळाला आपल्या जवळ ठेवा.


✍🏻 वसुधा इंगळे.

गर्भसंस्कार म्हणजे काय ??

 गर्भसंस्कार म्हणजे काय ??



*संस्कार*

गुण वाढवणे आणि दोष दूर करणे या प्रक्रियेला 'संस्कार' असे म्हणतात

*गर्भसंस्कार*

जेव्हा हे संस्कार गर्भावस्थेतच बाळाला दिले जातात तेव्हा त्याला "गर्भसंस्कार "असे म्हणतात.


*गर्भसंस्कर का, कशासाठी ???*

बाळ गर्भात असताना गर्भवती स्त्री ची मानसिक स्थिती, दिनचर्या, आहार, ध्यान धारणा याची जाणीव बाळाला होत असते, यानुसार बाळाचा सर्वांगीण विकास गर्भातच सुरु होतो. त्यामुळे गर्भसंस्कर करणे खूप फायद्याचे ठरते.


*गर्भसंस्कार का करावे??*

1. आई व बाळाच्या स्वाथ रक्षणा सोबत बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी.


2. गर्भ अवस्थेतील प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोग्यसाठी.


3. गर्भवतीच्या मनातील बाळाचे चित्त स्वरूप स्वप्नातील बाळ. प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.


4. बाळाच्या हालचाली गर्भसंवादातून प्रतिसाद समजून घेण्यासाठी.


5. गर्भवतीच्या आदर्श दिनचर्येसाठी.


*गर्भसंस्काराचे महत्व आणि फायदे*

गर्भसंस्कार हे गरोदर माता आणि न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी आवश्यक आहे.

आईचे विचार, भावना आणि कृतींचा गर्भाच्या वाढीवर आणि विकासावर लक्षणीय परिणाम होतो.


1. आई आणि न जन्मलेले मूल यांच्यात मजबूत बंध निर्माण होतो.

2. बाळ आईच्या पोटात ऐकू आणि लक्षात ठेवू शकतात.

3. भाषा शिकण्याची सुरुवात आईच्या पोटातून होते.


✍🏻वसुधा इंगळे.

Thursday, June 26, 2025

थोड मनातलं

 पक्षी माशासमोर पोहण्यात जिंकू शकत नाहीत. मासा तर कधी रडूच शकत नाही. कोकिळासारखे कोण छान गाऊ शकत नाही, मोरासारखे कोण छान नाचू शकत नाही. चित्ता जेवढे धावतो तेवढे कोणी धावू शकत नाही. मुंगी सारखे एकजुटीने कोणी राहू शकत नाही. आणि गरुडासारखी एकट्याने झेप कोणी घेऊ, शकत नाही. 

आपण कोणत्या गोष्टीत पुढे जाऊ शकतो. कोणती गोष्ट करायला आपल्याला सगळ्यात जास्त आवडते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे जमते, हे ओळखावे. म्हणजे आपण हसत खेळत आपली आवड जपत पूढे जाऊ शकतो.

वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...