Saturday, July 22, 2023

एक कटुसत्य

 एक कटुसत्य....

माझ्या पोस्टला इतक्या लाईक येतात,

अमुक-अमुक माझे स्टेटस बघतो,

तमूक-तमूक मला नावाने ओळखतो,

फलाना माझे फोन उचलतो,

डीमका मला मेस्सेज करतो,

मी त्यांच्या किचन मध्ये जाते,

मी यांच्या गाडीत फिरते,

याला काही ही अर्थ नाही मित्रांनो.

"खिशात असेल मनी तरचं विचारतात बरं हाय का धनी"

हा कार्यक्रमच तेवढा खरा आहे...

नाहीतर 

बाकी सब मोह माया है !! 

सोशल मीडियावर 30 लाईक नसल्या तरी चालेल पण खात्यात 30 लाख पडलेले पाहिजेत.

केव्हाही खर्च करता येतात.

पैसे देऊन लाईक वाढवता ही येतात पण लाईक दाखवून किराणा फुकट मिळत नाही.



No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...