आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.
Monday, July 10, 2023
आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.
Friday, July 7, 2023
व पु काळे
बायकांची जात' असं म्हणत जन्माला येताक्षणी, काही बायका जणु काही आपल्याला काय काय वर्ज्य ते ठरवतात. आणि निम्मं जगणं कायमचं नाकारतात. राह्यलेलं निम्मं आयुष्य कसं जगायचं, हे समाज बाईवर लादत असतो. त्यातलाही खुप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो.
बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरुन शंखात कोंडुन घेतो. आणि मन तर मारण्यासाठीच असतं. ते तर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखावरचा वर्ख गळायच्या आतच संपलेलं असतं. गरूडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त. तरीही, ते मन मेलं की जगण सोपं. पण ते जर फिनिक्स पक्ष्यासारखं असलं तर संपलं. मग 'तडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे' अशी फक्त तडफड.....
✍️व पु काळे
स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आनंदात राहाल...
स्वतःची तुलना इतरांशी करू नका. आनंदात राहाल...
घार उंच उडते म्हणून चिमणीला
कधी टेन्शन येत नाही,
की वाईट वाटत नाही.
ती तिचं आयुष्य आनंदात जगत असते.
पण एक माणूस मोठा झालेला पाहून
दुसऱ्याला लगेच वाईट वाटते,
मत्सर निर्माण होतो.
✍️वसुधा इंगळे
ज्ञान
ज्ञान
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान कधीही वाया जातं नसतं. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान असने हे अज्ञान असण्यापेक्षा चांगलं असतं नेहमीच. प्रामाणिकपणे केलेला अभ्यास व घेतलेली मेहनत कधीही वाया जात नाही. त्याचा मोबदला योग्य त्या वेळी व्यक्तीला मिळतोच. माणसाने आपल्याला जमेल ती प्रत्येक गोष्ट शिकायला हवी किंवा शिकायचा प्रयत्न तरी करायला हवा. स्वयंपाकापासून तर आणीबाणीत गाडीचं टायर बदलण्यापर्यत माणसाला सर्वकाही थोडंफार जमायला हवं. मला हे अजिबात माहित नाही किंवा मला हे जमतंच नाही, म्हणण्यापेक्षा त्याबद्दल थोडंफार तरी माहित असणे हे योग्य असते.
✍️वसुधा इंगळे
Sunday, July 2, 2023
माणुसकी
माणुसकी
दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.
✍️वसुधा इंगळे
निकाल
निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...
-
**टीटूचं आगमन** संध्याकाळचा गारवा अंगावर घेत मी बाल्कनीत बसली होती. हात नकळत पोटावर गेला आणि चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. अजून तिसराच महिना सुर...
-
"पहिली हालचाल... पहिली भेट" गरोदरपणाचे दिवस हे प्रत्येक स्त्रीसाठी एक वेगळंच जग असतं. प्रत्येक क्षणात नवीन काहीतरी घडत असतं, आणि त...
-
आठवण तुझी असण्यापेक्षा नसण्याची सवय जास्त मी रिकामीच रे तू मात्र कामात व्यस्त खूप काही मनात साचून राहलेल तुझ्या येण्या कडे लक्ष लागलेल ...
