Thursday, July 10, 2025

आमचं लहानसंच गोंडस विश्व


**तीर्था – आमचं लहानसंच गोंडस विश्व**



माझं लहान गोंडस बाळ, तीर्था… आज दोन महिन्यांची झाली. हे दोन महिने कधी गेले कळलंच नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तिच्यासोबत नवीन काहीतरी शिकवून जाते.


आता ती हळूहळू आवाज काढायला शिकतेय. तिच्या डॅडीने एकदा मजेत विचारलं, “तीर्था, तुला काय ऑर्डर करायचंय?” ती मात्र निरागसपणे “ऍगो” असा आवाज काढून आमचं मन जिंकून गेली. पुन्हा विचारलं तर पुन्हा तोच आवाज! आम्ही म्हणालो, “बघ बघ, मँगो म्हणतेय!” अशा त्याच्या लाडक्या भाषेचं गोड रुप आम्हाला हसवून गेलं.


तीर्थाच पहिल प्रेम म्हणजे आमचं घरातला पंखा! कितीही उचलून घेतलं तरी ती रडते, पण खाली ठेवून पंख्याकडे बघायला मोकळी केली की लगेच शांत होते. कदाचित तिचं आणि पंख्याचं काहीतरी गुपित असेल!


हळूहळू तिच्या आवाजांची, तिच्या रडण्यामागची कारणं समजू लागलीत. आणि गंमत म्हणजे तिला प्रत्येक गोष्टी सांगून केलेली आवडते.

"तीर्था, मावशी आल्या आहे, तुला मालिश करून घेऊ का?"

"मी जेवण करून घेऊ का? तू रडणार नाहीस ना?"

या सगळ्या संवादात ती गोंडस चेहऱ्याने ऐकत असते – अगदी समजून घेतल्यासारखी.


गर्भधारणेदरम्यानचा एक आठवणीय प्रसंग अजूनही ताजा आहे. पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तो दिवस २६ जानेवारी. आणि तीर्था, म्हणजे तेव्हा अजून पोटात असलेली माझी छोटूशी प्राणसखी, उजवा हात आपल्या हृदयावर ठेवून निवांत झोपलेली. डॉक्टर काही केल्या हृदयाची सोनोग्राफी करू शकत नव्हते.


शेवटी तेच म्हणाले, “तुझ्या बाळाला समजावून सांग, नाहीतर आम्हाला तपासणी करणं कठीण होईल!”

मी आणि तिचे डॅडी बाहेर आलो. मी तिला गोड गोड अफर्मेशन्स दिल्या – "डॉक्टर अंटीला तुझा छानसा फोटो घ्यायचाय गं, तू थोडा हात बाजूला कर ना."

आणि खरंच, पुन्हा आत गेलो आणि काही मिनिटांत सोनोग्राफी पूर्ण झाली. डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, “नक्की काय सांगितलंत तुम्ही तिला?”


मी गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यापासून तीर्थाला अशा प्रेमळ अफर्मेशन्स देत होते, आणि कदाचित म्हणूनच ती इतकी समजूतदार आहे – अगदी पोटात असतानाच.


**तिचं अस्तित्व माझं विश्व आहे. तीर्था माझ्या प्रत्येक दिवसाला अर्थ देणारी एक नाजूक, पण ठाम भावना आहे.**


✍🏻वसुधा इंगळे.



Sunday, July 6, 2025

मातृत्व

 मातृत्व

आधी इन्जेक्शन ला घाबरण्या पासुन डिलिव्हरी मध्ये टाके सहन करण्या पर्यंतचा प्रवास म्हणजे " मातृत्व"


आधी थोडस काही दुखल्या नंतर सहन न होणारं, पण डिलिव्हरी मधे ८ ते १२ तास कळा सहन करणे म्हणजे " मातृत्व"


आधी थोडीशी जबाबदारी अंगावर पडली कि भयभीत होणारी, आज एका बाळाची जबाबदारी आनंदाने पार पाडणे म्हणजे "मातृत्व" 

Wednesday, July 2, 2025

नवीन आई

 प्रिय नवीन आई


तुम्हाला ही वाटत का मुल जन्माला घालणं सोप्प नसतं!!! मला तर वाटतं!!

पुर्ण नऊ महिने गरोदर असताना जेवढा त्रास होत नाही तेवढ नंतर होतो...पण आई होताना तो त्रास विसरून जातो.

- प्रसुतीच्या वेळी येणाऱ्या कळा म्हणजे मरणाच्या दारात उभं असल्यासारखं.. तरी ती आई धीर धरते.

- प्रसुती नंतर टाके म्हणजे बसता उठता त्रास.. पण व्यक्त कस होणार, तो त्रास सहन करावाच लागतो. कारण बाळाकडे पाहुन त्या आईची सहन करण्याची क्षमता वाढलेली असते.

- नंतर आईची झोप, बाळाला पिण्यासाठी झोपेतुन जागे करणे, आपल्या बाळाला काय होत किंवा त्याच पोट भरत असेल का हे टेन्शन.

या असंख्य गोष्टींचा भार, आईची चिडचिड आणि टेन्शन वाढवतं.

ती आई बाळा कड़े पाहून सगळ विसरून जाते!! आणि उपाय शोधत असते !!


✍🏻 वसुधा इंगळे.

नवीन आई

 प्रिय नवीन आई


तुलाही बाळाचं मन समजायला लागलं आहे का ?

पहिल्या २ महिन्यातच आई आणि बाळा चं नात घट्ट होतं.


बाळाला भुक लागली, झोप आली, अस्वस्थ झालय, गॅस होतोय, गरम होतय, या सगळ्या गोष्टी आई ला समजायला लागतात. आणि बाळाला पण आई समजायला लागते, तीचा स्पर्श समजतो, आई जवळ आल कि बाळ शांत होते, सुरक्षित होते.


आई ला बाळाचा स्पर्श, आणि बाळाला आई चा स्पर्श पाहिजे असतो, दोघांना एकमेकांच्या जवळ पाहिजे, झोपतांना पण बाळ आईच्या जवळच पाहिजे


✍🏻वसुधा इंगळे.

Monday, June 30, 2025

नवीन बाबा

 प्रिय नवीन बाबा


प्रत्येक मुलीच पहिल प्रेम बाबा असतो. आणि बाबाच शेवटचं प्रेम मुलगी असते.


मुलांसाठी हाक्काची जागा म्हणजे आई - बाबा निस्वार्थ प्रेम म्हणजे आई - बाबा


नवीन बाबांनी आपल्या कामातुन वेळ काढून आपल्या बाळाला वेळ द्यावा, कारण बाळाचं बालपण परत येणार नाही, त्याची प्रत्येक होणारी वाढ आनंदाने अनुभवा.


आपल्या बाळाला आपला स्पर्श द्या, त्याला सुरक्षेतीची जाणीव होते, आई प्रमाणे तुमची माया त्याला जाणवते, रडत असेल तर तुमच्याकडे येऊन ते शांत होते.


त्यामुळे आई बाबांनी आपल्या कामातुन जास्तीत जास्त वेळ काढुन आपल्या बाळाला द्या, काम रोजची आहे पण बाळाच बालपण नंतर नाही, बाळाला आपल्या जवळ ठेवा.


✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...