Monday, November 27, 2023

strength

 Hiii, सगळे मस्त ना.. आज पुन्हा एक सुंदर दिवस होता. मला आधी खूप छोट्या छोट्या गोष्टींवरुन रडू यायचे. किंवा आत्ता पण येते. 

काहीजण मला बोलतात की किती रडकी आहे ही. हो मी खूप लवकर रडते. मला लगेच मनाला काहीपण लागते. पण एवढे मात्र नक्की की आजकाल मनाला जे लागले आहे ते लगेच सोडून पण देते. हा थोडा बदल झाला आहे माझ्यात. आणि मला तो आवडला ही आहे. आणि अजून एक माझं रडणे माझा weakness कधीच बनून देणार नाही मी. माझे रडणेच माझी power आहे. तर मला वाटते आपण जसे मूळ रुपात आहोत तसे आपण ठीक असतो. 

हो आहे मी emotional. मला फक्त एवढच की माझ्या emotions मध्येच जी power आहे ती मी आत्ता ओळखतेय. तुम्ही सुद्धा रडणे थांबवू नका. एकदाचे मोकळे होऊन जा. आणि रडण्याला आपली strength बनवा. आणि रडून झाल की हसा बरका. खुश रहा...bye


✍️वसुधा इंगळे

Saturday, November 25, 2023

सकारात्मक विचार

 Hii, सगळे मस्त ना..! 

आजचा दिवस सुद्धा खूप छान होता. दुपारी मी पायऱ्या चढत होते. तेव्हा मला जाणवले की मला पुढे जायचे असेल तर मागचे पाऊल पुढे आणावे लागत आहे. आणि त्यानंतर ते पुढे आलेले पाऊल मागे येत आहे. आणि पुढून मागे गेलेले पाऊल पुन्हा पुढे येत आहे. मग गर्व कशाचा आहे.

 कोण आज पुढे असेल तर कोणी उद्या. शेवटी प्रवास तर दोन्ही पाऊलांचा चालूच आहे ना. असो त्या पायऱ्या खूप काही शिकवून गेल्या आणि विचार करायला भाग पाडले. ह्या जगात काहीच कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे सत्ता आली यश आले तर गर्व करू नये. आणि पराजय झाला तर खचून जाऊ नये. उद्या परत भेटू अशाच एका विचारासोबत. हसत रहा, खुश रहा.bye


✍️ वसुधा इंगळे.

Thursday, November 23, 2023

२३ नोव्होंबर

 Hii, सगळे मस्त ना...!

 आजचा दिवस सुद्धा खूप छान होता. तुमच्या सगळ्यांना सुद्धा छान गेला असेल अशी आशा. जेव्हा आपल्याला खूप जास्त एकटे वाटत असते, कशाचेतरी खूप वाईट वाटलेले असते, दिवस खूप खराब गेलेला असतो तेव्हा जर तुमच्या जवळ तुमची हक्काची माणसे असतील जी तुमच्या मनातले लगेंच ओळखून आपला मूड बदलत असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात. अशा माणसांना जपा कारण सुखात तर सगळे जग आपल्या सोबत असतात मात्र दुःखात साथ देणारे खूप कमी असतात. हे तर झाल की जर माणसे असतील तर..! पण ह्यापुढे जाऊन जर अशी माणसे नसतील तरी हरकत नाही. तेव्हा आरशासमोर जायचे आणि त्या आरशातल्या आपल्या सगळ्यात जवळच्या हक्काच्या माणसा बरोबर गप्पा मारायच्या मन मोकळे करायचे ok. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye


✍️वसुधा इंगळे

Thursday, October 19, 2023

स्त्री ची सुंदरता

 स्त्री ची सुंदरता


मला माझ्या च हात चं आवडत बाई,

माझ्यासारखं चविष्ट नाही होत कोणाचं, असं स्वतःचं म्हणून ती रांधत बसते..

माझ्या सारखं स्वच्छ नाही बाई कोणी, मला मी च पुसलेली फरशी आवडते भारी, असं म्हणून  ती राबत बसते..

माझ्या शिवाय मुलांचं पान नाही हालत, म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात देत, ती मुलांचं करण्यात चं गुंतत बसते..

जोपर्यंत हा अट्टहास स्त्री सोडत नाही तोपर्यंत ती सुखी होऊ शकत नाही...!!! तुमच्या या अट्टाहासा पायी तुम्ही कित्येकदा तुमच्या जवळच्या, तुमच्या मदतीला उभ्या असलेल्या स्त्री ला नाकारता आणि नकळत तिचा अनादर करता आणि कायमचा एक मदतीचा हात, एक नात्याचा बंध, एक भावनिक आधार गमावून बसता..!!

प्रत्येक स्त्री नव्हे, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असतें,

प्रत्येकाचे गुण, कला, आवड-निवड ही वेगवेगळी असतें,

 त्यामुळे एकमेकींना त्यावरून नावे ठेवणे सर्व स्त्री वर्गा ने बंद केले पाहिजे,

नसेल तिच्या घरात स्वच्छता फार, पण सुंदरता तिच्या मनात असेल -स्वभावात असेल,

तिच्यात अन्नपूर्णा नसेल, पण सरस्वती असेल..

 तिच्यात सरस्वती नसेल तर लक्ष्मी असेल..

तिच्यात खूप कला नसतील कदाचित पण ती स्वयंपाकात निपुण असेल,

एखादीला नसेल येत घरातलं काम पण अभ्यासात अव्वल असेल कदाचित,

एखादी शब्दात रमणारी असेल, एखादी सुरेल असेल, एखादी नाटकात कमाल असेल..एखादी नखशीखंत कलाकार असेल..

त्यामुळे आपण या गुणांतल्या भिन्नतेचा मनापासून स्वीकार करुन नातं पुढे नेलं तर नात्यांमध्ये खूप सूंदरता येईल, सहजता येईल....!! स्वतः मध्ये जे आहे "ते" च दुसऱ्या मध्ये शोधण्याचा अट्टहास बंद करा आणि त्याच्या मध्ये "जे" आहे त्याचा आदर करा.. तेव्हा तुम्हाला नात्यातलं खरं सुख गवसेल..! आणि तुमच्या चेहऱ्यावर खरं हास्य फुलेल...!! 

समस्त स्त्री वर्गास समर्पित..🙏

Tuesday, October 17, 2023

सुंदर आयुष्य

 सुंदर आयुष्य 

सुंदर आयुष्य तोच जगू शकतो ज्याला फुलासारखं फुलता येतं. आणि जीवनातील प्रत्येक वादळात टिकता येतं.फुलाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सुंदरता आणि हास्य या दोन गोष्टी फुलाकडून शिकाव्या. 

फुलं कोणताही मेकअप न करता सुंदर दिसतात. आपल्याला कोणीतरी तोडून नेईल हे माहित असतांनाही फुलं हसतात. तोडल्यावरही ते हसतातच. ते शेवटपर्यंत लोकांना आनंद देतात. हसवतात व नव्याने जगायला शिकवतात. तस माणसानेही जगावं इतरांना आनंद द्यावा,दुःख देवू नये. त्रासही देवू नये, कारण सुख वाटण्यातच आयुष्याची मजा आहे. 

आपण लोकांना आनंद आणि सुख वाटतं गेलो की, हळूहळू आपल्याबरोबर आपल्या आसपासची माणसंही सुखी आणि आनंदी होतील. म्हणून फुलासारखं सुख आणि आनंद वाटतं रहा.आयुष्य फुलासारखं फुलून जाईल.

✍️ वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...