Hiii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप सुंदर होता. तुम्हाला सगळ्यांना सुध्दा आजचा दिवस छान गेला असेल अशी आशा करते. लहानपणी म्हणजे जेव्हा मी चौथी मध्ये होते, तेव्हा वर्गात आम्हाला मोजून 10 ते 12 सुविचार शिकवले होते. त्यात ते आपले नेहमीचेच नेहमी खरे बोलावे वगैरे वगैरे. एक दिवस आमच्या मॅडम क्लास मध्ये आल्या आणि सगळ्यांना ओळीने एक एक सुविचार विचारायला सुरुवात केली. तेव्हा झाल असं ज्या दिशेने ते विचारायला सुरुवात केली नेमके त्याच्या विरुद्ध दिशेला मी बसले होते, माझा नंबर शेवटीच येणार होता. काही मुलांनी सांगितले काहींनी नाही असे करत करत माझा जेव्हा सांगण्याचा नंबर आला तेव्हा आम्हाला शिकवलेले सगळेच सुविचार संपून गेले. आणि मी काहीच सांगू शकले नाही. तेव्हा माझ्यासहित अजून ज्यांनी सांगितले नाही अशा 22 जणांना 100 उठाबश्या काढाव्या लागल्या होत्या. तेव्हा माझ्या पायापेक्षा पण जास्त काहीतरी दुखावले होते ते म्हणजे माझे मन. माझ्या मनाला वाटत होते की तुला साधा चांगला एक विचार बोलता आला नाही. असो पण त्या दिवशी मी ठरवले होते. जिथे आज मला काहीच सांगता आले नाही म्हणून मी शिक्षा भोगली, ती एक दिवस नक्कीच उठता बसता चांगल्या विचारांचे भांडार घेऊन फिरेल. आणि हो तिच मी आहे जी आत्ता 1 सुविचार काय तर सुविचारांचे पुस्तक लिहू शकते. प्रयत्न करत रहा. ह्या जगात अशक्य काहीच नाही. ज्यात आपण zero असू त्यात आपण एक दिवस hero पण होऊ शकतो. विश्वास ठेवा. हसत रहा आणि खुश रहा.bye
✍️वसुधा इंगळे.
Keep it up 👍👍
ReplyDeleteThank you so much..
Deleteमनापासुन धन्यवाद