Tuesday, October 3, 2023

लाठी काठी आजी

 लाठी काठी आजी





हॉटेल ब्ल्यू नाईल च्या समोर कॅम्प रोड  येथे शांता पवार आजी (उर्फ "लाठी काठी आजी" ) ती तिच्या लाठी काठी कौशल्यामुळे व्हायरल आहे. 90 वर्षांची आजी आहे आणि दिवसभर खूप कष्ट करते कारण ती तिच्या कुटुंबासाठी एकमेव कमावती व्यक्ती आहे, ती 9 मुलांची शिक्षणाची काळजी घेते. ती तिच्या कौशल्याच्या जोरावर त्यांचे पोट भरण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम करत आहे.


आजी हडपसरला राहते, पण तुम्ही तिला पुणे कॅम्प रोड, हॉटेल ब्लू नाईल च्या सिग्नल वर भेटू शकता. जर तुम्हाला तिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही प्रकारची मदत (पैसे किंवा रेशन) मदत करायची असेल तर मी तिचे संपर्क तपशील आणि बँक तपशील देत आहे . ती खूप गोड, नम्र, सकारात्मक आणि प्रतिभावान आहे, म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तिला नक्की मदत करा.


सलाम आजी तुझ्या जिद्दीला आणि संघर्षाला...!!!

✍️वसुधा इंगळे




Friday, September 29, 2023

मुंबई लोकल आणि लोकल मधले नियम

 मुंबई लोकल आणि लोकल मधले नियम!



महिलांच्या डब्यात चढताना तर खूप मारामारी असते. आधीच लोकलच्या दरवाज्यात उभ्या राहिलेल्या महिलांना धक्काबुकी करून आत कसं बसं शिरायचं असतं. त्यात ठाण्याला उतरणाऱ्या महिलांची गर्दी जास्त असेल तर मग काही खरंच नाही. अशात आतमध्ये गेलं तर दररोजचा प्रवास करणाऱ्या महिलांचा एक ग्रुप तयार झालेला असतो. यातल्या महिला आपापल्या मैत्रिणींच्या जागा आधीच बुक करून ठेवतात. मग ती मैत्रीण आरामात चढून आली तरी तिच्या बसण्यासाठी जागा तयार असते. तिच्या अगोदर धावपळ करत चढलेल्या महिला किंवा मुली वेड्याच, असं वाटू लागतं. यावरून कधी कधी वादही होतो. पण, तो महिलांचा एक ग्रुप असल्यामुळे वाद घालणारी एकटी महिला त्यात मात्र अपयशी ठरते.

दुसऱ्या बाजूला महिलांच्या डब्यात चढल्यानंतर कोणी ठाणे आहे का? कोणी घाटकोपर आहे का? कोणी कुर्ला आहे का? तुम्ही कुठे उतरणार? असं एकमेकींना विचारावं लागतं. बोलणाऱ्याची मातीही विकली जाते अन् न बोलणाऱ्याचे सोनं विकलं जात नाही अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती असते. ज्या महिलेनं एखादी जागा विचारली नाही, तर तिला मात्र शेवटपर्यंत उभं राहून प्रवास करावा लागतो. जर नशीब चांगलं असेल तर मग चौथी सीट मिळते.


या चौथ्या सीटवरून आठवलं. महिलांच्या डब्यातली चौथी सीट म्हणजे मौल्यवान जागा म्हणायला काही हरकत नाही. या जागेवरून सर्वात जास्त वाद होतात. जर ती जागा दिली नाही तर मात्र तुमची खैर नाही आणि जरी ती जागा दिली तर मग ‘थोडं अजून सरका’ यावरून कधी कधी जोरजोरात वाद होताना पाहिले आहेत. 


पुरुषांच्या डब्यात जर एखादा व्यक्ती सीएसएमटीपासून बसून आला तर त्यानं ठाण्याला उठून उभ्या असलेल्या व्यक्तीला स्वतःची जागा देणं. पुरुषांच्या डब्यात महिल्यांच्या डब्याप्रमाणे कुठे उतरणार असं विचारलं जात नाही. जी व्यक्ती दोन सीटच्यामध्ये येऊन पहिली उभी राहील, त्या व्यक्तीला पहिली रिकामी जागा मिळते. याशिवाय फर्स्ट क्लास डब्यात ही वेगळे नियम असतात. 


