Friday, January 12, 2024

यश - अपयश

 

Hiii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुम्हांला सगळ्यांना मस्त गेला असेलच अशी आशा करते. आपण कधीकधी अपयशामुळे खूप खचुन जातो. पण बोलतात ना अपयश हिच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे ठीक आहे ना आत्ता नाही तर परत कधीतरी यश येईलच, प्रयत्न मात्र सोडायचे नाहीत. अपयश म्हणजे संकट नसते. तर आपल्याला योग्य मार्गांवर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात. सगळे होईलच ठीक संयम ठेवा. यश लवकरच आपल्या पायाशी लोटांगण घालेल. तुम्ही फक्त हसत रहा आणि खुश रहा...bye

✍️ वसुधा इंगळे.

Thursday, January 11, 2024

शिकवण

 Hii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांचा पण आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते.

सगळेच बोलतात की दुःख वाईट असते, जेव्हा पण येते रडवून जाते.पण मी म्हणते दुःख चांगले असते. जेव्हा पण येते तेव्हा रडवून जातेच पण खूप काही शिकवून पण जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्याला शिकवून जात असतो.पण त्यातून आपण नक्कीच काहीतरी शिकले पाहिजे. बाकी तुम्ही सगळे हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️ वसुधा इंगळे.

Saturday, December 9, 2023

प्रयत्न

 

HIII, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त आहे. आज ना खूप काही नाही. पण काल पेक्षा एक पुढे पाऊल टाकले. ज्या गोष्टी जमत नाहीत त्या करण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच जास्त नाही पण काल पेक्षा आज जास्त प्रयत्नांनी भरला होता. आलेल्या प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी नवीन करत राहायचे आणि प्रयत्न चालू ठेवायचे. हेच करते आज मी. उद्या परत भेटू. हसत रहा, खुश रहा BYE

✍️वसुधा इंगळे.

Tuesday, December 5, 2023

गुण - अवगुण

 

HI, सगळे मस्त ना..!

पुन्हा एक सुंदर आणि मस्त दिवस. रोज आपल्याला एवढी माणसे भेटत असतात. आणि काही आपल्या जवळची असतात. त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण असतात. जसे की कोणी संकटात लगेच धावून जात असेल, कोणी आपल्याला राग येईल असे बोलत असेल, पण ते आपल्या चांगल्यासाठी.

कोणी प्रेमळ असेल, कोणी खूप भाऊक, तर कोणाला माणसे पटत नसतील, किंवा कोणाला आसपास सारखी आपली माणसे लागत असतील. किती सारे वेगवेगळे स्वभावाचे माणसे असतात ना. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो. कोणाचा पटत असेल तरच त्यांच्या बरोबर बोलायचे. कोणी पटत नसेल तर लांब रहा. पण एक लक्षात ठेवा एक गुण चांगला म्हणून सगळा माणूस चांगला नसतो आणि एक गुण वाईट म्हणून सगळा माणूस वाईट नसतो... हसत राहा आणि खुश राहा

✍️वसुधा इंगळे.

Monday, December 4, 2023

सुंदर डोळे

 

आज पुन्हा एक सुंदर आणि प्रसन्न असा दिवस. तुम्ही सगळे मस्त असालच हो ना..! आपण खाताना तोंडात आलेली मिरची काढून टाकतो. तुम्ही म्हणाल हे काय सांगतेय ही, तर मला हे सांगायचे आहे; की आपण जसं खाताना जे नको आहे ते बाजूला टाकतो आणि बाकी जे आवडते, जिभेला चांगले वाटते ते खातो. तसंच आयुष्यात पण करायचे आहे. कशाला कोणाच्या बद्दलची आपल्याला न आवडणारी बाजू लक्षात ठेवायची. ठेवायचे आहेच ना तर त्या माणसातले चांगले गुण लक्षात ठेवूयात ना. आणि मी ह्या मताची आहे की कोणताच माणूस पूर्णपणे वाईट नसतो, किंवा आपल्याला त्याचे ते वागणे पटले नाही म्हणजे तो माणूस वाईट आहे असे होत नाही. आज मी हेच चांगले काम करणार आहे. 

माझ्या आयुष्यातल्या सगळ्या माणसांचे चांगले वागणे त्यांच्यातले चांगले गुण आठवणार आहे. हे केले की किती छान दिसेल ना सगळे जग. आणि खरंच आहेच हो जग सगळे सुंदर पण ते बघायला आपले डोळे सुंदर असायला हवे ना. आजसाठी एवढेच. उद्या परत भेटूया. मस्त रहा खुश रहा आणि हसत रहा. Bye

✍️वसुधा इंगळे.


निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...