बहुतांश वेळा महिलांना पुरुषांच्या डब्ब्यात सॉफ्ट कॉर्नर मिळतो म्हणून महीला चक्क पुरुषांच्या डब्यात प्रवास करताना दिसतात..


शिवाय प्रत्येक डब्यात आपल्या प्रेयसीला बिनपगारी झेड सुरक्षा देऊन दरवाजा नजदीक एक तरी प्रियकर असतोच. मग तिकडे गर्दीत कोणी ट्रेन मधून पडून मरो अथवा काय होवोत यांना आपली प्रेयसीला सुरक्षित करायचं असतं.



 आयुष्यात ज्या क्षणी तुमच्याकडून चूक घडली आहे असं वाटतं त्याक्षणी तुम्ही त्या व्यक्तीला सॉरी म्हणू शकलात, तरच तुम्ही ते नातं वाचवू शकता.. तरच तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वास परत मिळवू शकता.. 

जितका चूक मान्य करायला उशीर होत जातो, तितका त्या नात्याला ओरखडा पडत जातो, आणि सॉरी नाहीच निघालं तोंडातून, तर विश्वास पण संपतो एवढं नक्की.. विश्वास संपला की नातं देखील संपते... 

अर्थात यासाठी प्रचंड कठोर आत्मपरीक्षण लागते.. समोरच्याने चूक दाखवल्याबरोबर तिथल्या तिथे सॉरी म्हणण्याचा मनाचा मोठेपणा लागतो.. आणि त्या माणसाला जो काही त्रास तुमच्या चुकीमुळे झालेला असतो, त्यासाठी त्याचे जे काही तळतळाट लागलेले असतात ते देखील निघून जातात.. अवघड वळणावर आलेलं नातं नव्याने पुढे जाऊ शकते..


Friday, August 25, 2023

पुणेकर स्त्री


पुण्यातील  एका स्त्रीने फेसबुकवर दुधात चपाती चा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.

तो  फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील असे तीने स्वप्नात सुद्धा विचार केला  नसेल😅😅😅


काही इतरांकडून आलेल्या Comments

😅😅


पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे🤣🤣


दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा कि Grinder ने😅😅


तिसरी : एका चपातीला किती दुध घ्यायचे😀😀😀


चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का 😅😅


पाचवी : एका चपाती च्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची। 


सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम😜🤣


सातवी : चपाती च्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का😅😅😅


आठवी : चपाती ताजी हवी का शिळी। 😜😜😜


बेस्ट comment हद्दच केली।

🙄🙄🙄


चपाती साठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल।

🤣🤣🤣


चपात्या घडीच्या हव्या का फुलके।

😜😜😜


Winner: 

 चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या ।

🤣🤣🤣🤣🤣🤣

वीर वधू

वीर वधू



सुनो, शायद अब मैं लौट के नहीं आऊंगी

और अगर आ भी गई तो

एक केसरी रंग का कफन अपने साथ लाऊंगी। 

पर देखो तुम रोना मत मुझ पर जो गर्व है 

उसको खोना मत और सुनो, मेरे बच्चों से कहना

अब वो दरवाजे पर खड़े होकर मेरा इन्तजार ना करें। 

माँ होकर मुझे धरती माँ के लिए शहीद होने से इन्कार ना करें। मैंने अपनी गाँव की गलियों में काफी वक्त गुजारा है 

उनके लिए अब मेरा कफन ही आखिरी सहारा है।

कहने को तो मुझ पर पहला हक तुम्हारा ही है, 

पर माफ़ करना, मुझे आपके पापा का आधा-अधूरा फर्ज पूरा करना है

अतः एक फौजी को सिर्फ वतन ही प्यारा

बच्चों, मुझे खोने का अफसोस ना करना ।

क्योंकि मैं मरी नहीं हूँ, शहीद हुई हूँ, 

तुम्हारे दिलों में अभी भी जिंदा है।

तुम फिक्र मत करना साथ हूँ तुम्हारे.....

उस तिरंगे को देखना जब भी याद आऊँ क्यों कि 

मैं उसमें अभी भी आबाद हूँ। 

मैं मिट्टी की कीमत जानती हूँ

इसलिए वीरवधू कहलाती हूँ "वीरवधू' कहलाती है।



✍️महिला (आरक्षक) वर्षा किसन ससाणे. 

बीएसएफ

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...